महाराष्ट्रात 1 लाख पदांची मेगाभरती? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाडक्या भावा-बहिणींना मोठी संधी – CMYKPY Bharti 2024
CMYKPY Bharti 2024
CMYKPY Bharti 2024 – जे तरुण बेरोजगार आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण-तरुणींना दरमह सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन मिळालेले नाही. आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडक्या भावा-बहिणींना दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. पदरमोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दरम्यान, आता महायुती सरकार टप्प्याटप्प्याने एक लाख पदांची मेगाभरती करेल, असा विश्वास सुशिक्षित तरुणांना आहे. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना सहा महिने प्रशिक्षणाची संधी मिळावी आणि त्यातून त्यांना पुढे नोकरीसाठी मदत व्हावी, उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे या हेतूने राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. त्यातून इयत्ता बारावी उत्तीर्णांना दरमहा सहा हजार रुपये, आयटीआय व डिप्लोमा झालेल्यांना आठ हजार आणि पदवी-पदव्युत्तर पदवीप्राप्त तरुणांना दरमहा दहा हजार रुपये दिले जातात. राज्यातील दहा लाख तरुण-तरुणींना यातून प्रशिक्षणाची संधी दिली जात असून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांसह महसूल, पोलिस यासह इतर शासकीय विभागांमध्येच झाली आहे. परंतु, सद्य:स्थितीत पदरमोड करुन दररोज तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणे अनेकांना परवडत नाही व अन्य अडचणी देखील आहेत. त्यामुळे अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातून सोडून दिल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबरचे विद्यावेतन या लाडक्या भावा-बहिणींना कधीपर्यंत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३६८ युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र बेरोजगार तरुणांनी अर्ज करुन या प्रशिक्षणाचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित व उपमुख्यकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी केले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसह नुकत्याच सुरू केलेल्या ‘लाडका भाऊ’ योजनेंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना सहा महिने मानधन देऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत १ हजार ३५४ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी जि. प.च्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासाठी तयारी सुरू झाली आहे. शासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यासाठी आलेल्या अर्जदारांना यात संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी शासनाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत, यासाठी जि, प.ला १ हजार ३५४ जागा भरता येणार आहे. यात १८ ते ३५ वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना सहा महिने रोजगार मिळणार आहे. त्यातून त्यांना मानधनदेखील दिले जाणार आहे.
यातील सर्वाधिक नियुक्त्या ग्रामपंचायतींमध्ये मिळणार आहेत. १ हजार ३५४ जागांपैकी प्रत्येक ग्रामपंचायतीला एका विद्यार्थ्यांला प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. १ हजार १४९ पदे ग्रामपंचायतींत भरली जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगार युवकांना गावात काम करण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता १२ वी पास असलेल्यांना दरमहा ६ हजार, आयटीआय झालेल्या उमेदवाराला कंपनीमध्ये ८ हजार, तर पदवी झालेल्यांना १० हजार रुपये मिळणार आहेत. पदवी व बारावी झालेल्या मुला- मुलींना पंचायत समिती, जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळणार असून, या दोन्ही कार्यालयांत जिल्ह्यात १९५ पदे आहेत. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या गावासाठी अथवा पं.स., जि.प.साठी अर्ज केला आहे, त्या कार्यक्षेत्रातील बीडीओ अथवा जि.प. कडून नियुक्त्या दिल्या जाणार आहेत, असे जि. प. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी १८ ते ३५ वर्ष वय असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार,आयटी आय व पदविका उत्तीर्ण उमेदवारांना ८हजार, पदवीधर व पदवीत्तर उत्तीर्ण उमेदवारांना १० हजार रुपये इतके विद्यावेतन दरमहा देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने इतका राहणार आहे. यासाठी उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्यालय, पंचायत समिती, गट शिक्षण अधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बांधकाम उपविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अशा विविध आस्थापनांसाठी १३६८ युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत ५६१ उमेदवारांना या अंतर्गत प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पर्याय देखील उपलब्द करुन देण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेने उपलब्ध करुन दिलेली संधी विचारात घेऊन जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.