महापालिकेच्या शंभर सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेत ९४ जणांची तात्कालिक निवड यादी प्रसिद्ध | Safai Kamgar Bharti 2024-25

Belgaum Safai Kamgar Bharti 2024-25

Belgaum Safai Kamgar Selection List

Belgaum Safai Kamgar Bharti 2024-25: महापालिकेच्या सफाई कामगार भरतीवर १७ आक्षेप दाखल झाले आहेत. महापालिकेच्या शंभर सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेत ९४ जणांची तात्कालिक निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्या यादीवर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानुसार १७ आक्षेप दाखल झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीची बैठक शनिवारी (ता. २१) महापालिकेत झाली. त्या बैठकीत या आक्षेपांवर चर्चा करण्यात आली. निर्धारित वेळेत ते आक्षेप दाखल न झाल्याने ते निकालात काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ज्या ९४ जणांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे, तीच यादी अंतिम यादी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९४ जणांना लवकरच नियुक्तीपत्र दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेत शंभर सफाई कामगारांची भरती प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती; पण त्याआधीची १५५ सफाई कामगारांची भरती प्रक्रिया रखडल्याने ही शंभर जणांची भरतीही थांबली होती. १ जानेवारी २०२५ रोजी १५५ सफाई कामगारांपैकी १५४ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर लगेचच शंभर जणांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. लोकसभा निवडणूक व विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली; पण सप्टेंबर महिन्यात सफाई कामगार हितरक्षण समिती तसेच या भरतीसाठी अर्ज दाखल केलेल्या सफाई कामगारांनी मोठे आंदोलन केले.

सफाई कामगार दिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्जाची फेरपडताळणी सुरू झाली. त्यासाठी काही कामगारांची नियुक्ती करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात तात्कालिक निवड यादी तयार करण्यात आली; पण आधी भरती झालेल्या काहींची नावे त्यात समाविष्ट झाली होती. त्यामुळे ती यादी रद्द करुन नवी यादी तयार करण्यात आली. नोव्हेंबर अखेरीस तात्कालिक यादी जाहीर करण्यात आली. त्यावर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.

या यादीबाबत एक कायदेशीर नोटीस महापालिकेला बजाविण्यात आली होती, त्याला महापालिकेकडून उत्तर देण्यात आले आहे. मात्र, संबंधितांकडून भरती प्रक्रियेच्या विरोधात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने कॅव्हेट दाखल केले आहे.


Belgaum Safai Kamgar Bharti 2024 Update

Belgaum Safai Kamgar Bharti 2024: सफाई कामगारांची निवड यादी शनिवारी (ता. ३०) रात्री उशिरा बेळगाव महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याचे कारण देत काही अर्जदारांना डावलण्यात आल्याची तक्रार आहे. शिवाय बारा वर्षे कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून सेवा बजावणाऱ्या सफाई कामगारांची नावेही यादीतून वगळण्यात आली आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शंभर सफाई कामगारांची भरती महापालिकेत केली जाणार आहे; पण ९४ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी सहा जागा राखीव आहेत. त्यासाठी पात्र उमेदवार न मिळाल्याने त्या सहा जागा रिक्त राहिल्याची माहिती मिळाली आहे. या निवड यादीवर आक्षेप मागविण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने आक्षेप दाखल होण्याची शक्यता आहे. निवड यादीत नाव असलेल्यापैकी काहीजण निरक्षर आहेत. निरक्षरांना सफाई कामगार होता येते, मग मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्यांना सफाई कामगार होता येत नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बेळगाव महापालिकेतील शंभर सफाई कामगारांची भरती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या भरती प्रक्रियेला विलंब झाल्याची तक्रार अर्जदारांकडून होत होती.

सफाई कामगार भरती
प्रक्रियेत कन्नड माध्यमात शिकलेल्यांसाठी काही जागा राखीव होत्या. अन्य माध्यमांत शिकलेल्यांना सामान्य प्रवर्गात समाविष्ट केले आहे. मराठी माध्यमात शिकल्यामुळे निवड यादीत स्थान दिले नसल्याचा प्रकार झाला असेल, तर रीतसर तक्रार द्यावी, उदयकुमार तळवार, प्रशासन उपायुक्त, बेळगाव महापालिका


Belgaum Safai Kamgar Bharti 2023

Belgaum Safai Kamgar Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Safai Kamgar Bharti 2022. As per the latest news, There are a total of 350 posts will be filled in Municipal Corporation and a total of 11,000 posts of sweepers are to be filled in all the city local bodies across the state. Further details are as follows:-

660 posts of sweepers are approved for Belgaum Municipal Corporation. Only 135 sweepers are in service as many sweepers have retired in the past few years. As per the decision taken by the state government in the year 2018, the recruitment process of 153 posts is going on. More than 900 applications filed for the same are being verified, but the decision taken on Monday has given a big relief to the municipal corporation.

Belgaum Safai Kamgar Recruitment 2023

मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी (ता. १९) झालेल्या निर्णयामुळे बेळगाव महापालिकेत आणखी ३५० सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे. राज्यातील नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांची रिक्त असलेली सर्व पदे भरण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार राज्यभरातील सर्व नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळून एकूण सफाई कामगारांची ११ हजार पदे भरली जाणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बेळगाव महापालिकेसाठी सफाई कामगारांची ६६० पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक सफाई कामगार निवृत्त झाल्यामुळे केवळ १३५ सफाई कामगार सेवेत आहेत. २०१८ साली राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १५३ पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दाखल झालेल्या ९०० हून अधिक अर्जाची पडताळणी केली जात आहे, पण सोमवारी झालेल्या निर्णयामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Safai Kamgar Bharti 2023

Belgaum Safai Kamgar Bharti 2022


Belgaum Safai Kamgar Bharti 2023

Belgaum Safai Kamgar Bharti 2022 : Belgaum Municipal Corporation will directly recruit 155 cleaners and the process has been started by the Municipal Corporation. Further details are as follows:-

बेळगाव महापालिकेकडून १५५ सफाई कामगारांची थेट भरती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. यासाठी आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची बैठक आज महापालिकेत झाली. त्यात सफाई कामगारांच्या भरतीसाठी वेळोवेळी राज्य शासनाकडून बजावण्यात आलेल्या अध्यादेशांचा अभ्यास करण्याचा निर्णय झाला.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. महापालिकेकडे सध्या 132 नियमित सफाई कामगार आहेत.

Belgaum Safai Kamgar Recruitment 2023

Belgaum Safai Kamgar Bharti 2022

Belgaum Safai Kamgar Bharti 2022

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    selection list

  2. SHYAM Nimbolkar says

    Office boy simple girl

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड