भूमि अभिलेखच्या साडेतीन हजार उमेदवार परीक्षेनंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत!! । Bhumi Abhilekh Exam Result

Bhukarmapak Bhumi Abhilekh DV Lisy 2025 – 2026

भूमी अभिलेख विभागात भूकरमापकांची सुमारे दोन हजार पदांची आवश्यकता असताना गेल्या वर्षी ९०३ पदांसाठी सुरू केलेली भरती प्रक्रिया राज्य सरकारने अद्याप पूर्णच केलेली नाही. साडेतीन हजार पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करूनही नियुक्ती न मिळाल्याने साडेतीन हजार उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, हे पदच मृत केल्याने या पदांच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.राज्यात मोजण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत भूमापकांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक भूमापकांची गरज आहे. गेल्या वर्षी भूमापकांच्या ९०३ पदांसाठी राज्य सरकारने निवड प्रक्रिया राबविली. त्यासाठी परीक्षा घेण्यात आली. ९०३ जागांसाठी सुमारे ३५ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे ३० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी साडेतीन हजार उमेदवार पात्र ठरले. त्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. आता हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्या वेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमापक हे पद मृत होत असल्याचे जाहीर केले; त्यामुळे यापुढे या पदावर नियुक्ती राबविण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. ९०३ पदांची भरती सुरू असताना राज्यात एक हजार ३७२ पदे रिक्त आहेत. दरम्यान, या पदांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; त्या वेळी जमाबंदी आयुक्तांनी भूमापकांच्या नियुक्तीसाठी हिरवा कंदील दाखवून त्याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठविल्याचे सांगितले होते; त्यामुळे नियुक्ती होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. प्रतीक्षा यादी दोन वर्षे वैध आहे. जमाबंदी आयुक्तांनी भूमापकांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी ‘वाटाण्याच्या अक्षता’ दाखविल्या आहेत.

दिलासा देण्याची विद्यार्थ्यांची मागणी – अनेक विद्यार्थी भूमापक पदांसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करीत आहेत. ही नोकरी त्यांच्यासाठी रोजगाराबरोबरच त्यांच्या कुटुबांची आशा आणि स्वप्न आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळू नये. उलट त्यांना सक्षम बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त जागावर रुजू करून घ्यावे. विभागाचा भूमापक नियुक्तीचा प्रस्ताव तातडीवने मंजूर करावा; तसेच विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशा मागणी भूमापक पदाच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांनी केली आहे. भूमापक पद मृत घोषित होणार असल्याने आमच्या आयुष्यातील ही पहिली आणि शेवटची संधी असल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे.

 


Bhumi Abhilekh Exam Result – Check your staus in Document Verification List (DV List) & Online result of Bhumi Abhilekh Land Records & Revenue Department surveyor bhukarmapak Posts. Can check the online result from this page & given link.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो, बहुप्रतीक्षित भूमिअभिलेखच्या ९०३ पदांचा निकाल जाहीर झाला आहे. आता या निकालाचा पुढील टप्पा म्हणजे निवडयादी व प्रतिक्षायादी यादी जाहीर झाली आहे. राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निवडयादी व प्रतिक्षायादी आज २  मार्च  २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. भूमिअभिलेख विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर हा निकाल प्रकाशित झाला होता. आता या वेळापत्रकानुसार आपण हजर रहावे.  आम्ही महाभरतीवर या निकालाची लिंक लवकरच अपडेट करू. तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विभागनिहाय निवडयादी व प्रतिक्षायादी लिंक आज प्रकाशित

 

उपसंचालक भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांच्या अधीनस्त विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी प्रसिद्ध जाहिरातीनुसार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ व १४ नोव्हेंबर २०२५ कालावधीत IBPS कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेस (Computer Based Test) उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांचा गुणानुक्रमे निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) दिनांक ३०/०१/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
ऑनलाईन परिक्षेचा निकाल (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा विचारात घेवून सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक ०४/०५/२०२२ रोजीचा शासन निर्णय व पदभरतीच्या अनुषंगाने प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींनुसार तयार केलेल्या सोबतच्या यादीमधील उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी / तपासणी कामी नमुद ठिकाणी वेळापत्रकानुसार उपस्थित रहाण्याचे आहे.
सोबतच्या यादीमध्ये नमूद उमेदवारांना केवळ कागदपत्रे तपासणीकामी बोलविण्यात आलेले आहे. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले म्हणजे त्यांना अंतिम नियुक्तीसाठी पात्र ठरविलेले नाही. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी / तपासणी अंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदांनुसार अंतिम निवडसुची प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीकामी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना व आवश्यक कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Bhumi Abhilekh DV List 

भूकरमापक पदाच्या भरतीसाठी ३४ हजार ५३२ उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी ३० हजार ६५६ उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ही परीक्षा १३ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रतिदिन दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. पुणे विभागात भूकरमापकांची ८३ पदे असून, त्यासाठी २ हजार ९७३ इतक्या उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली. कोकण विभागातील २५९ जागांसाठी ८ हजार १४८ उमेदवारांनी, नाशिक विभागातील १२४ जागांसाठी ४ हजार ३४० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर छत्रपती संभाजीनगर विभागातील २१० जागांसाठी ८ हजार २७६ उमेदवारांनी, तर अमरावती विभागातील ११७ जागांसाठी ३ हजार ६७९ उमेदवारांनी आणि नागपूर विभागातील ११० जागांसाठी ३ हजार २४० उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली आहे. ऑनलाइन परीक्षेस उपस्थित सर्व उमेदवारांचा विभागनिहाय गुणानुक्रमे निकला ३० जानेवारी २०२६ रोजी संकेतस्थळावर तसेच संबंधित उपसंचालक भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले. तसेच भूमी अभिलेख भरतीचा कट ऑफ या लिंक वर उपलब्ध आहे.

LINK Bhumi Abhilekh Exam Result 2026

 

 


Bhumi Abhilekh Revised WAITING List

भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतीक्षायादी प्रसिद्ध केली आहे. जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन परीक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने १७ ते २१ एप्रिल २०२३ या कालावधीत कागदपत्रे पडताळणी केली होती. त्यात पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन यापूर्वी प्रतिक्षा यादी (NEW REVISED WAITING LIST)प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षा यादी उपसंचालक भूमी अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयांच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने यांनी दिली. 

 

Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 2026 

RecruitmentMaha Bhumi Abhilekh Group C Recruitment 2025
Supervising AgencyLand Records & Revenue Department
Application Dates
Total vacancies930 Posts
Exam Date १३ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५
Selection ProcessWritten Exam and DV
Mahabhumi.gov.in Surveyor Cum Clerk Result 21 January 2025

How To Check Bhumi Abhilekh Group C Bharti Result?

  • उमेदवारांना प्रथम महाराष्ट्र भूमी अभिलेख भरती अधिकृत वेबसाइट म्हणजेच https://landrecordsrecruitment2021.in/ ला भेट द्यावी लागेल.
  • मुखपृष्ठावरून महा भूमी अभिलेख निकाल 2025 ताज्या अपडेट्स तपासा.
  • येथे भूमी अभिलेख भरती गट क लेखी परीक्षा निकाल 2025 डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला जिल्ह्यावर निकाल पीडीफ दिसेल
  • तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करा
  • आता विभागानुसार पीडीफ ओपन होईल
  • पीडीफ ओपन झाल्यावर भूमि अभिलेख निकाल 2025 PDF तपासा आणि नावे, DOB आणि इतर तपशील तपासून निवडीची पुष्टी करा.

Table of Contents

4 thoughts on “भूमि अभिलेखच्या साडेतीन हजार उमेदवार परीक्षेनंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत!! । Bhumi Abhilekh Exam Result”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड