पदवी परीक्षा २६ नोव्हेंबरपासून, पूर्ण माहिती बघा! – BAMU Exam Timetable

BAMU Exam Timetable

BAMU Exam Timetable 2024

BAMU Exam Timetable: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियमित पदवी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा २६ नोव्हेंबरपासून तर १५ डिसेंबरपासून पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु होणार आहेत. फेरपरीक्षार्थीची परीक्षेचा आढावा सोमवार ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेले. संलग्न महाविद्यालयातील नियमित विद्याथ्यांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे. या पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने अंतिम केले असून पदव्युत्तर परीक्षा डिसेंबरमध्ये सुरु होणार आहेत. परीक्षांसाठीची कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाकडून सुरू आहे. प्रारंभी १२ नोव्हेंबरपासून या परीक्षा सुरू होणार होत्या. अनेक शिक्षक, कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यासह विद्यापीठाने दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन होते. त्यामुळे दिवाळीनंतर या परीक्षा होत आहेत. महिनाभर परीक्षा लांबल्याने निकालाची प्रक्रिया ही लांबणीवर पडणार आहे. लांबलेली प्रवेश प्रक्रिया, पदवी, पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलामुळे विद्यापीठाने निश्चित केलेले २०२४-२५ शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यापीठ मुख्य परिसर, उपपरिसरातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत, विद्यापीठ मुख्य परिसर, उपपरिसरात विविध ५३ शैक्षणिक विभागांमध्ये विविध ८० पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या साडेचार हजारपेक्षा अधिक आहे. या विद्याथ्यर्थ्यांच्या सत्र परीक्षांचे नियोजन विभागस्तरावर केले जाणार

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

१५ डिसेंबरपासून पदव्युत्तर परीक्षा

पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा थेट डिसेंबरमध्ये सुरु होणार आहेत. पदवी, पदव्युत्तरचे वेळापत्रक ऑक्टोबर ते डिसेंबर-जानेवारी असे झाले आहे. पदवी अभ्यासक्रमानंतर १५ डिसेंबरपासून विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

फेरपरीक्षेचा निकाल नाही; आज बैठक

विद्यापीठाने दिवाळीपूर्वी फेरपरीक्षार्थीची परीक्षा घेतली. ८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. होम सेंटर, होम असेसमेंट अशा पद्धतीने या परीक्षा घेण्यात आली. सुमारे ३१५ महाविद्यालयातून ही परीक्षा झाली. परीक्षा झाल्यानंतर आठ दिसात निकाल जाहीर केला जाईल, असे सांगण्यात आले परंतु अद्याप महाविद्यालयांकडून गुणपत्रिकाच आल्या नसल्याचे सांगण्यात येते. ८० टक्केच उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले, विद्यापीठ सोमवार ११ नोव्हेंबर रोजी फेरपरीक्षेच्या निकालाचा आढावा घेणार आहे.


BAMU Exam Timetable

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पदव्यूत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा येत्या ३० एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. चार जिल्ह्यांत १२० केंद्रांवर सुमारे ७४ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळांच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ व १६ एप्रिल सुरळीतपणे सुरू आहेत. पदवी परीक्षेला एकूण २ लाख ४७ हजार ७०९ विद्यार्थी आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आता तिसऱ्या टप्प्यात पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यामध्ये एम.ए, एम.एस्सी व एम.कॉम. साठी ७६ परीक्षा केंद्रे आहेत तर बी.एड्. अभ्यासक्रमासाठी २६ परीक्षा केंद्रे आहेत. या सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होईल तर विधि (७ केंद्र), अभियांत्रिकी (६) तर औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाचे १२ परीक्षा केंद्रे आहेत. या तीन अभ्यासक्रमांची परीक्षा १५ मेपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी चार जिल्ह्यांत एकूण ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. सदरील परीक्षा सुरळीत पार व कॉपी मुक्त वातावरणात पार पाडाव्यात तसेच परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सहकेंद्र प्रमुखांची नियुक्ती केली आहे. उन्हाळी २०२४ परीक्षांचे निकाल विहीत मुदतीत जाहीर होण्याच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यानिहाय १६ मूल्यांकन केंद्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास ८ मूल्यांकन केंद्रे निश्चित केल्याचेही संचालक डॉ. गवळी यांनी सांगितले.


BAMU Exam Timetable : Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University’s B.Sc, B.Com, B.Com Economy, BA, BCA, BBA, B.Sc, BSW examinations will be held. Meanwhile, since students do not have the practice of writing, the students who take the exam will get an extension of 15 minutes per hour. Further details are as follows:-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएस्सी, बीकॉम, बीकॉम इकॉनॉमी, बीए, बीसीए, बीबीए, बीएस्सी, बीएसडब्लू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती तासाच्या पाठीमागे १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे.

  • गेल्या दोन वर्षांपासून करोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत होत्या.
  • आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे विद्यापीठ प्रशासन ऑफलाइन परीक्षा घेणार असून, परीक्षा विभागाने पदवी वर्गाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
  • एक जूनपासून पदवीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
  • याअंतर्गत बीएस्सी, बीकॉम, बीकॉम इकॉनॉमी, बीए, बीसीए, बीबीए, बीएस्सी, बीएसडब्लू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.
  • दरम्यान, विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव नसल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती तासाच्या पाठीमागे १५ मिनिटे वेळ वाढवून मिळणार आहे, असेही डॉ. मंझा यांनी स्पष्ट केले.

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षाही सुरू 

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पुढे ढकलल्या गेलेल्या उन्हाळी प्रात्यक्षिक परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
  • यानुसार शुक्रवार १३ मे पासून या परीक्षा कॉलेजस्तरावर ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत.
  • या परीक्षा ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहेत.
  • पदवी अभ्यासक्रमाच्या उर्वरित सम सत्रांच्या परीक्षा ३० मे ते ११ जून दरम्यान पार पडतील.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या आणि सम सत्रांच्या परीक्षा २३ ते ३१ मे दरम्यान घेण्यात येईल.
  • परीक्षेकरिता अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची नेमणूक कॉलेजांना आपल्या स्तरावर करायची आहे.
  • परीक्षेनंतर ७ दिवसांच्या आत विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाकडे सादर करावे लागणार आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड