सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा

CET Exam 2020


CET Exam 2020  : सीईटी परीक्षार्थींसाठी ‘आयडॉल’ची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्‍यक आहे.

CET Exam 2020  : सीईटी परीक्षा आणि ‘आयडॉल’ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले असून ६, ७ व ९ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ‘आयडॉल’कडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधी, बीपीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या २, ३, ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केल्या आहेत. याचे वेळापत्रक सीईटी सेलने २१ सप्टेंबर रोजी जाहीर केले. यानंतर ‘आयडॉल’ने अंतिम सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार सीईटी परीक्षा आणि ‘आयडॉल’ची परीक्षा एकाच दिवशी आल्याने अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आयडॉलची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. याची दखल घेत ‘आयडॉल’ने २, ३ आणि ४ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधी व बीपीएड या सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६, ७ व ९नोव्हेंबर या दिवसांत स्वतंत्र परीक्षाचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांची ही समस्या मनविसेने मांडली होती. यानंतर ‘आयडॉल’ने या विद्यार्थ्यांसाठी ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली.

या दिवशी आयडॉलच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉम व एमए या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘आयडॉल’ने दिलेल्या [email protected] या ईमेलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्रदेखील ईमेलवर देणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी त्याचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती ईमेलमध्ये द्यावी, यानुसार या विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.


CET Exam 2020  : ज्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे.

अतिवृष्टीसारख्या कारणांनी एमएचटी-सीईटी परीक्षा देण्यासाठी मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विशेष सत्रात सीईटी देण्याची संधी मिळणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ट्विट करुन माहिती दिली आहे. दरम्यान, सीईटी परीक्षा देण्यापासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती.

MHT CET 2020 Maharashtra

राज्याती ‘पीसीबी’ गटाची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. तर, ‘पीसीएम’ गटाची परीक्षा १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.सीईटीचे परीक्षा केंद्र प्रामुख्याने शहरी भागात होते. त्याचप्रमाणे शहरी भागात संसर्ग अधिक असल्याने अनेक विद्यार्थी सीईटीपासून वंचित राहिले. या अनुपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेची एक संधी देण्यात यावी. सध्या सुरू असणाऱ्या पीसीएम गटाच्या सीईटी परीक्षेसाठी काही विद्यार्थी आधार कार्ड नसणे, मूळ प्रतित ओळखपत्र नसणे, परीक्षा केंद्रावर काही मिनिटांनी उशिरा पोहोचणे अशा कारणांमुळे उशिरा पोहोचत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी आत सोडले जात नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागत आल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना सीईटी देण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे राज्य सरकारने अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या गुणांची पात्रता कमी केल्याने, बारावीत कमी गुण असलेले अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. मात्र, सीईटीपूर्वी हे विद्यार्थी पूर्वीच्या निकषाप्रमाणे अपात्र असल्याने सीईटीला अनुपस्थित राहिले. नव्या निकषानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी संधी द्यावी, अशी मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्स्टिट्यूट्स इन रुरल एरिया या संस्थेद्वारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

त्यानुसार एमएचटी सीईटीच्या पीसीबी आणि पीसीएम गटाच्या परीक्षेला अतिवृष्टीसारख्या कारणांनी मुकलेल्या परीक्षा देण्यासाठी एक संधी दिली जाईल. या विद्यार्थ्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी मिळणार आहे.


CET Exam 2020  : आजपासून सुरू झालेली एमएचटी-सीईटी परीक्षा १ ते २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे.

इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी आवश्यक एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ४ लाख ३२ हजार १० विद्यार्थ्यांनी नोंदणी तर राज्याबाहेरील १९ हजार ८९६ विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. ४ लाख ५१ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या एमएचटी-सीईटीच्या परीक्षांचे वेळापत्रक ९ ऑगस्टला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जाहीर करण्यात आले होते. एमएचटी-सीईटीच्या परीक्षा १ ते २० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. ही परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीसीबी (फिजिक्स-केमिस्ट्री-बायोलॉजी) ग्रुपची परीक्षा असून ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यातील १, २, ४, ५, ६, ७, ८, ९ या तारखांना तर दुसऱ्या टप्प्यात पीसीएम (फिजिक्स-केमिस्ट्र-मॅथ्स) ग्रुपच्या परीक्षा १२, १३, १४, १५, १६, १९, २० या तारखांना होणार आहेत.

एमएचटी-सीईटीसाठी पीसीएम ग्रुपच्या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ५० हजार ८९ विद्यार्थी तर परराज्यातून १६ हजार १८ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. पीसीबीसाठी अधिक विद्यार्थी असून १ लाख ९५ हजार २७५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी राज्यभरातील १ लाख ९२ हजार ७५ आणि राज्याबाहेरचे ३२०० आहेत. पीसीएम व पीसीबी या दोन्ही ग्रुपसाठी राज्यातून ८९ हजार ८४५ तर परराज्यातून ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यंदा परीक्षा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहेत. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक व माहितीसाठी www.mahacet.org या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

मुंबईतून २५,४१७ विद्यार्थी

राज्यात झालेल्या नोंदणीमध्ये पुण्यातून सर्वाधिक ४० हजार ६६१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल मुंबई २५ हजार ४१७, अहमदनगर २५ हजार २८७, नाशिक २२ हजार ६०७, नागपूर २२ हजार ५५६, ठाणे २३ हजार १२० या जिल्ह्यांतून नोंदणी झाली आहे. तर मध्य प्रदेशमधून सर्वाधिक २ हजार ८७४, उत्तर प्रदेश २ हजार ४७०, बिहार २ हजार १७६, गुजरात १ हजार ६७९, कर्नाटक १ हजार ३२९ या राज्यांतून सर्वाधिक नोंदणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

1 Comment
  1. Ganesh kalue more says

    GANESH KALUE MORE

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड