आर्किटेक्चर प्रवेशासाठी बारावी गुणांची अट शिथील
Bachelor of Architecture (B.Arch) admission criteria Changed
Bachelor of Architecture (B.Arch) admission criteria Changed : बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे…
Bachelor of Architecture (B.Arch) admission criteria changed: जर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्ससाठी प्रवेश घेण्याच्या तयारीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी आहे. यावर्षी बीआर्क अभ्यासक्रमाच्या प्रवेशांच्या नियमांमध्ये मोठी सवलत दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.
ही सवलत विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांसंदर्भात दिली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले की ‘ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स (PCM) या विषयांसह उत्तीर्ण केली आहे आणि १० + ३ स्कीममध्ये गणितासह डिप्लोमा केला आहे, ते सर्व विद्यार्थी २०२०-२१ मध्ये बीआर्क कोर्सेसना प्रवेश घेण्यास पात्र आहेत.’
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
म्हणजेय यावर्षी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. बारावीत वरील विषयांसह केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
कोणत्या आधारावर अॅडमिशन?
शैक्षणिक सत्रासाठी जेईई मेन २०२० (JEE Main 2020) पेपर – २ आणि नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर (NATA 2020) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील.
काही दिवसांपूर्वी आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि अन्य केंद्रीय सहाय्यता प्राप्त इंजिनीअरिंग संस्थांमध्ये (CFTI) अॅडमिशनसाठी बारावीच्या किमान गुणांची अट शिथिल केली होती. आता हाच निर्णय बॅचलर ऑफ आर्किटेक्चर साठी देखील घेण्यात आला आहे.
का मिळाली सवलत?
देशातील करोना संक्रमणाच्या स्थितीमुळे अनेक बोर्डांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. काही बोर्डांनी संपूर्ण परीक्षेच्या आधारावर तर कधी इंटरनल असेसमेंटच्या आधारे निकाल तयार केले. असात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
NATA परीक्षा कधी होणार?
NATA (National Aptitude Test in Architecture) एकदा स्थगित करण्यात आली आहे. सध्या तरी या परीक्षेची नवी तारीख २९ ऑगस्ट २०२० आहे. कोविड – ९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ए आणि बी दोन्ही परीक्षा ऑनलाइन होणार आहेत. आधी ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स मध्ये (PCM) किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य होते. यावर्षी ही अट रद्द करण्यात आली आहे.
सोर्स : म. टा.
Table of Contents