Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

18 जून झालेली UGC-NET 2024 ची परीक्षा रद्द, पेपरफुटीचा संशय – Centre cancels UGC-NET 2024

Centre cancels UGC-NET

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 18 जून रोजी झालेली UGC-NET 2024ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाकडून युजीसीला पेपर फुटल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे परीक्षा प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. दरम्यान लवकरच परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील. तत्पूर्वी केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. UGC NETची परीक्षा देशभरातील विद्यापीठांतील पीएचडी प्रवेश, ज्युनियर रीसर्च फेलोशिप (JRF) आणि साहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतली जाते. 18 जून 2024 रोजी 317 शहरांतील 1 हजार 205 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 9 लाख 9 हजार 508 विद्यार्थ्यांनी NETची परीक्षा दिली होती.

 

यंदा UGC NETच्या 83 विषयांची परीक्षा एक नव्हे तर दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली. परीक्षेची पहिली शिफ्ट सकाळी 9.30 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 वाजेपर्यंत ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होती.   यापूर्वी  UGC NETची परीक्षा ऑनलाइन CBT म्हणजे कम्प्युटरच्या माध्यमातून घेतली जात असे. सर्व केंद्रांवर सर्व विषयांची परीक्षा एकाच दिवशी घेता यावी, यासाठी हा बदल करण्यात आला.

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तसेच ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. नव्याने घेतली जाणारी ही परीक्षा नेमकी कधी होईल, यासंदर्भात लवकर निर्णय जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. याबरोबरच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असंही शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. याप्रकरणात जी कुणी व्यक्ती दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्ष्ट केलं आहे.

https://x.com/ANI/status/1803469451943383249

NEET परीक्षेतील गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयाची NTA ला नोटीस

NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) अनेक प्रश्न विचारले. NEET परीक्षेत 0.001 टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल बोलताना सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेकडे विरोधी नजरेने पाहिले जाऊ नये असे सांगितले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड