https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

‘बार्टी’ तर्फे जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी हजार उमेदवारांना संधी, अनुसूचित जात प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ!

BARTI Free Training For Learning German Language

जर्मनीत उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधीच्या अनुषंगाने राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी BARTI Free Training For Learning German Language), निटकॉन दिल्ली या संस्थांच्या वतीने जर्मन भाषेचे अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने असून, यासाठी अर्ज करण्यासाठी दि. २५ मार्चपर्यंत मुदत आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप व प्राप्त लाभांच्या माहितीसाठी उमेदवारांनी बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी. पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे व निबंधक इंदिरा अस्वार यांनी केले आहे.

 

BARTI Free Training For Learning German Language

महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराकडे राज्यातील अनुसूचित जातीचा दाखला असावा. आठ लाख रुपयांपर्यंतची उत्पन्न मर्यादा असावी. वयोमर्यादा १८ ते ३५ आणि आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पदवी, पदविका आवश्यक. प्रशिक्षणार्थ्यांना पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी मदत केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यामध्ये नर्सिंग, लॅब असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची पदविका, पदवी, तर अॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमातील बीसीए, बीबीए पदवी आणि हाऊसकिपर्स किंवा क्लीनर अभ्यासक्रमाची पदवी, अकाउंटिंग विषयातील बीकॉम किंवा एमकॉम, मार्केटिंग किंवा सेल्समधून एमबीए, आयटीआय किंवा पद‌विका किंवा पदवी घेतलेले इलेक्ट्रिशियन्स आणि ऑटोमोबाइल पदवी घेतलेले उमेदवार हे प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतील.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड