मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 9 मार्च 2025 रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदांसाठी एकूण 690 जागा भरण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंबंधी आधीच परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, दुय्यम अभियंता (स्थापत्य) संवर्गाची परीक्षा सुमारे 15 दिवसांत घेतली जाणार आहे. सुधारित तारीख निश्चित झाल्यावर ती संकेतस्थळ व वर्तमानपत्राद्वारे जाहीर केली जाईल.
परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण?
25 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुय्यम आणि सहाय्यक अभियंता सरळसेवा भरती परीक्षेत गोंधळ झाल्याचा आरोप झाला होता. परीक्षेतील प्रश्नपत्रिकांमध्ये समान प्रश्न आढळल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. परिणामी, परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
690 पदांसाठी भरतीचे तपशील: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250 पदे आणि कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130 पदे या गट-क संवर्गातील पदांसाठी वेतनश्रेणी ₹41,800 – ₹1,32,300 + भत्ते निश्चित करण्यात आली आहे. तसेच, दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233 पदे आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77 पदे या गट-ब संवर्गातील पदांसाठी वेतनश्रेणी ₹44,900 – ₹1,42,400 + भत्ते राहणार आहे.
संबंधित उमेदवारांनी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुधारित परीक्षेच्या तारखांसाठी नियमितपणे पाहणी करावी.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















