औरंगाबाद विद्यापीठ भरती प्रक्रिया रखडणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भरती प्रक्रिया सहा महिने लांबणीवर पडली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी १३०० पदांच्या प्रस्तावात ३० टक्के पद कपात करून उच्च शिक्षण विभागाला आकृतीबंध सादर करण्यात आला आहे. मात्र, विधानसभा निवडणूक आणि मंत्रिमंडळ स्थापनेत विलंब होणार असल्याने भरती प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे.

विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासन तीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. उच्च शिक्षण विभागाने बैठक घेऊन आकृतीबंध सादर करण्याची सूचना केली होती. पण, प्रक्रिया गतिमान होऊ शकली नाही. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी रिक्त जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कुलसचिव, परीक्षा संचालक, अधिष्ठाता आणि विद्यार्थी विकास मंडळ संचालक ही पदे भरली जाणार आहेत. प्राध्यापक भरतीला उच्च शिक्षण विभागाची मान्यता नसल्याने तासिका तत्त्वावर प्राध्यापक नियुक्त केले आहेत. प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी रिस्त जागांचा प्रस्ताव जानेवारीत उच्च शिक्षण विभागाला सादर केला होता. विद्यापीठाचे नवीन विभाग, इनक्यूबेशन सेंटर, नवीन अध्यासन केंद्र, महाविद्यालये लक्षात घेता १३०० पदांचा प्रस्ताव होता. पण, प्रस्तावातील ३० टक्के पदांची कपात करून आकृतीबंध देण्याची सूचना उच्च शिक्षण विभागाने केली होती. त्यानंतर पुन्हा नवीन प्रस्ताव दिला आहे. पण, बैठक होऊनही आराखडा अंतिम होऊ शकला नाही. या निर्णयात विद्यापीठातील भरती प्रक्रिया रखडली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दीड महिना प्रशासकीय निर्णय ठप्प आहेत. निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापना होऊन बैठक होण्यास विलंब लागणार आहे. परिणामी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी सहा महिने उशीर होण्याची शक्यता आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या २७९ जागा रिक्त आहेत. ‘अ’ गटातील २७ जागा, ‘ब’ गटातील ११, ‘क’ गटातील १५३ आणि ‘ड’ गटातील ८७ जागांचा समावेश आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. प्रोफेसरच्या ३५ जागांपैकी २७ जागा रिक्त आहेत. सहयोगी प्राध्यापकांच्या ८० पैकी ४१ जागा आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या १४४ पैकी ४९ जागा रिक्त आहेत.

कुलसचिव, परीक्षा संचालक मुलाखती

विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले होते. या पद नियुक्तीसाठी १७ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कुलसचिव पदासाठी ५७ अर्ज, परीक्षा संचालक पदासाठी ४५, विज्ञान शाखा अधिष्ठाता २७, मानव्यविद्या शाखा २१, वाणिज्य व व्यवस्थापन १३, आंतरविद्या शाखा १७ आणि उस्मानाबाद उपकेंद्र संचालक पदासाठी २५ अर्ज आहेत. या अर्जांची निकषानुसार पडताळणी करुन मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले. कुलसचिव पदासाठी विद्यापीठातील इच्छुक प्राध्यापकांची सर्वाधिक संख्या आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप