युवा प्रशिक्षण योजनेतून ५०८ जागा भरणार, विविध पदांसाठी नोकरीची संधी! – CMYKPY Ratnagiri Bharti 2024

CMYKPY Ratnagiri Bharti 2024

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे अनेकवेळा कामांचा खोळंबा होतो. त्याचा नागरी सेवांवर परिणाम होतो. जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगारांना कामाची संधी मिळणार आहे. त्यामधून ५०८ जागा भरण्यात येणार आहेत. त्या जागांवर नियुक्ती दिलेल्यांना राज्य शासनाकडून मानधन दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्य विभागामार्फत राज्य सरकारने बेरोजगार तरुणांचा मानधन योजनेचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दहावी, बारावी, पदव्युत्तर, आयटीआय पदवी झालेल्या बेरोजगार तरुणांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी आवश्यक आहे नंतर जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करता येतील. जिल्हा परिषदेमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड होईल. दहावी उत्तीर्ण उमेदवाराला सहा हजार रुपये, आयटीआयसाठी आठ हजार रुपये आणि पदवी, पदव्युत्तर बेरोजगारांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेतून जिल्हा परिषदेमध्ये ५०८ पदांची भरती करण्यात येणार आहे. ज्यांनी शासन निर्णयानुसार नावनोंदणी केलेली आहे ते उमेदवार अर्ज करू शकतात. गुणपत्रकांच्या गुणानुक्रमानुसार ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त बेरोजगारांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजक केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्हा परिषदेत भरण्यात येणाऱ्या पदांमध्ये विविध पदांसाठी भरती राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाहनचालक, विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, कनिष्ठ अभियंता, स्त्री परिचर, सफाई कामगार, चौकीदार आदींचा समावेश आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड