१० वी ते पदवीधर उमेदवारांना बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी!

BOI Recruitment 2020


BOI Recruitment 2020: बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत

कोरोना आणि पावसाळी वातावरणात सध्या सरकारी नोकऱ्यांचा पाऊसच सुरु आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात (BOI Recruitment 2020) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. यामध्ये 42020 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

बँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटींनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.

पदे आणि पगार

 • अधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये दिला जाणार आहे.
 • क्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा दिला जाणार आहे.
अर्ज कोण करू शकणार…

 • अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.
 • क्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10 वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच D श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.

वयाची अट

या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01.07.2020 च्या आधारे केली जाणार आहे.

शुल्क 

या जागांसाठी SC/ST/PWD मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 16 ऑगस्ट आहे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा ..- https://mahabharti.in/bank-of-india-bharti-2020/


8 Comments
 1. ajit dhele says

  paper aahe ka

 2. Amruta says

  Sporting event chapian nsel tr ??

 3. सिद्धांत दशरथ कांबळे says

  अर्ज ची लास्ट तारिक काय आहे

 4. Tejas says

  Sporting events champion nsrl trr

 5. Tejas says

  Sporting event champion nsrl trrr

 6. Vaibhav patil says

  Sporting events champion nasel tar

 7. Sunil balvant waghmare says

  Job sathi kagad patra konte lagatil sir

  1. MahaBharti says

   मुलाखतीच्या वेळेस कागदपत्र सादर करावे लागतील, कृपया दिलेल्या PDF चा पेज क्र ४ पहा, पूर्ण लिस्ट दिलेली आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड