Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CBSE तर्फे बारावीच्या विशेष परीक्षेचा निकाल जाहीर

CBSE 12th Exam 2021

CBSE 12th Result 2021 

CBSE 12th Exam 2021 : The CBSE Board has announced the results of private and special examinations. Students can see the results by following the Steps in the news. Students who are involved in special exams in August-September can check the results on CBSE.gov.in on the official website. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डाने खासगी आणि विशेष परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. बातमीतील स्टेप्स फॉलो करुन विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. निकाल ३० सप्टेंबरला जाहीर होणार अशी माहिती सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात दिली होती. पण अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमधील विशेष परीक्षेत सहभागी झालेले झालेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in वर जाऊन निकाल तपासू शकतात.

How to Download CBSE 12th Result 2021 

  • दहावी आणि बारावीचा निकाल तपासण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.
  • आता लेट अपडेट विभागात जा आणि योग्य लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाका.
  • आता तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रिनवर येईल.
  • रिझल्ट तपासून घ्या आणि डाऊनलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट काढा.

‘या’ विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि नोंदणी शुल्क माफ 

करोना प्रादुर्भावात आपले पालक किंवा दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क किंवा नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही असा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, बोर्डाशी संलग्न शाळांना अशा विद्यार्थ्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे. अशा विद्यार्थ्यांची सत्यता पडताळून एलओसी सादर करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.

अधिकृत वेबसाईट – www.cbse.gov.in


CBSE 12th Exam 2021 : CBSE board exam 2021 question paper pattern: सीबीएसईने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी ३० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. कोविड -१९ आणि शैक्षणिक सत्राला विलंब या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता बोर्डाने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल केला आहे.

२०२१ च्या परीक्षेसाठी बोर्डाने नमुना प्रश्नपत्रिका पाठविल्यानंतर शाळांनी या संदर्भात माहिती दिली आहे. शाळांनी असे म्हटले आहे की बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये यावेळी बहुपर्यायी प्रश्नांना (एमसीक्यू) गुणात्मक दृष्ट्या जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचबरोबर केस स्टडी आधारित प्रश्नांचे वेटेजही वाढले आहे.

दहावी व बारावीच्या नमुना प्रश्नपत्रिका जारी झाल्यानंतर शाळांनी माहिती दिली की बहुपर्यायी प्रश्नांचे वेटेज १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वी जिथे ज्ञान आधारित प्रश्न विचारले जात असत, त्याऐवजी बोर्ड आता अंडरस्टँडिंग आणि अॅप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे वळत आहे.

भौतिकशास्त्रासारख्या विषयात विचार कौशल्य (thinking skills) आणि तर्क आधारित (reasoning) प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, जीवशास्त्रातील एमसीक्यूची जागा लघुत्तरी प्रश्नांनी घेतलीली आहे. गणितांमध्ये प्रश्नांची संख्या ३६ वरून ३८ करण्यात आली आहे.

हे आहेत मुख्य बदल – CBSE 12th Exam 2021

  • MCQ प्रश्नांना अधिक महत्त्व.
  • इंग्रजीत सुमारे ५० टक्के प्रश्न एमसीक्यू प्रकारचे.
  • गणित आणि फिजिक्स मध्ये केस स्टडी बेस्ड प्रश्न.
  • फिजिक्समध्ये अॅसर्शन, रिजनिंग बेस्ड प्रश्न.
  • बायोलॉजीमध्ये एमसीक्यूऐवजी एकेका गुणांचे लघुत्तरी प्रश्न. या प्रश्नांची संख्या ५ वरून वाढवून १४ करण्यात आली आहे.
  • इकॉनॉमिक्समध्ये एमसीक्यू प्रश्नांची संख्या ८ वरून २० करण्यात आली आहे.

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड