JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

BARTI मार्फत यूपीएससी’ प्रशिक्षण कागदपत्र पडताळणी आजपासून! | BARTI Result 2026

BARTI Result 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दि. २७ एप्रिल २०२६ सुरू होत आहे. ही पडताळणी ‘बार्टी’ च्या पुणे येथील मुख्यालयात २९ एप्रिलपर्यंत पार पडणार आहे.

गेल्यावर्षी चाळणी परीक्षेद्वारे ४०० विद्यार्थ्यांची निवड केली होती. यातून पहिल्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण २३ फेब्रुवारीपासून सुरू झाले. काही दुबार लाभार्थी किंवा एकापेक्षा अधिक प्रशिक्षणांसाठी निवडले गेल्याने जागा रिक्त होत्या. त्यामुळे दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी पडताळणीस येताना कन्फर्मेशन स्लिप, मूळ अर्ज, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आणावा, असे महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.


MahaJyoti, BARTI Result 2025 

महाराष्ट्र राज्यातील बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांच्या लाभार्थी गटांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम २०२५-२६ संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निकाल आज जाहीर झाले आहे. खालील लिंक वरून आपण आपले निकाल चेक करू शकता.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या जाणाऱ्या परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेत परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘बार्टी’ मार्फत दोन हजार ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ‘बार्टी’ मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा तसेच अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांसाठी, याशिवाय कर्मचारी निवड आयोग (एसएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षांसाठी परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी १७ ते ३० सप्टेंबर तसेच १७ ऑक्टोबर रोजी राज्यभरात चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. आता निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

BARTI Result Update 2025 - 2026

BARTI New Results 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या माध्यमातून वंचित आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी, असा या योजनेचा उद्देश आहे. चाळणी परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली असून, त्यानुसार दोन हजार ५० विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (दि. १५) जाहीर करण्यात आली. यासोबतच ४९४ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही निवड यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात प्रशिक्षणाचे वेळापत्रक, प्रशिक्षण केंद्रांची माहिती तसेच अन्य आवश्यक सूचना ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून कळविण्यात येणार आहे.

 

🆕BARTI UPSC Result 

🆕BARTI MPSC Result 

🆕BARTI Group C, D  Result 

 

निकालाची प्रत (Score card) उपलब्ध करून घेण्यासाठी उमेदवारांनी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय आणि आर्टी या संस्थांचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या URL लिंकला Login करून आपला ईमेल आयडी व PASSWORD (ऑनलाईन फॉर्म भरताना जो username a password वापरला आहे तो) बाबत योग्य ती माहिती नोंदवून निकालाची प्रत (Score card) उपलब्ध करून घ्यावी. परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या सामान्यीकृत गुणांनुसार (Percentile Score(Normalization Score)) संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

 

 

Results Link Given below

 

◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.in/SARTHI ◾️ MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ◾️ARTI: https://barticet.in/ARARTI

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड