राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीईने नुकताच एक वर्षाचा बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता देशात एक वर्षाचा मास्टर ऑफ एज्युकेशन (एम.एड.) अभ्यासक्रमदेखील सुरू होणार आहे BEd MEd Course admission 2025. आतापर्यंत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता. २०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. अभ्यासक्रम बंद होणार आहे. एक वर्षाच्या मास्टर्स प्रोग्रामसाठी २०२५ मध्ये शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले जातील. त्यानंतर हा अभ्यासक्रम २०२६-२७ या सत्रापासून सुरू होईल. एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम सुरू झाल्यावर २०२६ पासून दोन वर्षांच्या एम.एड. कार्यक्रमाचे प्रवेश घेतले जाणार नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

याविषयी माहिती देताना एनसीटीईचे अध्यक्ष प्राध्यापक पंकज अरोरा म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या शिफारशींच्या आधारे, यूजीसीने जून २०२४ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्याच मार्गदर्शक तत्त्वांनुसार एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. एक वर्षाचा बी.एड, दोन वर्षांचा पदवी शिक्षण कार्यक्रम किंवा ४ वर्षांचा एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम (आयटीईपी ITEP Admission ) अभ्यासक्रम अशा तिन्ही श्रेणीपैकी कोणत्याही एक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला विद्यार्थी एक वर्षाच्या एम.एड. अभ्यासक्रम करण्यास पात्र राहणार आहे, अशी माहिती प्राध्यापक पंकज अरोरा यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















