चारचाकी वाहनांमुळे लाडक्या बहिणीचं पेमेंट अडकलं, आता पैसे थेट…! – Benefit for ‘Ladki Bahini’ Delayed Due to Four-Wheelers!
Benefit for ‘Ladki Bahini’ Delayed Due to Four-Wheelers!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांसाठी फेब्रुवारी महिन्यातील रकमेत विलंब झाला आहे. दर महिन्याच्या १५ तारखेला हा लाभ मिळणे अपेक्षित असते, मात्र फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही तो मिळालेला नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाईल. त्याचदरम्यान, चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थी महिलांची पडताळणी पूर्ण केली जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ११.०६ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. यापैकी साडेबारा हजार महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाकडून अधिकाऱ्यांना मिळाली असून, त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची तपासणी अंगणवाडी सेविका करत आहेत. ही पडताळणी अद्याप पूर्ण न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कागदपत्रांवरील सवलत, स्वतःच्या मोबाईलवरून अर्ज भरता येण्याची सुविधा आणि मदतीसाठी अंगणवाडी सेविका नियुक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही अपात्र महिलांनीही अर्ज केले. मात्र, सध्या पडताळणी सुरू असल्याने आणि भविष्यातील कारवाईच्या भीतीमुळे जिल्ह्यातील ५२ महिलांनी ऑफलाइन अर्ज करून योजनेचा लाभ बंद करण्याची विनंती केली आहे. या महिलांनी स्वतःला नोकरी लागली, पतीला चांगला रोजगार मिळाल्यामुळे उत्पन्न वाढले यासारखी विविध कारणे दिली आहेत. काहींनी कोणतेही कारण न देता लाभ बंद करण्याची मागणी केली आहे.
चारचाकी वाहन पडताळणी अंतिम टप्प्यात
ज्या लाभार्थी महिलांकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल विभागाकडे सादर केला जाईल. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास ५० महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारला आहे.
– रमेश काटकर, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, सोलापूर