25 % बीजभांडवल व 25000 रु थेट कर्ज योजना

Bij Bhandval Yojna

Bij Bhandval Yojna – Sarkari Yojna 2020 Updates & Details

विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्‍या समाजातील आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सवलतीच्‍या व्‍याज दराने अर्थ सहाय्य देऊन त्‍यांच्‍या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्‍नती करणे.

? योजनेच्‍या प्रमुख अटी :

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

▪ अर्जदार हा महाराष्‍ट्र राज्‍याचा रहिवासी असावा.
▪अर्जदार विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातीलच असावा.
▪अर्जदाराचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.
▪ अर्जदाराकडे कोणत्‍याही शासकीय, निमशासकीय अथवा वित्‍तीय संस्‍थेचे कर्ज बाकी असू नये.
▪ राज्‍य महामंडळाच्‍या योजनांकरीता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्‍पन्‍न रु. 1,00,000/- व केंद्रीय महामंडळाच्‍या योजनांकरीता शहरी भागाकरीता रु. 1,20,000/- व ग्रामीण भागाकरीता रु. 98,000/- पर्यंत असावे.
▪ महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्‍या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
▪ कुटुंबातील फक्‍त एकाच व्‍यक्‍तीला एकदाच कर्ज मिळेल.

? लाभाचे स्‍वरुप :

▪ 25% बीजभांडवल योजना
▪ प्रकल्‍प मर्यादा रु. 5,00,000/-
▪ परतफेड कालावधी 5 वर्षे

? 25,000/- थेट कर्ज योजना

▪ प्रकल्‍प मर्यादा रु. 25,000/-
▪ परतफेड कालावधी 4 वर्षे

Documents For Bij Bhandval Yojna

? आवश्यक कागदपत्रे  :

✔ महाराष्‍ट्र राज्‍यातील सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा व उत्‍पन्‍नाचा दाखला.
✔ योजनेसंबंधीची सविस्‍तर माहिती दरपत्रक, कच्‍चा माल कसा तयार होणार, तयार माल कसा विकणार इत्‍यादी तपशिल (प्रकल्‍प अहवाल)
✔ अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्‍यास, प्रमाणपत्राची प्रत.
✔ अर्जदार ज्‍या जागेत व्‍यवसाय करणार आहे त्‍या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्‍काचा पुरावा.
✔ अर्जदारास व्‍यवसायाचा पुर्वानुभव असल्‍यास त्‍याबद्दल पुरावा.
✔ शिधा वाटप पत्र (रेशनिंग कार्ड)
✔ आधार कार्ड, पॅन कार्ड ची प्रत बंधनकारक आहे.
✔ ऑटोरिक्षा करीता अर्ज करावयाचा असल्‍यास वाहन परवाना, प्रादेशिक परिवहन विभागाकडील (RTO) परवाना.
✔ ऑटोरिक्षा करीता नंबर लावल्‍याचा पुरावा व रिक्षा बुकिंगबद्दल विक्रेत्‍याकडील दरपत्रक.
✔ दोन पात्र शासकीय जामिनदारांची पात्रता सिध्‍द करणारी कागदपत्रे, उदा. जमिनीचा सात बारा उतारा (ग्रामीण भागाकरीता), वेतन पत्रक, कार्यालयीन ओळखपत्र.

? संपर्क कार्यालयाचे नाव : वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित) जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा

? (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड