JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 10 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !! | Bombay High Court Recruitment 2026

Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026 : Bombay High Court published an advertisement for the recruitment of “Junior Translator and Interpreter” under Bombay High Court Bharti 2026. There are a total of 10 vacancies available to fill with Posts. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link by Speed Post before the last date. The last date for submission of application is 09th of December 2026. For more details about Bombay High Court Recruitment 2026, visit our website  www.MahaBharti.in.

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी” पदाची 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  मुंबई उच्च न्यायालय भरती २०२६ करीता अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई उच्च न्यायालय सहयोगी भरती २०२६

Bombay High Court Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी10

Educational Qualification For Bombay High Court Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषीDegree from a recognized University in languages viz. English, Hindi, Marathi and Gujarathi; Proficient in English and at least any two of the following languages viz. Hindi, Marathi, Gujarathi & Konkani; Computer Certificate about proficiency in operation of Word Processor in Windows and Linux, in addition to M.S. Office, M.S. Word, Wordstar- 7 and Open Office Org.

Salary Details For Bombay High Court Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषीRs. 49100-155800 plus allowances (Pay Matrix S-18)

How To Apply For Bombay High Court Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For bombayhighcourt.nic.in Bharti 2026

📑PDF जाहिरात https://shorturl.at/omD7H
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/zahdtafd
✅ अधिकृत वेबसाईट
https://bombayhighcourt.nic.in/

 


Bombay High Court Bharti 2026:कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी नवीन ४५९ पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या पदनिर्मितीला तसेच संबंधित पदांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर खर्चासाठी आवश्यक निधीलाही मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.या निर्णयामुळे संबंधित पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच पूर्ण खंडपीठात रूपांतर होण्याच्या दिशेने स्वतंत्र पदनिर्मिती हा महत्त्वाचा पुढील टप्पा मानला जात आहे. त्यामुळे या निर्णयाकडे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांचे आणि नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर आता त्याच्या प्रशासकीय यंत्रणेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेची अधिसूचना १ ऑगस्ट २०२५ रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२५ रोजी सर्किट बेंचचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले.मात्र, सर्किट बेंच सुरू झाल्यानंतरही त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आता स्वतंत्र पदनिर्मितीला मंजुरी मिळाल्याने सर्किट बेंचच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक सक्षम स्वरूप मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला आता कायमस्वरूपी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या सर्किट बेंचच्या कामासाठी मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. मात्र, कायमस्वरूपी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाकडे गट ‘अ’ ते गट ‘ड’ संवर्गातील एकूण ४५९ पदांचा प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूर सर्किट बेंचसाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होणार असून, त्याच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

Bombay High Court Bharti 2026 NEWS


Bombay High Court Bharti 2026: मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक भरतीच्या परीक्षेबाबत उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली संगणक टंकलेखन परीक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी (२९ ऑगस्ट) रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तसेच टंकलेखनाच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत न्यायालयाने परीक्षा रद्द केली असून, फेरपरीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लिपिक भरतीच्या परीक्षेत नव्या पद्धतीचा प्रयोग उमेदवारांसाठी अडचणीचा ठरल्याचे समोर आले आहे. लिपिकांच्या १ हजार ३३२ जागांसाठी तब्बल ११ हजार ६१७ उमेदवार परीक्षेला बसले होते. न्यायालय प्रशासनाने प्रथमच ही परीक्षा त्रयस्थ संस्थेमार्फत ‘स्क्रीन टू स्क्रीन’ पद्धतीने घेतली; मात्र या पद्धतीदरम्यान उमेदवारांना विविध तांत्रिक तसेच परीक्षेशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागला.

लिपिक भरतीच्या टंकलेखन परीक्षेतील तांत्रिक त्रुटी आणि अव्यवस्थेमुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. संगणकाच्या पडद्यावरील अक्षरांचा आकार लहान असल्याने स्वल्पविराम, अवतरणचिन्ह, विसर्ग यांसारखी चिन्हे स्पष्ट दिसत नव्हती. त्यातच उतारा टंकलिखित करताना अक्षरे उशिराने पडद्यावर उमटत असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. काही परीक्षा केंद्रांवरील संगणकांच्या कळफलकांवर धूळ साचलेली होती, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे कळफलक देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. टंकलेखन परीक्षेसाठी निर्धारित नियमांचे पालन झाले नसल्याच्या तक्रारींसोबतच काही केंद्रांवर परीक्षा व्यवस्थित पार पडली नसल्याचेही समोर आल्याने परीक्षेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Bombay High Court Bharti 2026

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड