https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

खुशखबर! चाळीसगाव मध्ये अंगणवाडी कर्मचारी भरतीप्रक्रियेला सुरुवात – Chalisgaon Anganwadi Bharti 2025 Details

Chalisgaon Anganwadi Bharti 2025 Details

Chalisgaon Anganwadi Bharti 2025 Details – एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत तालुक्यात २२ अंगणवाडी सेविका व २१ मदतनीसांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सोमवार (ता. १७) पर्यंत प्रकल्प एकच्या सेविकापदासाठी ४८ व मदतनीससाठी ३३, तसेच प्रकल्प दोनच्या सेविकापदासाठी ९३. तर मदतनीसपदासाठी ७३ अर्ज दाखल झाले. शुक्रवारपर्यंत (ता. २१) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. शासनाच्या निर्णयानुसार, अंगणवाडीसेविका व मदतनीसांची ही भरती गुणांकन करून सरळ सेवा पद्धतीने केली जाणार आहे. दोन्ही पदांसाठी अर्जदाराचे शिक्षण बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त शिक्षण असलेल्यांना अधिकचे गुण दिले जाऊन पारदर्शक फद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

 

Anganwadi Bharti Latest News 2025

 

या गावांसाठी भरणार जागा प्रकल्प एक अंतर्गत अभोणे, भवकलो, टेकवाडे बुद्रुक, कदरे, वरखेडे बुद्रुक, हिपुरी पिंपळवाड निकुंभ व चिंचगव्हाण या आठ गावांमध्ये अंगणवाडीसेविकांची, तर पोहरे, वरखेडे बुद्रुक, मेहुणबारे अलवाडी (२), पिलखोड, कृष्णावाडी या सहा गावांमध्ये सात मदतनीसांची भरती होणार आहे. प्रकल्प दोन अंतर्गत हातले, बेलदारवाडी, गोरखपूर, पिंकरखेड, बोडरे, लोंजे, चत्रभुज वांदा, जुनपानी, खरायो, ओबरे, उंबरखेड, एकलहरे व डामरुण या गावांमध्ये चौदा अंगणवाडीसेविकांची, तर वायडू, ओझर, पातोडा, टाकळी प्र. चा. पाथरदे, सांगवी, गंगाश्रम, पिंपळगाव, चिंचखेवा, बोरखेडा बुद्रुक, चावळी (३), चांभार्टी बुद्रुक या गावांमध्ये १४ मदतनीसांची भरती केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड