JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे! बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सरळ नोकरी, पूर्ण करा तुमचे बँकेत नोकरीच स्वप्न! – Bank of Maharashtra 600 Vacancies

Bank of Maharashtra 600 Vacancies – मित्रांनो, जर आपण बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न बघा असाल तर आपल्यासाठी एक मस्त संधी चालून आली आहे. बँकेत नोकरी शोधण्याच्या  प्रयत्नात असणाऱ्या ग्रॅज्युएट किंवा पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ही भरती विशेषत: फ्रेशर्स उमेदवारांसाठी असणार आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून तब्बल 600 अप्रेन्टिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शॉर्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून 15 जानेवारी 2026 पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच, 25 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. अप्रेन्टिसशिपच्या काळात उमेदवारांना बँकेत काम करण्याचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं. खास करून फ्रेशर्स तरुणांसाठी ही अप्रेन्टिस अतिशय फायदेशीर असते. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे वयोमर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. चला तर या भरती बद्दल पूर्ण सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊया!

✔️ 10 वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
☑️ 12 वी पास उमेदवारांसाठी जॉब्स

Bank of Maharashtra 600 Vacancies

 

तर, या बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२६ आहे. या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. मेरिट बेसिसवर तुमची निवड केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील या नोकरीसाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले असावे. याचसोबत त्यांना स्थानिक भाषा येत असायला हवी. याचसोबत १० वी आणि १२वीचे मार्कशीट असायला हवे. ज्यामध्ये तुमच्या स्थानिक भाषेत तुम्ही शिक्षण पूर्ण केलेले असावे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

पोलीस भरती महत्वाचे प्रश्नसंच मोफत टेस्ट सिरीज, लगेच सोडवून पहा किती मार्क येतात तर 

 

अर्ज शुल्क देखील श्रेणीनुसार निश्चित केले जाते. सामान्य, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना GST सह ₹१५० भरावे लागतील. SC आणि ST उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क ₹१०० आहे. अधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी अपंग उमेदवारांना अर्ज शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. तस इतर बंकीं भरती पेक्षा याचे शुल्क खुपच कमी आहे मित्रांनो. तेव्हा प्रयत्न करायला हरकत नाही.

निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी कायदा १९६१ आणि बँक ऑफ महाराष्ट्र नियमांनुसार आयोजित केले जाईल. या कालावधीत, उमेदवारांना भविष्यातील नोकरीसाठी तयार करण्यासाठी विविध बँकिंग कामे शिकवली जातील.

वेतन किती असेल?

प्रशिक्षण कालावधीत, उमेदवारांना मासिक ₹१२,३०० वेतन मिळेल. ही रक्कम संपूर्ण वर्षभर सारखीच राहील. तथापि, बँकेने स्पष्ट केले आहे की या कालावधीत प्रशिक्षणार्थींना इतर कोणतेही भत्ते किंवा अतिरिक्त फायदे मिळणार नाहीत. प्रशिक्षणाची वेळ साधारणपणे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल, परंतु बँकेच्या आवश्यकतेनुसार बदलू शकते.

कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम bankofmaharashtra.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, आधी रजिस्ट्रेशन करून मिळालेल्या लॉगिन क्रेडेंशिअलच्या आधारे वेबसाइटवर लॉगिन करा.
3. आता, अर्जात सर्व आवश्यक माहिती स्टेप बाय स्टेप भरा.
4. नंतर, डॉक्यूमेंट सेक्शनमध्ये फोटो आणि सही स्कॅन करून योग्य साइझमध्ये अपलोड करा.
5. अर्ज भरल्यानंतर, प्रवर्गानुसार शुल्क भरा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड