जर्मनीत उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधीच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी BARTI Free Training For Learning German Language), निटकॉन दिल्ली या संस्थांच्या वतीने जर्मन भाषेचे अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून, यासाठी अर्ज करण्यासाठी दि. २५ मार्चपर्यंत मुदत आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांच्या माहितीसाठी उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांनी केले आहे.

महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला असावा. आठ लाख रुपयांपर्यंतची उत्पन्न मर्यादा असावी. वयोमर्यादा १८ ते ३५ आणि आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पदवी, पदविका आवश्यक. प्रशिक्षणार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी मदत केली जाणार आहे.
यामध्ये नर्सिंग, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची पदविका, पदवी, तर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमातील बीसीए, बीबीए पदवी आणि हाऊसकिपर्स किंवा क्लीनर अभ्यासक्रमाची पदवी, अकाउंटिंग विषयातील बीकॉम किंवा एमकॉम, मार्केटिंग किंवा सेल्समधून एमबीए, आयटीआय किंवा पदविका किंवा पदवी घेतलेले इलेक्ट्रिशियन्स आणि ऑटोमोबाइल पदवी घेतलेले उमेदवार हे प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतील.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















