मुंबई येथी बेस्ट विद्युत विभागात लवकरच पदभरती होणार असल्याचे चित्र आहे. या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून, हि प्रक्रिया लवकरच सुरु होईल. विद्युत विभागातील मंजूर ५०० रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेस्टच्या विद्युत विभागासह पर्सनल विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत, ही पदे तातडीने भरा, असे निर्देश बुधवारी महापालिका अतिरिक्त अश्विनी जोशी यांनी दिले BEST Electrical Recruitment 2025 @ bestundertaking.com . त्यामुळे विद्युत विभागातील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बेस्ट उपक्रम सध्या वाऱ्यावर असून उपक्रमाला गेल्या काही दिवसापासून स्वतंत्र महाव्यवस्थापक नाही. त्यामुळे उपक्रमाची तात्प रती जबाबदारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टमधील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी बेस्ट कामगार सेनेसोबत जोशी यांची संयुक्त बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, उपाध्यक्ष मनोहर जुन्नरे, भास्कर तोरसकर, गणेश शिंदे व बेस्टचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

BEST मुंबई मध्ये बस ड्रायव्हर, कंडक्टर पदांची भरती सुरु! – त्वरित करा अर्ज..
या बैठकीत विद्युत विभागातील रिक्त पदांना महाव्यवस्थापकांनी सहा महिन्यापूर्वी मंजुरी दिली असतानाही पदे अद्यापपर्यंत भरण्यात आली नाहीत, याकडे कामगार संघटनांनी लक्ष वेधले असता, जोशी यांनी विलंब का झाला याबद्दल बेस्टच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. गोंधळून गेलेल्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. जोशी यांनी तातडीने पदे रिक्त भरा, असे निर्देश दिले. ९ डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या कुर्ला येथील जीवघेण्या अपघातप्रकरणी बस चालकाला ट्रेनिंग देण्यात आले नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात बस पुरवठा करणाऱ्या मोरया कंपनीच्या सब कंत्राटदारास बस पुरवण्याची परवानगी दिली होती का, याची चौकशी करण्याची मागणी यावेळी कामगार नेत्यांनी केली. बेस्ट मालकीच्या बस खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला होता. मात्र या बस खरेदी करण्यात आल्या नाहीत, याकडे लक्ष वेधले असता जोशी यांनी अशा प्रकारचा लिखित करार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















