जिल्हा पुरवठा विभागात ११० पदे रिक्त, पुरवठा विभागाची भरपूर जागा रिक्त!- District Supply Officer Bharti
District Supply Officer Bharti
District Supply Officer Bharti Details
पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी १३३ आणि शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी पुणे जिल्ह्याकरिता २०९ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी तब्बल ११० पदे रिक्त असल्याची कबुली राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात दिली. विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ त्यांनी ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ते म्हणाले, की पुणे जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना मिळून एकूण नऊ लाख ६१ हजार २८२ शिधापत्रिकाधारक आहेत. खात्याच्या आकृतिबंधाबाबत शासन शुद्धिपत्रक १५ डिसेंबर २०२२ नुसार जिल्हा पुरवठा कार्यालय, पुणेसाठी १३३, शहर अन्नधान्य वितरण कार्यालयासाठी ७६ अशी मिळून पुणे जिल्ह्यासाठी २०९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत जिल्हा पुरवठा कार्यालय पुणे येथे ५९, अन्नधान्य वितरण कार्यालय येथे ४० असे ९९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. पुरवठा विभागाची ५० टक्के पदे रिक्त असल्याचे आणि मंजूर पदांपेक्षा प्रत्यक्षात कमी पदे भरल्याची बाब अंशतः खरी आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शहराच्या पुरवठा कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांसह सर्व पदे रद्द झाल्यामुळे या कार्यालयाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, इचलकरंजी हे महापालिकेचे शहर असल्याने हे कार्यालय गोरगरिबांसाठी सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी या कार्यालयातील रद्द झालेली पदे पुन्हा स्थापित करण्याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाने प्रस्ताव द्यावा. खास बाब म्हणून ही पदे पुनर्स्थापित करून हे कार्यालय पूर्ववत सुरू ठेवण्यात येईल, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत भेट घेऊन त्यांना हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. त्यावेळी कार्याध्यक्ष अमित गाताडे व सुभाष मालपाणी उपस्थित होते. इचलकरंजी शहरात अनेक वर्षांपासून पुरवठा कार्यालय अस्तित्वात असून सुमारे ९० हजार रेशनकार्डधारकांना सेवा पुरवली जाते. येथे एक पुरवठा निरीक्षण अधिकारी व इतर पाच कर्मचाऱ्यांची आस्थापना मंजूर होती. जुलै २०२२ मध्ये नव्याने आस्थापना मंजूर करताना अनावधानाने या कार्यालयाची पदे रद्द झालेली आहेत. त्यामुळे या कार्यालयाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.
मार्च २०२३ मध्ये डोंगरे नामक पुरवठा अधिकारी यांची बदली झाल्यापासून येथील पद रिक्त आहे. ही पदे भरण्यात यावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह चोपडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती सांगितल्यानंतर खासबाब म्हणून ही पदे पुनर्स्थापित करून इचलकरंजी कार्यालयाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यात येईल. यासाठीचा प्रस्ताव अन्न नागरी विभागांनी तातडीने सादर करावा, असे आदेश मंत्री पवार यांनी दिले. दरम्यानच्या कालावधीत इचलकरंजी पुरवठा कार्यालयासाठी जिल्ह्यातील अन्य नायब तहसीलदाराची तात्पुरती नियुक्ती देण्याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आदेश दिले असल्याची माहिती विठ्ठल चोपडे यांनी दिली.
राज्यभरातील २०३ पुरवठा निरीक्षकांच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी पदावर पदोन्नत्या रखडल्या आहेत. याबाबत नागरी पुरवठा अधिकारी कर्मचारी संघटनेने उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. अन्न पुरवठा खात्यात पुरवठा निरीक्षक अधिकारीपदावर पदोन्नतीसाठी राज्यभरातील २०३ कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. या यादीला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली आहे. सुरुवातीला ही पदोन्नती प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून होत होती. पण २०१७ मध्ये निरीक्षण अधिकारी पदास राजपत्रित दर्जा प्रदान करण्यात आल्याने ही प्रक्रिया राज्यस्तरावरून केली जाते.
दरम्यान, पुरवठा निरीक्षण अधिकारी पदाच्या सेवा प्रवेशाबाबतच्या नियमात २८ मार्च २०२३ मध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार ८० पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांची पदे पदोन्नतीने व २० टक्के सरळ सेवा भरतीने अर्थात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून भरायची होती. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानुसार राज्यस्तरावर महसुली विभागांतर्गत २०३ पुरवठा निरीक्षकांची १८ मे २०२३ रोजी ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली. त्याला विभागीय पदोन्नती समितीने मान्यता दिली. मात्र, अद्यापही पदोन्नत्या झाल्या नाहीत.
बहुतांश पदे विदर्भातील २०३ रिक्तपदांपैकी बहुतांश पदे ही विदर्भातील आहेत. या विभागातील पुरवठा निरीक्षक पाच-सात वर्षांपासून त्याच पदावर कार्यरत आहेत. अलीकडेच शासनाने या यादीतील दोन उमेदवारांना क्रम डावलून पदोन्नत्या दिल्या व उर्वरित उमेदवार अद्यापही प्रतीक्षेत आहेत, असा आरोप नागरी पुरवठा अधिकारी कर्मचारी संघटनेने केला आहे.
Beed District Supply Officer Bharti : The process of filling up the vacancies of District Supply Officers has started, said Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal in the Assembly. Mr. Bhujbal said that it has been observed that 5 thousand 498 ration cards were distributed from Beed tehsil office without following the prescribed procedure. Further details are as follows:-
Zilla Purvatha Adhikari Bharti 2022 | MahaFood Bharti 2022
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ. जिल्हा पुरवठा अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असून याबाबत अधिक पाठपुरावा करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्हा सार्वजनिक वितरण पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका गहाळ झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य संदीप क्षीरसागर, प्रशांत बंब आणि प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता.
श्री. भुजबळ म्हणाले की, बीड तहसील कार्यालयामधून 5 हजार 498 शिधापत्रिका विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता वितरित झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोषी असलेल्या तत्कालिन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तत्कालिन अव्वल कारकून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे. त्याशिवाय बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हे रिक्त पद भरण्याची कार्यवाही देखील सुरु आहे.
Mr. Bhujbal said that it has been observed that 5 thousand 498 ration cards were distributed from Beed tehsil office without following the prescribed procedure. A proposal has been made to the Divisional Commissioner to start a departmental inquiry against the then Assistant District Supply Officer, Deputy Tehsildar and the then top clerk who were found guilty in this case by the Beed District Collector. Apart from that, the process of filling up the vacant post of Beed District Supply Officer is also underway.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवलरच प्रकाशित करू …
Table of Contents
No