Clerk Direct Bharti in School 2025 – राज्यातील खासगी अंशतः / पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांची भरती शंभर टक्के नामनिर्देशनाने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत ही पदे ५० टक्के पदोन्नतीने आणि ५० टक्के नामनिर्देशाने भरण्यात येत होती. मात्र, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत झाल्याने पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्या कारणाने आता ही सर्व पदे सरळसेवेने भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने ४ एप्रिल रोजी जारी केले आहेत. अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या अधारे शिक्षकेतर संवर्गातील नियमित पदे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक या पदांचा समावेश आहे.
या शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत करण्यात आली आहे. त्याऐवजी शिपाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. अशा शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी शासन निर्णयाच्या आधीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















