CBSE दहावी आणि बारावी परीक्षा 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका जारी

CBSE Board Exams 2021

CBSE Board Exams 2021: 10th and 12th-grade students can go to the official website of CBSE and check and download the sample question papers of all their subjects (CBSE Class 10th, 12th Sample Papers).

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा 2021 च्या नमुना प्रश्नपत्रिका जारी केल्या आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या सर्व विषयांच्या नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करु शकतात.

बोर्डाने मार्किंग स्कीम (CBSE marking schemes) सह सॅम्पल पेपर्स आपल्या शैक्षणिक अधिकृत वेबसाइट cbseacademy.nic.in वर अपलोड केले आहेत. दहावी आणि बारावीचे सँपल पेपर्स डाउनलोड करण्याची पद्धत आणि थेट लिंक पुढे देत आहोत.

CBSE Board Exam 2021 Sample Papers: असे करा डाउनलोड

 • सीबीएससीच्या वेबसाइट www.cbse.gov.in वर जा.
 • होमपेज वर, ‘अकॅडमिक वेबसाइट’ लिंक वर क्लिक करा.
 • नवीन पेज उघडेल, मेन्यू मध्ये ‘Sample Question Paper’ सेक्शन वर जा.
 • येथे ‘SQP 2020-2021’ आणि दहावी, बारावी इयत्तांची निवड करा.
 • नव्या पेज वर, विषयवार सॅम्पल पेपर्स आणि मार्किंग स्कीम लिंक दिसेल.
 • आपल्या विषयाच्या लिंकवर क्लिक करा, पीडीएफ उघडेल.
 • नमुना प्रश्नपत्रिक डाऊनलोड करा आणि हार्ड कॉपी साठी प्रिंट आउट घेऊन ठेवा.

CBSE 10 वी 12 वी परीक्षा बद्दल नवीन बदल ! 

CBSE Board Exams 2021 :  Postponement to home boards – School Principals suggest changes as cases rise !

Central Board of Secondary Education, CBSE 10th 12th Board Exams 2021 are scheduled to begin fro May 4. The schools have already started conducting the practical examinations as well as internal assessment for students of classes 10 and 12. However, with a steady rise in cases, concerns regarding conducting the exams are surfacing. Experts and academicians have also raised concern. Though no one has suggested cancelling the exams, a few changes have been suggested to better manage the exams during the pandemic.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) अंतर्गत बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास सीबीएसईनं परवानगी दिली आहे. सीबीएसईने ऑफिशियल वेबसाईट cbse.gov.in वर यासंदर्भात नोटीस जारी केलं आहे. सीबीएसईच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यी एका केंद्रावरुन प्रात्याक्षिक परीक्षा आणि एका केंद्रावरुन लेखी परीक्षा देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याबद्दलचा अर्ज त्यांच्या शाळेमार्फत करावा लागेल. अर्जामध्ये ते ज्या परीक्षा केंद्रावरुन परीक्षा देऊ इच्छितात त्या केंद्राबद्दल माहिती लिहावी लागेल. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतचा अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मार्च पर्यंत आहे. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाईट वरुन अर्ज करु शकतात.


CBSE 10 वी 12 वी परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

CBSE Board Exams 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. आधीच्या वेळापत्रकावरील काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. CBSE दिलेल्या माहितीनुसार 4 मे ते 14 जून दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा होणार आहे. परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. वन्य वेळापत्रकानुसार बारावीची भौतिकशास्त्र विषयाची परीक्षा 8 जूनला होणार आहे.

CBSE Board Exams 2021


CBSE Exam 2021: CBSE परीक्षा प्रथमच होणार दोन सत्रात

CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आगामी बोर्ड परीक्षांसाठी इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोना महामारीनंतर यंदा प्रथमच होणाऱ्या या परीक्षा पहिल्यांदाच दोन सत्रांत आयोजित केल्या जाणार आहेत. पहिलं सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर दुसरं सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाने मंगळवारी जाहीर केले. इयत्ता बारावीच्या परीक्षा दोन सत्रात होणार आहेत, तर दहावीची परीक्षा ६ मे २०२१ पासून सुरू होणार असून एकाच सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या आकलनासाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. यावेळी नियमित परीक्षेच्या दिशानिर्देशांव्यतिरिक्त CBSE ने कोविड-१९ गाइडलाइन्स देखील जारी केल्या आहेत. यानुसार परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हेही सांगितले की परीक्षा केंद्रे अशाप्रकारे अलॉट केली जातील की ज्यामुळे एका ठिकाणी गर्दी होणार नाही.

CBSE Class 12 Exams: या गोष्टींकडे द्या लक्ष –

 • – परीक्षा लवकर संपवण्यासाठी सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित केल्या जाणार आहेत.
 • – दुसऱ्या सत्रात केवळा चार पेपरची परीक्षा होणार आहे.
 • – बारावीची परीक्षा एकूण ११४ विषयांसाठी आयोजित केली जाईल.

CBSE Class 10 Exams: दहावी परीक्षेसाठी या नियमांकडे द्या लक्ष –

 • – एकूण ७५ विषयांसाठी इयत्ता दहावीची परीक्षा आयोजित केली जाईल.
 • – बहुतांश परीक्षा तीन तासांसाठी आयोजित केली जाईल. पण पेंटिंग, कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत आदी विषयांसाठी दोन तासांचा वेळ १०.३० ते १२.३० असा असेल.
 • – ताणविरहित पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी म्हणू्न बोर्डाने दोन परीक्षांच्या मध्ये अवधी दिला आहे.

CBSE Board Exams 2021 : CBSE Exam DateSheet 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या तारखांची घोषणा केली. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा १० जून २०२१ पर्यंत सुरू राहणार आहेत.

पोखरियाल म्हणाले, ‘दोन पेपरच्या मध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त पद्धतीने परीक्षा देता येतील.’ प्रतिकूल परिस्थितीत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोखरियाल यांनी कौतुक केले. शिक्षकांनीही कोविड योद्ध्याप्रमाणे काम केले असे सांगत त्यांनी त्यांच्या कामाप्रति आभार मानले.

विद्यार्थ्यांनी परीक्षांची नीट तयारी करावी असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

CBSE अधिकृत वेबसाईट – http://bit.ly/3tjLTZj


CBSE Board Exams 2021 : CBSE 10th 12th Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात मंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारीखपत्रक व त्यातील काही इतर सावधगिरीबाबतची माहिती दिली आहे. त्याचा तपशील आणि बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकाची लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे.

परिपत्रकात असे म्हटले आहे की सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ४ मे २०२१ पासून देशभर सुरू होतील. तर सर्व सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा १ मार्च २०२१ पासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा) घेऊ शकतात. परंतु बोर्डाने लेखी परीक्षा सुरू करण्यापूर्वी शाळांना त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करावे लागेल.

सीबीएसईने म्हटले आहे की दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. २८ जानेवारी रोजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते की बोर्ड ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी वेळापत्रक जारी करेल.

या परिपत्रकामध्ये सीबीएसईने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर संबंधितांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंडळाने म्हटले आहे की परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती सीबीएसई वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर किंवा कोणत्याही प्रकारच्या फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका.

सीबीएसई परीक्षा सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.- https://bit.ly/3tiaMob


CBSE Board Exams 2021 : CBSE Datesheet 2021 Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE (सीबीएसई) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी सुरू होणार हे बोर्डाने जाहीर केलं आहे. मात्र या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मात्र अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. यासंदर्भात गुरुवारी एक दिलासादायक माहिती मिळाली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी २८ जानेवारी रोजी देशातील सीबीएसई शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर (NEP) चर्चा करण्यासाठी हा ऑनलाइन वेबिनार झाला होता. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या विस्तृत वेळापत्रकाची देखील माहिती दिली.

पोखरियाल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे २०२१ रोजी सुरू होणार आहेत. १० जून २०२१ पर्यंत या परीक्षा संपणार आहेत. १५ जुलै २०२१ पर्यंत सीबीएसई परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण त्यावेळी विस्तृत वेळापत्रक जारी करण्यात आलं नव्हतं.

गुरुवारी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईद्वारे दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक २ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर केले जाणार असल्याची माहिती दिली.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्च २०२१ पासून सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्ड आपलं अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक अपलोड करणार आहे.

सीबीएसई यंदा वाढवणार मूल्यांकन केंद्रे

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणार आहे. यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच केंद्रीय मूल्यांकन प्रक्रियेसाठी मूल्यांकन केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली आहे.


CBSE Board Exam Date Updates: cbse 10th 12th exam 2021 dates announced by education minister ramesh pokhriyal nishank – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यानी कोणत्याही ताणतणावाशिवाय पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्याव्यात, असं आवाहन पोखरियाल यांनी केले आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने अभ्यासक्रम ३० टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाहीत, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. पण त्या मार्च-एप्रिल महिन्यातही होऊ नयेत, अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करत बोर्डाने थेट मे महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांचा निकाल वेळेत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. १५ जुलै पर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली. विद्यार्थ्यांना आता पुरेसा वेळ मिळाला असल्याने त्यांनी निश्चिंत मनाने आणि पूर्ण क्षमतेने परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पूर्वी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन त्या मार्चपर्यंत संपायच्या. मात्र २०२० मध्ये करोना परिणामामुळे शैक्षणिक वर्ष विलंबाने सुरू झाले परिणामी परीक्षाही थोड्या विलंबाने होणार आहेत.

नेमकं काय म्हणाले शिक्षणमंत्री पोखरियाल?

करोना काळात शिक्षक-विद्यार्थ्यांची चांगली कामगिरी

पोखरियाल म्हणाले, ‘आम्ही सातत्याने विद्यार्थी-शिक्षकांशी परीक्षांसंबंधी संवाद साधत आहोत. करोना संकट काळात ज्या पद्धतीने तुम्ही स्वत:ला तयार केले आहे, विशेषत: शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या काळात खूप संयमाने, तयारीने आणि संपूर्ण मनोबलाने परीक्षा दिली, अभ्यास केला, शिक्षकांनी शिकवले आणि विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचवले. आपल्या देशात एक हजारहून अधिक विद्यापीठे आहेत, सुमारे ४५ ते ५० हजार पदवी महाविद्यालये आहेत. १ कोटी १० लाख शिक्षक आहेत. १५ ते १६ लाख शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थ्यांची संख्या (३३ कोटी) अमेरिकेच्या लोकसंख्येहूनही जास्त आहे. शिक्षकांनी या महामारी काळात खूप चांगली कामगिरी केली आहे. इतक्या कोटी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणं हे खरंच खूप मोठं आव्हान होतं आणि ते आपण पेललं. काही विद्यार्थ्यांना सुविधांअभावी सुविधा मिळाली नाही, त्यांना आपण टीव्ही आणि अन्य माध्यमांनी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.’ दरम्यान, देशाने नव्या शिक्षण धोरण २०२० ला उत्सवी रुपात स्वीकारले आहे, असेही पोखरियाल म्हणाले.


CBSE Board Exams 2021: cbse 10th 12th exam dates to be announced on 31st december by education minister ramesh pokhriyal – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली.

पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते स्वत: सायंकाळी ६ वाजता सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. ही माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला की परीक्षेसाठी त्यांना अजून काही कालावधीची गरज आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा एप्रिल-मेपर्यंत घेऊ नयेत अशीही मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

यापूर्वी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ नंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत.


CBSE Board Exams 2021 : CBSE Exam Dates – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) पुढील वर्षी होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा मंगळवारी २२ डिसेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या परीक्षा पेपर-पेन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मंगळवारी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशभरातील शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. त्यावेळी ते परीक्षेच्या तारखांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.

कोविड -१९ महामारी काळात देशभरात परीक्षा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, शिक्षणमंत्र्यांनी देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी त्रिस्तरीय संवाद साधण्याची योजना आखली आहे. मंत्री तीन दिवस वेबिनारच्या माध्यमातून या सर्वांशी संवाद साधतील.
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन ठेवण्याचा सीबीएसईचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सीबीएसई अधिकारी शिक्षक, विद्यार्थी-पालकांशी परीक्षांबाबत चर्चा करत आहेत, शिवाय देशभरातील शाळा-महाविद्यालये डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आतापर्यंत सर्व वर्ग, तसेच बोर्ड परीक्षांची नोंदणी आदी काम व्हर्च्युअल मोडवर झाले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी यापूर्वी म्हटले होते, ‘गेले नऊ महिने विद्यार्थी शाळा-महाविद्यांलयांमध्ये जाऊ शकलेले नाहीत. पण विद्यार्थ्यांनी हे संकटही आव्हान म्हणून स्वीकारले. सर्वात मोठं आव्हान या काळात आपली इच्छाशक्ती टिकवून ठेवणे हे होतं. आमच्यापुढील मोठं आव्हान बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत लावून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घेणे हे आहे.’

येत्या काही दिवसांत आभासी संवाद साधल्यानंतर शिक्षणमंत्री विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा आढावा घेतील. आरोग्य व गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आरोग्य प्रोटोकॉल आदेशानुसार या परीक्षा आयोजित करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाईल.


CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच (Offline mode) होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाइन होण्याची शक्यता नाही. बोर्डाने हेही स्पष्ट केल ेआहे की जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध केला जाईल.

सीबीएसई बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलंय की, ‘बोर्डाच्या परीक्षा जेव्हा होतील तेव्हा त्या लेखी आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील. ऑनलाइन पद्धतीने होणार नाहीत. कोविड प्रोटोकॉल पाळून परीक्षांचे आयोजन केले जाईल.’ मात्र परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील, याबाबत बोर्डाने अद्याप काहीही स्पष्ट केलेले नाही. संबंधितांशी विचारविनिमयाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी १० डिसेंबर रोजी परीक्षांसंदर्भात संवाद साधणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षा सर्वसामान्य परिस्थितीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आतापर्यंत विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विविध विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कशा होणार याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषत: बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत, कारण त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी ३० गुण असतात.

दरम्यान, बोर्डाने यापूर्वीच परिस्थिती लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. मात्र, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी कोणताही बदल नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. दिल्ली सरकारने आणखी अभ्यासक्रम कमी करण्याचीही मागणी केली होती. दुसरीकडे, बोर्डाने पेपर पॅटर्न बदलत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिला आहे. एमसीक्यू प्रश्नांवर यंदा अधिक भर दिला जाणार आहे.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड