शैक्षणिक हब असलेल्या “या” जिल्ह्यात दहा हजार शिक्षक भरती करणार ! – Belgaum Teacher Recruitment 2024

Belgaum Shikshak Bharti 2024

शैक्षणिक हब म्हणून बेळगाव जिल्ह्याची ओळख आहे: मात्र जिल्ह्यातील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत ४४८४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात खानापूर तालुक्यात सर्वाधिक ३९४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

जिल्ह्याचा विस्तार मोठा असल्याने बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्हा अशी विभागणी केली आहे. दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांत सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या अधिक आहे. मात्र, काही वर्षांपासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा दर्जा घसरत असल्याचे दिसत आहे. त्याला शिक्षकांची कमतरता आहे, हे मुख्य कारण असल्याचे मत व्यक्त होत आहे. रिक्त जागांवर कायमस्वरूपी शिक्षकांची भरती करण्याऐवजी अतिथी शिक्षकांची नेमणूक करून वेळ मारून नेली जाते. सध्या शिक्षण खात्याच्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यात ४४४८ जागा रिक्त आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्राथमिकप्रमाणेच माध्यमिक शाळांतही शिक्षकांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. सरकारी शाळांत गुणात्मक शिक्षण मिळावे, तसेच विद्याध्यर्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सरकारतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. वेळेत शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण खात्याच्या माहितीनुसार सध्या राज्यात पन्नास हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच दहा हजार शिक्षकांच्या भरतीला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या मोठी असल्याने एकाच वेळी अधिक प्रमाणात जागा भरती करणे गरजेचे आहे.

 


 

नव्या शैक्षणिक वर्षामध्ये अतिथी शिक्षकांच्या ३५ हजार जागा भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात १४५७ अतिथी शिक्षक भरती केले जाणार आहेत. याबाबत लवकरच अर्ज प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली.  

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. रिक्त असलेल्या जागांमध्ये इंग्रजी व इतर विषयांच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या जागांवर दरवर्षीप्रमाणे या वेळीही अतिथी शिक्षक भरती केले जाणार आहेत.

गेल्या काही वर्षापासून शिक्षक भरतीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मात्र, शिक्षक भरती करण्याबाबत सातत्याने चालढकल केली जात होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात १३ हजार शिक्षकांच्या जागा भरती करण्यात आल्या आहेत; तरीही राज्यात ५० हजार शिक्षकांची कमतरता आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात शाळांना हजेरी लावली होती. सोमवारपासून मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत दाखल झाले असून, शिक्षण खाल्याने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सोमवारी ७० टक्के विद्यार्थी हजर होते. येत्या दोन-तीन दिवसात विद्यार्थ्यांची हजेरी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास शिक्षण खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. शाळांना सुरुवात झाल्यापासून शिक्षण खात्याकडून दररोज किती विद्यार्थी हजर झाले आहेत, याची माहिती घेतली जात आहे.


Belgaum Teacher Recruitment 2024 –  राज्यात दहा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी (Teacher Recruitment) जूनमध्ये महिन्यात टीईटी होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने टीईटीची (TET Exam) तयारी करण्याची सूचना केली असून, परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण खात्याकडून २०१४ पासून टीईटी परीक्षा घेतली जात आहे. मात्र, टीईटी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने शिक्षक भरती करण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पास होणाऱ्या परीक्षार्थीना गुणवत्तेनुसार शिक्षक भरतीसाठी प्राधान्य दिले जाते. मात्र सीईटी पास होणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दोन ते तीन टक्के असते. त्यामुळे शिक्षण खात्याने (Education Department) अधिक प्रमाणात जागा भरण्याचा निर्णय घेतला तर सीईटी परीक्षेत गुणवत्ता मिळविले परिक्षार्थी कमी असतात त्यामुळे अधिक प्रमाणात जागा असूनही शिक्षक भरती साठी मंजूर झालेला जागा रिक्त राहत आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

त्यामुळे शिक्षण खात्याने १३५०० शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात पुन्हा टीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्व जागा भरती करण्यास अडचण येणार नाही असे मत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीपासून शिक्षण खात्याने राज्यात १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून अनेक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सिंधुत्व प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने काही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही त्यामुळे काही पात्र उमेदवारांची चिंता वाढली आहे. मात्र ज्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे त्या शिक्षकांना कोणतीही अडचण होणार नाही त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी टीईटी आवश्‍यक

राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच दर वर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी रिक्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत जात आहे. त्याचा विचार करून दरवर्षी शिक्षकांच्या जागा भरती करणे गरजेचे बनले आहे. मात्र पाच ते सहा वर्षांतून एकदा शिक्षक भरती केली जात आहे. त्यामुळे अनेक शाळांची मोठी अडचण होत असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी टीईटी घेऊन अधिक प्रमाणात शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे.

 


The Education Department has decided to recruit another 20,000 teachers. Accordingly, the process for teacher recruitment will be implemented soon. This will provide employment opportunities to DEd and B.Ed. The process of recruiting 13,500 teacher posts in the state has been going on for the past few days and so far many teachers have been given appointment letters. “We have decided to re-recruit teachers as there are a large number of vacant teaching posts in government schools even though teachers are being admitted in various schools.

 

शिक्षण खात्याने (Education Department) आणखी २० हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे डीएड आणि बीएड्धारकांना (D.Ed and B.Ed) रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपासून राज्यात १३५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे कल वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरीही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरती होण्यास अडचण होत आहे, मात्र दरवर्षी शिक्षक भरती झाली तर डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, तसेच विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकारच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील ९० टक्‍के विनाअनुदानित डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात एकूण ८४ डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थी अधिक प्रमाणात होते.

मात्र, अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे, मात्र १३५०० शिक्षकांच्या भरतीनंतर पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती केली असल्याने डीएड व बीएड महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. मोनिका प्रवीण सोनवणे says

    Tet exam कधी असेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड