५ एप्रिलची MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पोस्टपोन, नव्या तारखा जाहीर

Carona MPSC Exam 2020

MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा ढकलली पुढे

नवीन अपडेट : २२ मार्च २०२० @ २२.०० 

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वप्रथम हा अपडेट महाभरती वर प्रकाशित होत आहे. तेव्हा हि लिंक आपल्या सर्व मित्रांना शेयर करायला विसरू नका.

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेऊन आयोगाने या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे.


MPSC 5th April 2020 Exam is now postponed, new exam dates are given below.

MahaBharti MPSC Exam PostPone📝 GR PDF डाउनलोड


 

नवीन अपडेट : १८ मार्च २०२० @ १७.०० 

मुंबई : राज्यसरकारने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा ३१ मार्च २०२० पर्यंत पुढे ढकलण्याची सूचना दि. १५ मार्च २०२० च्या शासन पत्राद्वारे केली होती. मात्र, आयोगाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकात १६ मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत आयोगामार्फत कोणतीही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित नाही.’

त्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे. राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ५ एप्रिल २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत राज्यसेवा आयोगाने १७ मार्च रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. आयोगाने असे म्हटले आहे की, ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार रविवार दि. ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भातली पूर्वतयारी झाली असल्याने योग्य ती दक्षता घेऊन पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० घेण्यात येईल.’

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत करोनाच्या प्रादुर्भावाविषयी राज्यातील परिस्थितीचा आणि त्यावेळी राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने कळवले आहे. त्यानुसार ५ एप्रिलच्या पूर्व परीक्षेबाबत फेरआढावा घेण्यात येणार आहे. मात्र तूर्त तरी ५ एप्रिलला परीक्षा होईल असे मानून उमेदवारांनी अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी.

नवीन अपडेट : १७ मार्च २०२० @ १८.०० 

MPSC ५ एप्रिल २०२० ची परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण आयोगानं सध्या स्पष्ट केल हि परीक्षा ठरल्या नुसारच ५ एप्रिल २०२० ला होणार, पण पुढील परिस्थिती बघून या निर्णयात बदल सुद्धा होऊ शकतो. तेव्हा सर्व महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा.  

MPSC Exam is scheduled on 5 April 2020, due to CORONA Effect candidates want to Postpone this Exam. More Updates about this will be published on MahaBharti Soon.

नवीन अपडेट : १७ मार्च २०२० @ ११.०० 

Corona Effect on MPSC Examination. As the Above Notification is published by MPSC Today on 17th March 2020. The 5th April MPSC Preliminary Examination is expected to carried out on same date as per current situation of Corona. But if the Corona Situations in Maharashtra get worst, then the Decisions about the MPSC Examination will be revised by MPSC Department. In such a circumstance we will update this page with latest updates about MPSC Purva Pariksha 2020.

 

अपडेट – १६ मार्च २०२० : संसर्गजन्य रोग कोरोनाने सध्या राज्यात थैमान घातले आहे. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने अनेक कडक पावले उचलली आहेत. शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आल्यानंतर आता एमपीएससीच्या परीक्षांबाबतही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयास भेट दिली. आणि राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहेत, असे सांगितले.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या खंड २,३ आणि ४ मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याचे एक पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले असल्याची माहिती राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ३१ मार्च २०२० पर्यंत राज्य पातळीवरील घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशा सूचना संबंधितांच्या मान्यतेने देण्यात आली असून याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे. या वृत्ताला दुजोरा देणारे ट्विट राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक या पदाची पूर्वपरीक्षा रविवारी घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध केंद्रांवर आयोजित परीक्षेत उमेदवारांनी मास्क घालून परीक्षा दिली. राज्याच्या विविध भागांतून हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी पुण्यात आले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर कोरोनासंदर्भात कोणतीही अतिरिक्त सुविधा पुरविण्यात आली नव्हती. काही विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या सॅनिटायझरचा वापर परीक्षेच्या कालावधीत केला.

अपडेट १५ मार्च २०२० – एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची आरोग्य मंत्र्यांची सूचना
“एमपीएससी परीक्षा विभाग हे स्वायत्त आहे. त्यामुळे एमपीएससीचे चेअरमन यांना परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्यात येईल”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोनाचे वादळ घोंगावू लागल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी घरचा रस्ता धरला. अभ्यासिकांकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याने त्या ओस पडल्याचे चित्र दिसून आले.


Update on 13 March 2020

तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरातील जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. याबाबतच्या सूचनाही शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोरोना आपला फास आवळू लागल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

 

राज्य लोकसेवा आयागाने याची दखल घेत आगामी परीक्षांबाबत महत्त्वाची सूचना केली आहे. येत्या रविवारी (ता.१५) नियोजित असलेली सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची पूर्वपरीक्षा होणार की नाही, या संभ्रमात विद्यार्थी आहेत. त्यांचा हा संभ्रम आयोगाने दूर केला आहे. सदर परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असून या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आला नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

आयोगाचे सचिव प्रदीपकुमार याबाबत म्हणाले की, ”परीक्षा पुढे ढकलण्याबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. तसेच परीक्षेची सर्व तयारी झाली आहे. प्रश्‍नपत्रिकांचे देखील वितरण झाले आहे. त्यामुळे परीक्षा रद्द केली जाणार नाही. केवळ एक तासाचा हा पेपर आहे. मात्र, या परीक्षेला उपस्थित उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरातील जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Rahul says

    Nokri nkki milel na

  2. Maroti sudam pawade says

    Police bharti kadhi suru honar ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप