खुशखबर! लातूर जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती सुरु; १२ वी पास उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी! – CMYKPY Latur Bharti 2024
CMYKPY Latur Bharti 2024
शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती होणार आहे. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायाच्या शोधात फिरत आहेत. बहुतांश जणांना अनुभव नसल्याने व्यवसाय, नोकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सुशिक्षित युवकांना नोकरीक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. आयटीआय, पदवी, पदविका व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांना सहा महिने रोजगार अर्थात विद्यावेतन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १ हजार ११५ पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती व्हाट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा किंवा अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
असे मिळणार विद्यावेतन (रु.)…
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- बारावी – ६ हजार
- आयटीआय – ८ हजार
- पदवी – १० हजार रुपये
जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा…
विभाग – रिक्त जागा
खाली विभाग निहाय रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. त्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज खालील लिंक वरून करू शकता.
- सामान्य प्रशासन – ५५
- वित्त विभाग – ०१
- पंचायत – ३१
- आरोग्य – ४४
- कृषी – ०१
- बांधकाम – ११
- पशुसंवर्धन – ०८
- महिला व बालकल्याण – ०४
- शिक्षण – २८१
- जिल्हा बँक – ११०
- एसटी महामंडळ – १००
प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटर…
योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीस एक ऑपरेटरची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती असल्याने तेवढ्या सुशिक्षितांची निवड करण्यात येणार आहे.
इच्छुकांसाठी अशा आहेत अटी…
उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे. किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण असावी. महाराष्ट्रातील रहिवासी, आधार कार्ड असावे. बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
ऑनलाईन करा अर्ज…
जिल्ह्यात एकूण ३१ अस्थापनांमध्ये १ हजार ११५ पदांची भरती केली जाणार आहे. त्यात जिल्हा परिषद, बँका, कारखाने अशा शासकीय, निमशासकीय, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. शिक्षणानुसार निवड करण्यात येणार आहे.
Comments are closed.