भूमी अभिलेख विभागाची पुनर्रचना; सुधारित आकृतिबंधानुसार भरती होणार | Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2026

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2026

भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यभर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयांच्या पदभाराबाबत जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनी आदेश जारी केले आहेत. शासनाच्या २२ मार्च २०२६ च्या निर्णयानुसार विभागातील पदसंख्येत वाढ करून सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली आहे. नगर भूमापनची नवीन कार्यालये १५ जून पासून कार्यान्वित करण्यात आली आहेत.

भूमी अभिलेख विभागात यापूर्वी मंजूर असलेल्या पदांमध्ये वाढ करून एकूण पदसंख्या वाढविण्यात आली आहे. या सुधारित रचनेनुसार उपसंचालक भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख संवर्गातील काही नवीन कार्यालये आणि पदे निर्माण करण्यात आली आहेत. विद्यमान अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नांदेड, पुणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आदी विभागांतील नव्याने निर्माण झालेल्या जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांचाही अतिरिक्त्त कारभार संबंधित विद्यमान अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, ठाणे, पालघर, रायगड, जालना, बीड, परभणी, लातूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील नगर भूमापन अधिका कार्यालयांच्या नव्या पदांच अतिरिक्त कार्यभारही संबंधि उपअधीक्षक अथवा नगर भूमापन अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.


Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2026

प्रशासनिक कामकाज अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाच्या सुधारित आकृतिबंधानुसार राज्यात ५० नवी कार्यालये स्थापन करण्यात येणार असून १०,६८३ पदांच्या नव्या संघटनात्मक रचनेलाही अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून त्यासंदर्भातील शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे. महसूल विभागाच्या नियंत्रणाखालील भूमी अभिलेख विभागात वाढत्या कामाच्या ताणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ११ मार्च २०२६ रोजी १०,६८३ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी दिली होती. त्याअंतर्गत राज्यभरात अनेक नवीन कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. आता या कार्यालयांच्या कार्यक्षेत्रासह मुख्यालयांची निश्चिती करण्यात आली आहे. शासकीय आदेशानुसार राज्यात उपसंचालक, भूमी अभिलेख यांचे १ नवीन कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची ८ कार्यालये, नगर भूमापन अधिकाऱ्यांची २३ कार्यालये तसेच विशेष उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची १७ नवीन कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

राज्य सरकारकडून महसूल विभागात सातत्याने नवे शासन निर्णय जाहीर केले जात असताना, दुसरीकडे भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची गंभीर कमतरता समोर आली आहे. राज्यातील मंजूर ९,६८७ पदांपैकी तब्बल २,८३२ पदे रिक्त असल्याने विभागावर मोठा ताण निर्माण झाला असून, सरकारने आता मोजणीची कामे खासगी आरेखकांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून प्रशासन स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विविध स्तरांतून होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मुख्य भूमापक संवर्गातील ४,२९९ पदांपैकी २७.४२ टक्के (१,१७९ पदे) रिक्त आहेत. सध्या शहरीकरण आणि डिजिटल मोहिमांमुळे मोजणीचे काम चार पटीने वाढले आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा बळकट करण्याऐवजी सरकारने खासगीकरणाचा सोपा मार्ग निवडला. सरकारी भूमापकावर प्रशासकीय नियंत्रण असते; पण खासगी आरेखकांवर कोणाचे नियंत्रण असणार? अव्वाच्या सव्वा फी वसूल करणे, पैशांच्या बळावर धनदांडग्यांच्या बाजूने नकाशे बदलणे आणि सीमावादाला खतपाणी घालणे, अशा गंभीर गैरप्रकारांना या निर्णयामुळे थेट मूकसंमती मिळणार नाही का, या भीतीने शेतकरी ग्रासले आहेत. एका भूमापकावर ३ ते ४ तालुक्यांचा भार असल्याने शासकीय यंत्रणेचे दिवाळे निघाले आहे.

विभागात निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या राजपत्रित अधिकाऱ्यांची पदेही मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अत्यंत संवेदनशील असलेल्या ‘उपअधीक्षक भूमी अभिलेख’ (वर्ग २) संवर्गातील २५६ पदांपैकी १०० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. म्हणजेच, राज्यातील ३० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये हक्काचे उपअधीक्षकच नाहीत

वरिष्ठ स्तरावरील चिंताजनक
अधीक्षक भूमी अभिलेख (वर्ग १) : ३६ मंजूर पदांपैकी ११ पदे रिक्त.
जिल्हा अधीक्षक (एसएलआर वर्ग १) : जिल्हा पातळीवरील १४ पदे प्रभारी कारभारावर.
मदतनीस संचालक/उपसंचालक : विभागीय स्तरावरील ८ पदे रिक्त.

नेमकी कुठली कामे जास्त वाढली?
‘ई-फेरफार’ आणि डिजिटल ७/१२ दुरुस्त्या तक्रारींमध्ये ३०० टक्के वाढ.
तातडीने भूसंपादन : समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन व राष्ट्रीय हायवे प्रकल्पांसाठी संयुक्त मोजणी.
‘स्वामित्व योजना’: ड्रोनद्वारे हजारो गावांचे गावठाण भूमापन.
कौटुंबिक वाद: ग्रामीण भागातील वाटण्या आणि पोटहिस्सा मोजणीचे प्रलंबित अर्ज.


Bhukarmapak Recruitment 2026

Bhumi Abhilekh Recruitment Bharti 2026– Good News, The recruitment process of bhumi Abhilekh Recruitment 2026 For Various vacancies Will start soon. The Online Application Link will Active soon in 2026. An examination will be organized to fill various vacant posts in the ‘Group C’ Land Surveyor cadre in the Land Records Department and online applications will begin soon. A total of 1,160 posts are vacant in the Land Surveyor cadre in the state, out of which 903 posts will be filled through direct service.  So very soon, submit your Application forms of Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2026.

 

मित्रांनो, एक मोठा अपडेट समोर आला आहे. जर आपण भूमी अभिलेख भरतीची तयारी करत असाल किंवा मागील वर्षी अर्ज केला असेल तर आपल्यासाठी गुड न्यूज! राज्याच्या भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांच्या वेतनश्रेणीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भूकरमापकांना एस- ६ वेतनश्रेणीमधून एस-८ वेतनश्रेणीमध्ये नेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (दि. १ एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना दिली. भूमिअभिलेख विभागातील भूकरमापकांची वेतनश्रेणी एस- ६ होती. पुढच्या तीन वर्षांमध्ये एस- ६ ही वेतनश्रेणी बंद होऊन सर्व भूकरमापकांना एस-८ मध्ये आणणार आहोत. आम्हाला एस-८ श्रेणीमध्ये आणा, अशी भूकरमापकांची २००३ पासून जी मागणी होती; ती आता पूर्ण झालेली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाईल. पुढच्या एक ते दीड वर्षांमध्ये एस- ६ श्रेणी बंद होईल आणि एस-८ श्रेणी राहील, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यातील भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक गेल्या अनेक वर्षांपासून कमी वेतनावर काम करत आहेत. त्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी विविध संघटनांनी अनेकवेळा आंदोलने आणि बेमुदत संप केला होता. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आता त्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू होणार असल्याने त्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. दरम्यान, भूमिअभिलेख विभागाने गट क भूकरमापक संवर्गाच्या ९०३ जागांसाठी सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. जमिनीच्या पोटहिश्श्याची मोजणी २०० रुपयांत, दोनच सुनावण्यांमध्ये वाद निकाली निघणार, मंत्री बावनकुळेंची माहिती.

Bhumi Abhilekh Bharti 2025 Education

 


 

: : Previous Updates : :

 

भूमी अभिलेख विभागातील ‘गट क’ भू-करमापक संवर्गातील ९०३ रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून १ ते २४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात भू-करमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३ पदे, कोकण (मुंबई) विभाग – २५९, नाशिक – १२४, छ. संभाजीनगर – २१०, अमरावती – ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. 

 

उमेदवारांचे अर्ज https://ibpsreg.ibps.in/gomsep25/(अर्ज लिंक सुरु)  आणि https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळांवर ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच या भरतीची परीक्षा पद्धती आणि सिल्याबस या लिंक वर उपलब्ध आहे.सदर भरतीसाठी १३ व १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील परिपत्रक खाली दिले आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

👉🏿 एकूण ९०५ जागा
📎 पुणे – 83
📎 कोकण – 259
📎 नाशिक – 124
📎 छत्रपती संभाजीनगर – 210
📎 अमरावती – 117
📎 नागपूर – 110

  • पदाचे नाव –  भूकरमापक
  • पद संख्या –903
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • परीक्षा शुल्क –
    • अमागास वर्ग – 1000/-
    • मागास वर्ग – 900/-

मान्यताप्राप्त महाविद्यालयातील किंवा संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरींग) धारक, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेनंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र (आयटीआय सर्व्हेअर) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल. आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्र पडताळणी करून विभागनिहाय अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल, असे राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.तसेच  या भरतीसाठी सराव पेपर्स या लिंक वर उपलब्ध आहे.

Bhumi Abhilekh District Wise Advertisement Links 

Bhumi Abhilekh District Wise All recruitment links are given below. Candidates can Check the details & All related links from following given respective link. For More Updates keep visiting us.

 

How To Apply For Amravati Bhumi Abhilekh Bharti 2025

Candidates’ applications will be accepted online on the websites https://ibpsreg.ibps.in/gomsep25/(Application link is open) and https://mahabhumi.gov.in. Also, the examination pattern and syllabus of this recruitment are available on this link. An online examination will be conducted for this recruitment on 13 and 14 November 2025. The circular in this regard is given below. Also, to get all the latest updates regarding this recruitment on time, click here to download the official mobile app of Mahabharti on your mobile immediately through given application form Link.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
ऑनलाईन अर्ज लिंक 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025  – As per the Latest Update received, Last year, about 700 out of 1200 posts of bhukarmapak –  land surveyors recruited in the Land Records Department had resigned due to getting a better government job option. Therefore, the state government has approved the recruitment of new posts in the vacant posts. Accordingly, now 700 land surveyors will be recruited in the Land Records Department. The Land Records Department said that this process will be started soon this bhukarmapak Bharti 2025 process.

The state government has given in-principle approval to the Land Records Department to recruit a total of 905 posts including stenographers and surveyors under Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025. This number will be increased as per the vacancies in the revenue divisions of Pune, Mumbai, Nashik, Chhatrapati Sambhajinagar, Amravati, Nagpur. The Land Records Department of the state government is very important in the revenue department. Land survey cases are settled through this department. For this, 1,200 land surveyors were recruited in the state two years ago. However, about 700 people resigned from their jobs due to various reasons.

Due to this, the posts of land surveyors working in various revenue departments became vacant. This started affecting the survey. Many surveys started getting pending. Keeping this in mind, a proposal was sent to the state government by the Land Records Department for the recruitment of land surveyors again in Bhumi Abhilekh Vibhag Recruitment 2025 Application Form Process.

This proposal has been accepted in principle. Meanwhile, along with these posts, the government has also approved recruitment for the posts of Stenographer (Upper Grade) and Stenographer (Lower Grade).

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड