सीए परीक्षा आहे त्या तारखेलाच होईल : कोर्ट- याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली! – CA Exam Dates 2024
CA Exam Timetable 2024
CA Exam Attempt 2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. परीक्षेसाठी आतापर्यंत बरीच तयारी पूर्ण झाली आहे. त्यात बदल केल्यास अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकसभेसाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी अनुक्रमे ७ मे आणि १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे ८ व १४ मे रोजी होणारी सीए परीक्षा अन्य तारखेला घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी चंद्रचूड म्हणाले, सीए परीक्षेसाठी ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. देशातील ५९१ केंद्रांवर परीक्षा होत असून, मतदानाच्या दिवशी कोणतीही परीक्षा नाही. परीक्षेसाठी तयारी पूर्ण झाली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नीट-पीजी : इंटर्नशिप कटऑफ वाढणार नाही
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- येत्या २३ जून रोजी आयोजित केलेल्या नीट-पीजी परीक्षेसाठी इंटर्नशीप कट-ऑफ वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
- सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला तथा न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे याबाबत सुनावणी झाली. क कट ऑफ वाढविण्याचा मुद्दा हा धोरणात्मक असून त्याबाबतच्या मागणीवर विचार करण्यास कोर्टाने नकार दिला.
CA Exam Timetable 2024: सीए इंटरमिजिएट आणि फाऊंडेशनच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा घेतल्या जाणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) परिषदेने २०२४ पासून हा महत्त्वाचा निर्णय अमलात आणण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला आहे.
मे/जून आणि जानेवारी महिन्यातच ही परीक्षा पूर्वी होत होती आता जानेवारी, मे/जून आणि सप्टेंबर महिन्यात अशी तीन वेळा परीक्षा होईल. ज्या विद्यार्थ्यांनी १ जानेवारी २०२४ पर्यंत फाऊंडेशन रूट किंवा थेट इंटरमिजिएट कोर्समध्ये नोंदणी केली आहे. ते विद्यार्थी आता सप्टेंबर २०२४ इंटरमीडिएट परीक्षेत बसण्यास पात्र असणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना eservices.icai.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इंटरमिजिएट आणि फाऊंडेशन कोर्सच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचे ठरवण्यात आले. जागतिक स्तरावर परीक्षेची गरज अधिक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची अधिक संधी मिळू शकेल. यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तसेच परीक्षांमधील अंतर २ महिन्यांनी कमी करण्यात आले आहे. आता या परीक्षा जानेवारी, मे/जून आणि सप्टेंबर महिन्यात घेतल्या जातील. परीक्षेला २ महिने प्रतीक्षा न करता परीक्षेला बसण्यासाठी अभ्यास कालावधी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
नवीन धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा त्यापूर्वी किमान चार महिन्यांच्या कालावधीसाठी ICAI च्या अभ्यास मंडळामध्ये नोंदणी केली आहे आणि नियम 25F मध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींची पूर्तता केली आहे. ते उमेदवार फाउंडेशनसाठी उपस्थित राहण्यास पात्र असतील.
पात्रता निकषांनुसार सीए फाउंडेशन कोर्स नोंदणीसाठी सप्टेंबर 2024 च्या परीक्षेत बसण्याची अंतिम तारीख 1 मे आहे. सीए इंटरमिजिएट अभ्यासक्रमासाठी जानेवारी 2025 च्या परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी देखील 1 मे आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे की, “ज्या विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी 2024 पर्यंत फाऊंडेशन रूट किंवा थेट इंटरमिजिएट कोर्समध्ये नोंदणी केली आहे. ते सप्टेंबर 2024 इंटरमीडिएट परीक्षेत बसण्यास पात्र आहेत.” उमेदवार अधिकृत वेबसाइट eservices.icai.org द्वारे नोंदणी करण्यास सक्षम असतील.
13 ऑक्टोबर 2020 रोजी अधिकाऱ्यांनी चार्टर्ड अकाउंटंट रेग्युलेशन 1988 च्या नियम 25E, 25F आणि 28F मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर आता उमेदवाराला दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर फाउंडेशन कोर्ससाठी तात्पुरती नोंदणी करण्याची परवानगी आहे.
CA Exam Timetable 2024
CA Exam Timetable 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, CA इंटरमीजिएट आणि फायनल परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
निवडणुकीनिमित्त परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तारखांमध्ये बदल करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले की सीए परीक्षेमुळे परीक्षार्थीच्या मतदान करण्यावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी परीक्षेच्या आयोजकांनी घेतली आहे. निवडणूक काळात परीक्षा घेऊ नये, असा कोणताही नियम नाही. त्यामुळे या परीक्षा निर्धारित वेळेतच होतील.
Table of Contents
Comments are closed.