बँकांमध्ये व्हावी पदभरती; नियमित भरती प्रक्रिया होत नसल्याने मनुष्यबळाचा अभाव ! लिपिकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात। Bank Jobs 2024

Bank Jobs 2024

Bank Jobs 2024: सार्वजनिक राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाचा मुद्दा सातत्याने संघटनांद्वारे मांडण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रत्यक्षात विविध कारणांनी मनुष्यबळ कमी होत असून त्या तुलनेत पदभरती होत नसल्याबद्दल कर्मचारी रोष व्यक्त करीत आहेत. उपराजधानीसह देशभरातील सर्वच बँकांमध्ये कर्मचाऱ्यांवरील ‘वर्कलोड’ संदर्भातील परिस्थिती एकसारखी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वर्ष २०१७-२०२२ या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या विलीनीकरणामुळे राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांची संख्या ७ हजार १८९ने घटली. याउलट, खासगी क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या २०१७ ते मार्च २०२२पर्यंत १३ हजार २११ने वाढली.  इंडियन बँक्स असोसिएशनद्वारे संकलित डेटानुसार, राष्ट्रीयीकृत सार्वजनिक बँकांमध्ये २३.८० कोटीइतका आहे. तर त्या तुलनेत खासगी बँकांमध्ये प्रतिकर्मचारी सरासरी व्यवसाय १५.०२ कोटी आहे. या आकडेवारीवरून बँकेतील कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण लक्षात येऊ शकतो. विशेषतः विविध राष्ट्रीयीकृत बँकांचा विचार करता सर्वच शाखांमध्ये लिपिकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. नियमित भरती प्रक्रिया होत नसल्याने मनुष्यबळाचा अभाव जाणवत असल्याची टीका बँक कर्मचारी संघटना वेळोवेळी करत आल्या आहेत. कर्मचारी भरती थांबलेली असून कामांचा बोझा वाढला आहे. बँकांचे विलीनीकरण होत आहे. सोबतीला शाखा वाढल्या आहेत. त्या तुलनेत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. एका खासगी अध्ययनानुसार, ८.५९ बँक अधिकाऱ्यांमागे केवळ ३.६ लाख लिपिक आणि १.६१ लाख सहाय्यक आहेत. काही खासगी बँकांमध्ये सहा अधिकाऱ्यांमागे एक लिपिक अशी संख्या आहे. लिपिकांची संख्या कमी असल्यामुळे कामाचे नियोजन बिघडल्याचे चित्र आहे.

कार्यक्षमतेवर होतोय परिणाम

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कर्मचाऱ्यांअभावी कामाचा ताण वाढला असून जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. सर्वसामान्यांच्या नजरेमध्ये बँक कर्मचाऱ्यांची प्रतिमा म्हणजे संपखोर, कामचुकार आणि जास्त पगार कमावणारा अशीच असली तरी वास्तविकता प्रत्यक्षात वेगळी असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येत आहे. बँकेतील ‘आरामदायी’ नोकरीचे स्वरूप आता ‘त्रासदायक’ वर्गवारीत मोडले जाऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे आणि गरजेनुरूप भरती प्रक्रिया झालेली नाही. त्याचा थेट परिणाम सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे..


Bank Jobs 2024: The month of June-July has brought good news for the candidates who are preparing for the bank exam! Because bumper recruitment is going to be held in many banks in the month of July August. These include SBI, IBPS and LIC. Online application will be invited from eligible candidates according to the post in this bank. However, all the eligible candidates should visit the official website of these banks to check more information

बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जून -जुलै महिना घेऊन आला आहे खुशखबर! कारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक बँकांमध्ये होत आहे बंपर भरती. यामध्ये SBI, IBPS and LIC यांचा समावेश आहे. या बँकेमध्ये पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी या बँकांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती तपासावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर !! 6,974 जागांसाठी राष्ट्रीय व राज्य बँकेत मोठी भरती सुरु; लिस्ट बघा व येथे करा अर्ज

कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?

  • सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – 323
  • IBPS SO भरती – 896
  • IBPS PO – 4455
  • SBI – 1100
  • LIC हाऊसिंग फायनान्स -200

Bank Job Vacancy in August  2024

Sr No Bank Name Vacancy Application Link
1 Satara DCC Bank Bharti 2024 323 Click Here
2 IBPS SO 896 Click Here
3 IBPS PO 4455 Click Here
4 SBI 1100 Click Here
5 LIC Housing Finance Ltd 200 Click Here

Bank Job Vacancy in June July  2024

Sr No Bank Name Vacancy Application Link
1 Punjab National Bank Bharti 2024 2700 Click Here
2 IBPS RRB 10313 Click Here
3 बँक ऑफ बडोदा 627 Click Here
4 महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक 32 Click Here
5 IDBI बँक 31 Click Here
6 इंडियन बँक 102 Click Here
7 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक 48 Click Here
8 REPCO बँक 20 Click Here
9 बँक ऑफ महाराष्ट्र 12 Click Here
10 सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस 3 Click Here
11 युनियन बँक ऑफ इंडिया 1 Click Here

Bank Jobs 2024

राष्‍ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करावी अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनो लोकसभेत केली. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन योजना’ जाहीर केल्‍यानंतर ५१ कोटी ग्राहकांनी बँकांमध्‍ये खाली उघडून रू. २ लाख कोटींच्‍या ठेवी बँकांमध्‍ये जमा झाल्‍या आहेत. यापैकी बहुतांशी ठेवीदार आर्थिक दुर्बल घटक आहेत, परिणामी बँकांशी व्‍यवहार करणे त्‍यांना गैरसोयीचे होते. क्‍लार्क व शिपाई ही रिक्‍त पदे तात्‍काळ भरती करण्‍यात यावी, अशी आग्रही मागणी नियम ३७७ केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

देशात राष्‍ट्रीयकृत बँकांमध्‍ये सन २०१२ साली २२ हजार क्‍लार्क पदांवर भरती करण्‍यात आली. परंतू सन २०२३ साली फक्‍त ६ हजार क्‍लार्क पदांवर भरती करण्‍यात आली. सन २०१३ साली ३ लाख ९८ हजार क्‍लार्क कार्यरत होते. आजमितीस फक्‍त २ लाख ५७ हजार क्‍लार्क कार्यरत आहेत, म्‍हणजेच १ लाख क्‍लार्क पदे रिक्‍त आहेत. बहुतांश कामे आऊटसोर्सींगने केली जातात, त्यामुळे बँकांमध्‍ये काम करू इच्छिणा-या युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचा-यांची संख्‍या कमी असल्‍यामुळे पैसे भरणा करण्‍यासाठी व पैसे काढण्‍यासाठी एकच खिडकी सुरू असते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहक रांगेत उभे असतात. ऑनलाईन पेमेंट, डेबीट व क्रेडीट कार्ड, ई-कॉमर्स यासारख्‍या सुविधा असल्‍या तरी ज्‍येष्‍ठ व अशिक्षित नागरीक या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. एटीएम सुविधांवर देखील चार्जेस लावले जातात अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ajinkya Sanjay Bhonde says

    मी सहकारी बँक मध्ये शिपाई ह्या पदा वरती काम करत आहे मला अनुभव पण आहे तरी मला सरकारी बँक मध्ये जॉब मिळेल का ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड