बार्टी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी!-BARTI Training for Competitive Exam Success!
BARTI Training for Competitive Exam Success!
राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळावे, यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात २०,२७५ विद्यार्थी विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्गदर्शन घेत आहेत.
बार्टीच्या माध्यमातून यूपीएससी, एमपीएससी, जेईई, नीट, अधिछात्रवृत्ती, आयबीपीएस आणि कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेत बार्टीच्या १६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच, एमपीएससी परीक्षेसाठी राज्यभरातील २,६४८ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
याशिवाय, कौशल्य विकास व प्रशिक्षणासाठी ११,१७५, अधिछात्रवृत्तीसाठी ३,१०३ आणि आयबीपीएस परीक्षेसाठी १,२०० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. एकूण २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत दर्जेदार मार्गदर्शन मिळत आहे.
बार्टीच्या प्रयत्नांमुळे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. यंदा प्रशिक्षणार्थींची संख्या दुप्पट करण्यात आली असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ देता येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सांगितले.