खुशखबर! पालिकेतील घनकचरा विभागा मधील ५६ हजार रिक्त पदे भरणार!

BMC Bharti 2025 Latest

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे ५६ हजार पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार येत आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांना भेटून चर्चा केली. ही पदे टप्प्याटप्प्याने भरण्यात येणार असल्याचे आश्वासन या वेळी जोशी यांनी दिले. त्या भरती झाल्यास कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल, अशी माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी दिली.

तसेच सध्या मुंबई सुरु असलेल्या विविध भरती जाहिराती आपल्याला बघायच्या असतील तर येथे क्लिक करा, या लिंक वर मुंबईतील सर्व नवीन भरती जाहिराती उपलब्ध आहे. 

 

BMC Bharti Latest Update 2025

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्यासोबत शुक्रवारी (ता. २५) पालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला उपायुक्त किशोर गांधी, किरण दिघावकर, प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी शारदा गोसावी उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच मलनिस्सारण, मुख्य मलनिस्सारण, गटारे, स्मशानभूमी आदी घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कामगारांना लाड- पागे समितीच्या शिफारशींअन्वये वारसाहक्क नोकऱ्या दिल्या जाणार आहेत, तर नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले देय दावे लवकर निकाली काढण्यासाठी (डीसी-१ दावे) सुधारित व सोपी नियमावली प्रसारित करण्याच्या सूचना डॉ. जोशी यांनी दिल्याचे बापेरकर यांनी सांगितले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बदली परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याची मागणी
एकाच ठिकाणी राहून कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सफाई खात्याच्या पी. टी. केस खात्यातील तीन लिपिक व केईएम रुग्णालयात सुमारे २६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची तत्काळ बदली करण्याचे आदेश जोशी यांनी दिले. त्यामुळे बदली परिपत्रकाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी मान्य करण्यात आल्याची माहिती बापेरकर यांनी दिली.

 

 


मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून यात महापालिकेतील विविध खात्यांतील 52 हजार 221 रिक्त पदांची भरती हा मोठा गंभीर विषय आहे. ही रिक्त पदे तातडीने भरा आणि याबाबत पालिका प्रशासनाने संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका पालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त विकासकामांची घोषणा केली आहे, मात्र कर्मचारी, कामगारांसाठी असलेल्या योजना तसेच त्यासंदर्भात कोणतीही मोठी तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे विकासकामांकडे लक्ष जरूर द्या, पण विकासकामांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचारी, कामगारांना वाऱ्यावर सोडू नका, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे.

जुनी पेन्शन योजना (ओपीएस) लागू करा, गटविमा योजना सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना समान पद्धतीने लागू करा, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी भत्तेवाढ ही 2016 पासून लागू करा, घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘सफाई कामगार’ घोषित करून त्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू करा, अशा मागण्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केल्या आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड