सीबीएसई बोर्डाने 10 वी, 12 वी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर!!

CBSE Compartment Exams

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बोर्डाने आपले अधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in वर दोन्ही इयत्तांच्या परीक्षांचे स्वतंत्र वेळापत्रक जारी केले आहे.

यावर्षी दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल.

संपूर्ण वेळापत्रक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या स्वतंत्र लिंक्स आहेत. या लिंकवर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दरम्यान, या परीक्षांना विद्यार्थी-पालकांकडून जोरदार विरोध होत आहे. या परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोविड-१९ महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा घेतल्या जाऊ नयेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणीदेखील झाली. न्यायालयाने सीबीएसईला ७ सप्टेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. दहावी आणि बारावीचे मिळून २,३७,८४९ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट श्रेणी लागू आहे.

CBSE 10th compartmment date sheet 2020 डाऊनलोड – https://bit.ly/356JwPV

CBSE 12th compartment date sheet 2020 डाऊनलोड – https://bit.ly/2F28BQZ


CBSE Compartment Exams : CBSE फेरपरीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका SC ने फेटाळली

CBSE 10th & 12th Exam 2020 : CBSE Compartment Exams: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. कोविड-१९ संसर्गस्थितीत सीबीएसई बोर्डाच्या फेरपरीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती पण सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेत एक किंवा त्याहून जास्त विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसून शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी दिली जाते.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना सांगितले की कंपार्टमेंट परीक्षेसंबंधी ६ ऑगस्टच्या सीबीएसई प्रतिनिधित्वाचा स्वीकार करण्यासाठी एक स्वतंत्र ठोस याचिका दाखल करण्याची गरज आहे.

सीबीएसई दहावी, बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देशभरातील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी केली होती. इयत्ता दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाला या याचिकेत आव्हान देण्यात आले होते. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला कोविड – १९ संक्रमण स्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेचे आयोजन करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

AISA विद्यार्थी संघटनेचीही मागणी

दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या कंपार्टमेंट परीक्षा रद्द करा अशी मागणी करणारे पत्र ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (AISA) केली आहे. असोसिएशनने ही मागणी करणारे पत्र केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल आणि सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांना लिहिले आहे. पत्रात लिहिले आहे की, ‘मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही ग्रेस मार्क देण्यात यावेत किंवा प्रमोट करण्यात यावे.’


CBSE 12th Class Improvement Exam 2020 : सीबीएसई बारावीची श्रेणीसुधार परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आली आहे…

CBSE 12th Class Improvement Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईची इयत्ता बारावीची श्रेणीसुधार परीक्षी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. सीबीएसई बोर्डाने ही माहिती दिली. ही परीक्षा कोविड – १९ महामारीमुळे रद्द झाली होती. गेल्या महिन्यात तिचा निकाल जाहीर झाला आहे. दरम्यान, सीबीएसई दहावी, बारावीच्या फेरपरीक्षादेखील सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

CBSE 12th Class Improvement Exam 2020

‘ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बारावीच्या गुणांमध्ये किंवा श्रेणीमध्ये सुधारणा करायची आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. यासोबतच दहावी आणि बारावीची कम्पार्टमेंट परीक्षा (फेरपरीक्षा) देखील सप्टेंबरमध्ये होणार आहे. परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर होतील,’ असे सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जे गुण मिळतील ते अंतिम असतील. नियमित विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमार्फत अर्ज करायचे आहेत, तर खासगीरित्या परीक्षा देणारे विद्यार्थी थेट बोर्डाच्या संकेतस्थळावरील लिंकवरून अर्ज करू शकतील. २२ ऑगस्टपर्यंत ही अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे.’

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वर्षाच्या कालावधीतल्या सिलॅबसमधील प्रश्न येतील. विद्यार्थ्यांनी पात्रता निकष, उत्तीर्णतेचे निकष, अभ्यासक्रम आणि योजनेची संपूर्ण माहिती घेऊन मगच परीक्षेसाठी अर्ज करावा असेही भारद्वाज यांनी सांगितले.

यावर्षी सीबीएसई बारावीत विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सहा टक्के अधिक आहे. निकालाची एकूण टक्केवारी ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षीचा बारावीचा निकाल ८३.४० टक्के होता तर यावर्षी तो ८८.७८ टक्के आहे.


CBSE Compartment Exam 2020 : सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहे…

CBSE Compartment Exam 2020: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचे (फेरपरीक्षा) आयोजन केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे. जे विद्यार्थी एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांचा दहावी किंवा बारावीचा निकाल कंपार्टमेंट म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार कंपार्टमेंट परीक्षेसाठी २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

CBSE Compartment Exam 2020

सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षा २०२० सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाणार आहे.

सीबीएसईने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ‘कंपार्टमेंट परीक्षा सप्टेंबर महिन्यात आयोजित केली जाईल. परीक्षेची तारीख लवकरच घोषित केली जाईल.’ नियमित विद्यार्थी आपल्या शाळेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. मात्र, खासगी स्तरावर उमेदवार सीबीएसईचे अधिकृत संकेतस्थळ www.cbse.nic.in वर जाऊन थेट अर्ज करू शकतात. सीबीएसई कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज तेव्हाच स्वीकारले जातील जेव्हा विद्यार्थी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेच्या आधी अर्जाचे शुल्क जमा करतील. परीक्षा अर्ज, परीक्षा शुल्क आदी अर्जाशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

यावर्षी सीबीएसई बारावीत ८७,६५१ विद्यार्थ्यांना कंपार्टमेंटसाठी पात्र हा शेरा मिळालेला आहे. यावर्षी बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला होता. दहावीचे १,५०,१९८ विद्यार्थी कंपार्टमेंटसाठी पात्र आहेत. बोर्डाने दहावीचा निकाल १५ जुलै रोजी जारी केला होता. दहावीचा निकाल यंदा ९१.४६ टक्के लागला होता.

फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयाला पत्र

दरम्यान, देशभरातून एकूण सुमारे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई फेरपरीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून सीबीएसईच्या फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयाची दखल घेऊन (स्यू मोटो) सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. कोविड – १९ महामारी काळात परीक्षा घेण्याचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय विद्यार्थी हिताचा नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.


CBSE 10th & 12th Exam 2020 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांबद्दल बोर्डाने माहिती दिली आहे…

CBSE compartment exam 2020 latest update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या वर्षी फेरपरीक्षा घेणार की नाही… हजारो विद्यार्थी-पालकांना हा प्रश्न सतावत आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या उर्वरित बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता फेरपरीक्षा होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात बोर्डाचं स्पष्टीकरण देखील आलं आहे.

CBSE 10th & 12th Exam 2020

बोर्डाने सांगितलं, ‘आमच्याकडे यावर्षी दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा रद्द करण्याची विनंती आली आहे. पण बोर्ड फेरपरीक्षा रद्द करेल तर अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भविष्यावर विपरित परिणाम होईल. कारण हा दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा प्रश्न आहे. त्यामुळे या परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.’

कशी होणार फेरपरीक्षा?

सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की फेरपरीक्षा घेतल्या जाणार यात शंकाच नाही. या परीक्षा कोविड – १९ महामारीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) नुसार आयोजित केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती सीबीएसई बोर्ड आपली अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर देणार आहे.

सीबीएसई बोर्डाने १३ जुलै रोजी बारावीचा तर १५ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आल्याने गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही. ईशान्य दिल्ली वगळता देशभरात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या अनेक महत्त्वाच्या विषयांची परीक्षा देशभरात रद्द करावी लागली.


CBSE 10th & 12th Exam 2020 Update : Notice for CBSE Student : As per the news CBSE has issued an official notification regarding the delay in board examination and only 29 subjects will be qualified for Examination. CBSE ने नोटीस बजावली, फक्त 29 विषयांची होणार परीक्षा – CBSE ने बोर्ड परीक्षेमध्ये दिरंगाईबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून केवळ 29 विषयांची चाचणी घेण्यात येईल, असे सांगितले आहे. यापूर्वी मानव संसाधन विकास मंत्रालयानेही सांगितले होते की, केवळ 29 विषय परीक्षेसाठी घेतले जातील. ज्या पेपरचे गुण उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक नसतील त्याची परिक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे व्यवसाय अभ्यास, भूगोल, सामाजिक विज्ञान आणि इंग्रजी यासारख्या विषयाची चाचणी परीक्षा घेण्यात येईल. या सुधारित परीक्षेची तारीखपत्रक लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा केली जात आहे.

म्हणून, दहावीच्या आयसीटी (माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान) शी संबंधित पेपर, जे हरवले होते ते रद्द केले जाऊ शकते. तसेच बारावीसाठी व्यवसाय अभ्यास, भूगोल, हिंदी (वैकल्पिक आणि कोर), गृह विज्ञान, सामाजिक विज्ञान, संगणक विज्ञान, माहिती अभ्यास (नवीन आणि जुने), माहिती तंत्रज्ञान आणि जैव-तंत्रज्ञानाचे पेपर घेण्यात येणार आहेत.

त्याचबरोबर ईशान्य दिल्लीतील निषेधांमध्ये झालेल्या गोंधळाच्या कारणास्तव जे पेपर त्यावेळी रद्द केले गेले होते, तेदेखील घेतले जातील. सीबीएसई बोर्डाची परीक्षा 19 ते 31 मार्च दरम्यान घेण्यात येणार होती, परंतु कोरोना विषाणूमुळे ती पुढे ढकलण्यात आली. याच नोटीसमध्ये सीबीएसईने असेही म्हटले आहे की, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय प्रमोट केले जाईल, तर 9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांना इंटरनल स्कूल असेसमेंटच्या आधारे प्रमोट केले जाईल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Chaya pravin kedare says

    12th pass and ITl

    Age limit for SC

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड