Aviation Industry Job Opportunities –
देशात सध्या विमान उद्योगात मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून या अनुषंगाने विमान यंत्रणा सुनियोजित स्थितीत चालविण्यासाठी अन्य विभागांत देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली असून लवकरच १२१२ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आदी विभागांत केली जाणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्या प्रमाणात विमान कंपन्यांतर्फे नव्या विमानांची खरेदी तसेच नव्या मार्गांवर विस्तार केला जात आहे, त्याकरिता विमान प्रवासासाठी पायाभूत सुविधा देणाऱ्या यंत्रणेत देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. याची सुरुवात डीजीसीएकडून करण्यात आली आहे. या विभागात ४१६ नव्या जागांची भरती होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हवाई वाहतूक नियंत्रक, विमानाचे इंजिनिअर, वैमानिक अशा महत्त्वाच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. तर, देशातील विमानतळांचे व्यवस्थापन व देखभाल करणाऱ्या भारतीय विमान प्राधिकरणात देखील ७९६ नव्या पदांची भरती करण्यात येणार आहे.
यापैकी ३४० पदांची भरती मे २०२२ मध्ये करण्यात आली आहे. या खेरीज, विमान उद्योगातील आर्थिक शिस्तीचे नियमन करणाऱ्या एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये देखील १० जागा भरण्यात येणार आहेत.
करारानंतर आतापर्यंत न पोहचलेल्या शहरात विमानसेवा पोहचू शकणार आहे. याने पायाभूत सुविधा व पर्यटनाला चालना मिळणार आहे. नव्या शहरांना विमान सेवा सुरु होणार असल्याने जादा कर्मचारी वर्गाची भरती करण्याचे कार्य आगामी काळात विमान कंपन्यांना पार पाडावे लागणार आहे.
हवाई वाहतुकीत सुधारणा
देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱयांचे प्रमाण 2022 मध्ये सुधारले असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटना (आयएटीए) यांनी दिली आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हवाई वाहतुकीत कमालीची सुधारणा दिसली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतुक विस्कळीत झाली होती. ज्याने कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम केला होता. 2019 नंतर 2022 मध्ये प्रवाशांची संख्या 85 टक्के इतकी समाधानकारक वाढली आहे.
कोणती पदे भरली जाणार
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या क्षेत्रात उमेदवारांची भरती करावी लागणार आहे. पायलट, केबिन क्रू, सर्व तांत्रिक व विनातांत्रिक विभागासाठी आगामी काळात कर्मचारी लागणार आहेत. एअर इंडियाचे माजी कार्यकारी संचालक जितेंद्र भार्गव यांच्या मते, एअर इंडियाला अनुभवी पायलट, केबिन क्रू सदस्य, देखभाल इंजिनियरिंग, ग्राउंड क्रू आदींची गरज लागेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















