आपल्याला माहीतच असेल सध्या, मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू असून प्रशासनाने यासाठीच्या जाचक अटी अद्याप शिथिल केलेल्या नाहीत. इयत्ता बारावी व पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. प्रशासनाने उमेदवारांकडून बारावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्रही मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्जच स्वीकारला जात नसल्याने अनेकजण वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्ज करणारे अनेक उमेदवारांची अशी अपेक्षा आहे की या अटी रद्द कराव्या.

पालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती सुरू आहे. या पदभरतीच्या पात्रता अटींवर उमेदवारांनी व विविध कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १,८४६ जागा सरळसेवेने भरली जातील. या जागांसाठी २० ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील. मात्र, या पदासाठीच्या पात्रतेच्या अटी जाचक असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत या अटी रद्द कराव्या, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र प्रशासनाने या अटी तशाच ठेवल्या आहेत.
या परीक्षेसाठी अर्ज भरण्याकरीत उमेदवार बारावी आणि पदवी परीक्षेत पहिल्या प्रयत्नात किमान ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. या अटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. तसेच पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अर्ज भरतानाच सादर करावे लागत असल्यामुळे अनेक उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जात नसल्याची माहिती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल बडे यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















