१२ वी पास आहेत? चला मग पायलट बना आणि महिन्याला लाखोंची कमाई करा! – 12th Pass? Become a Pilot and Earn Lakhs per Month!
12th Pass? Become a Pilot and Earn Lakhs per Month!
मित्रांनो, जर तुमचे स्वप्न पायलट बनण्याचे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. पायलट होण्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो, कुठे ट्रेनिंग मिळते, त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, आणि कोणत्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात, याबद्दल संपूर्ण माहिती येथे दिली आहे. जर तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल, तर तुम्ही पायलट बनू शकता. मात्र, त्यासाठी तुमचं शिक्षण विज्ञान शाखेतून झालं पाहिजे, तसेच फिजिक्स आणि गणित या विषयांमध्ये किमान ५०% गुण आवश्यक आहेत. चालत तर मग बघूया या बद्दल पूर्ण माहिती..!!
मेडिकल चाचणी – पहिलं पाऊल
पायलट कोर्ससाठी प्रवेश घेण्यापूर्वी तुमची वैद्यकीय चाचणी (मेडिकल टेस्ट) करावी लागते. यामुळे तुम्ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या पायलट होण्यासाठी योग्य आहात की नाही, हे निश्चित केले जाते. यासाठी क्लास २ मेडिकल चाचणी अनिवार्य आहे. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यात क्लास १ मेडिकल चाचणी होते. ह्या चाचणीद्वारे तुम्ही व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्र आहात की नाही, हे निश्चित केले जाते. ही चाचणी करण्यासाठी तुम्हाला DGCA (Directorate General of Civil Aviation) च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पायलट ट्रेनिंगसाठी दोन मार्ग
पायलट होण्यासाठी दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत. पहिला मार्ग म्हणजे फ्लाईंग स्कूलमध्ये प्रवेश घेणे. येथे तुम्हाला तांत्रिक ज्ञान आणि प्रत्यक्ष उड्डाण प्रशिक्षण दिले जाते. दुसरा मार्ग म्हणजे संस्था किंवा अकादमीमध्ये प्रवेश घेणे, जिथे पायलटसाठी आवश्यक संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. कोणताही मार्ग निवडला, तरी तुम्हाला ठराविक परीक्षा आणि वैमानिक तास (Flying Hours) पूर्ण करावे लागतील.
२०० तासांचे फ्लाईंग ट्रेनिंग आवश्यक
पायलट कोर्ससाठी तुम्हाला Pariksha.dgca.gov.in (UDAAN) या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कंप्युटर नंबर मिळेल आणि त्यानंतर परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) कोर्ससाठी पात्र होता येते. या कोर्समध्ये २०० तासांचे फ्लाईंग ट्रेनिंग पूर्ण करणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीत उड्डाण करावे लागते; अन्यथा पुन्हा परीक्षा द्यावी लागते.
पायलट कोर्समध्ये काय शिकवलं जातं?
या कोर्समध्ये विविध तांत्रिक व व्यावहारिक विषय शिकवले जातात. यामध्ये हवामानशास्त्र (Meteorology), नेव्हिगेशन (Navigation), इंजिन प्रणाली (Aircraft Engine Systems) आणि हवाई नियम (Air Regulations) यांचा समावेश असतो. हवाई वाहतुकीचे नियम वेगवेगळ्या देशांनुसार वेगळे असतात, त्यामुळे हे ज्ञान पायलटसाठी अत्यावश्यक असते. हा संपूर्ण कोर्स पूर्ण करण्यासाठी ३५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.
पायलट जॉबसाठी अर्ज कसा करावा?
पायलट होण्यासाठी फक्त लेखी परीक्षा आणि ट्रेनिंग पुरेसे नसते. कंपन्या निवड प्रक्रियेत हँड-आय कोऑर्डिनेशन (Hand-Eye Coordination) तपासतात, जे उड्डाण सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी व्हिडिओ गेम्स किंवा इतर हँड-आय कोऑर्डिनेशन सुधारू शकणाऱ्या क्रियाकलापांवर भर द्यावा.
पायलटचा पगार किती असतो?
पायलटच्या पगाराविषयी बोलायचे झाल्यास, एक फर्स्ट ऑफिसर दरमहा सुमारे ३ लाख रुपये कमवतो, तर कॅप्टनची वेतनश्रेणी ८ ते १० लाख रुपये प्रतिमहिना असते. भारतात व्यावसायिक पायलटच्या सरासरी पगाराची रक्कम १० ते १५ लाख रुपये प्रतिमहिना असू शकते.
तुम्हीही तुमच्या स्वप्नांना गती द्या!
जर तुम्हाला खरोखरच पायलट बनायचं असेल आणि हवेत झेप घ्यायची असेल, तर योग्य नियोजन करून तयारी सुरू करा. विज्ञान शाखेतून १२ वी उत्तीर्ण होणे, आवश्यक वैद्यकीय चाचण्या पास करणे, आणि ठराविक उड्डाण तास पूर्ण करणे, ही महत्वाची पावले आहेत. पायलट बनण्याचा मार्ग खडतर असला तरी, महिन्याला लाखोंची कमाई आणि संपूर्ण जग पाहण्याची संधी मिळवण्यासाठी हा प्रवास नक्कीच फायदेशीर ठरेल