JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

भुसावळ येथे २२ फेब्रुवारीला रोजगार मेळावा, १०, १२, पदवीधरांना नोकरीच्या संधी! – Job Fair at Santoshi Mata Complex on 22nd Feb!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ येथे होणार आहे.

Job Fair at Santoshi Mata Complex on 22nd Feb!

१०वी, १२वी पास व विविध पदवीधरांसाठी सुवर्णसंधी!
या रोजगार मेळाव्यात १०वी, १२वी उत्तीर्ण, सर्व शाखांचे पदवीधर, आयटीआय (सर्व ट्रेड), बीई, बीसीए, एमबीए तसेच विविध डिग्री धारकांसाठी ६०० हून अधिक रिक्त पदे उपलब्ध करण्यात आली आहेत.

प्रमुख कंपन्या जिथे नोकरीच्या संधी उपलब्ध:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • जैन फॉर्म फ्रेश, जळगाव
  • युवा शक्ती, नाशिक
  • हिताची ॲस्टीमो ब्रेक प्रा. लि., जळगाव
  • किरण मशिन टूल्स, जळगाव
  • फ्युचर टेक्स, जळगाव
  • टी.डब्ल्यू.जे, जळगाव
  • जैन इरिगेशन प्रा. लि.
  • मानराज मोटर्स, जळगाव
  • गोविंदा एच.आर., नाशिक

अर्ज करण्याची प्रक्रिया:
पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटासह मुलाखतीच्या दिवशी मेळाव्यात हजर राहावे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
कोणत्याही अडचणीसाठी किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते सायं. ६:१५) 0257 – 2959790 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड