महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. बीड Mahila Bal Vikas Recruitment 2025 जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांअंतर्गत ही भरती पूर्ण केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ (Mahila Bal Vikas Recruitment 2025) मध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी एकूण ६२० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. शिरूर कासार आणि पाटोदा प्रकल्पांमध्ये ही प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. मात्र, इतर सर्व प्रकल्पांसाठी २४ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास बडे यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भरती स्थगित करण्यात आली होती, परंतु आता शासनाच्या निर्देशानुसार ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मदतनिसांना पदोन्नतीद्वारे अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती देऊन उर्वरित रिक्त पदे भरली जाणार आहेत. बीड जिल्ह्यातील १३ प्रकल्पांतील रिक्त पदे भरती प्रक्रियेद्वारे लवकरच भरली जाणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















