महत्त्वाचे – आरोग्‍य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्‍त पदे!! जाणून घ्या

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2022

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2022

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2022 : As per the latest news, there are large number of posts are vacant in the Health Department of Kankavali Taluka. For more details about Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2022, Arogya Vibhag Sindhudurg Vacancy 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

पावसाळ्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर साथरोग उद्‌भवतात. त्‍याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, लेप्टोस्पायरोसीस, तापसरी रूग्‍णांचा आढावा घेणे यामध्ये आरोग्‍य कर्मचाऱ्यांची भूमिका महत्‍वाची असते. मात्र, कणकवली तालुक्‍यातील बहुतांश सर्वच आरोग्‍य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्‍तपदे असल्‍याने गृहभेटींचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • दुर्गम भाग तसेच विस्ताराने मोठा असलेल्‍या कणकवली तालुक्‍यात पुरेसा आरोग्य कर्मचारी वर्ग असण्याची गरज आहे.
 • मात्र, या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे सद्यस्थितीत असलेल्‍या कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे.
 • घरोघरी जाऊन तापसरीच्या रूग्‍णांची माहिती घेण्याचेही काम विस्कळीत झाले आहे.
 • सध्या काही प्रमाणात एनएचएमअंतर्गत भरती झालेल्‍या कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्‍य विभागाचे कामकाज चालविले जात आहे.
 • मात्र, ते कर्मचारी देखील अपुरे असल्याने या संपूर्ण प्रक्रियेत शासन लक्ष देऊन रिक्‍तपदांची भरती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 • रिक्त पदांचा विचार केला असता कणकवली तालुक्यात आरोग्य केंद्रस्तरावरच ज्यांचा थेट जनतेशी संपर्क येतो, अशा ठिकाणी फोंडाघाट, कळसुली आणि वरवडे या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषध निर्माण अधिकारी हे पद रिक्त आहे.
 • खारेपाटण व कळसुलीमध्ये आरोग्य सहायिका हे पद रिक्त आहे.
 • त्याचबरोबर खारेपाटण, कळसुली व नांदगाव या तीन आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सहाय्यक हे देखील पद रिक्त आहे.

Arogya Vibhag Sindhudurg Vacancy 2022

आरोग्य सेवक पद रिक्त असलेल्या प्राथमिक उपकेंद्रामध्ये कळसुली आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या शिवडाव उपकेंद्र, कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कासार्डे, ओझरम व तरळे, वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सातरलं व कणकवली २, तसेच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नांदगाव, साकेडी, ओटव, फोंडाघाट आरोग्य केंद्रांतर्गत फोंडाघाट १ या केंद्रांचा समावेश आहे. रिक्त असलेल्या आरोग्य सेविकाच्या पदांमध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खारेपाटण, शेर्पे, कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कळसुली मुख्यालय तर फोंडा आरोग्य केंद्रांतर्गत फोंडा १, फोंडा मुख्यालय व लोरे नंबर २, कनेडी आरोग्य केंद्रांतर्गत कनेडी नंबर १ व हरकुळ बुद्रुक, कासार्डे आरोग्य केंद्रांतर्गत साटमवाडी कासार्डे, साटमवाडी, तरळे, वाघेरी. तर स्त्री परिचर रिक्त पदांमध्ये खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये एक पद रिक्त आहे. परिचरमध्ये खारेपाटणमध्ये १, कळसुलीमध्ये २, फोंडाघाट १, कासार्डे २, वरवडे २, नांदगाव १ व कनेडीमध्ये १ पद रिक्त आहे. ही सर्व पदे ही तालुक्यातील ग्रामीण भागातील होणाऱ्या गृहभेटी, साथरोग कालावधीतील सर्वेक्षण आणि त्या अनुषंगाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची पदे आहेत. पावसाळ्यात तापसरीचे रूग्‍ण वाढू लागल्‍याने या रिक्त पदांची उणीव आता जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे शासन स्तरावरून या पदांना तातडीने मंजुरी देण्याची गरज आहे. किंवा एनएचएम अंतर्गत ही पदे भरून आरोग्य व्यवस्था बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे. याकडे नव्याने स्थापन झालेले सरकार कसा लक्ष देणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

चौकट ग्राफ – 34364

कणकवली तालुक्‍यातील आरोग्‍य विभागातील रिक्‍त पदे

 • औषध निर्माण अधिकारी – ३
 • आरोग्‍य सहाय्यिका – २
 • आरोग्‍य सहाय्यक – २
 • आरोग्‍य सेवक – ११
 • आरोग्‍य सेविका – १३
 • परिचर – १०

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2022

Arogya Vibhag Sindhudurg Bharti 2022 : There are 97 vacancies vacant in District Malaria Department. There are 185 officers, and employee posts sanctioned in District Malaria Department. Out of which only 87 posts have been filled. Further details are as follows:-

जिल्हा हिवताप विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १८५ मंजूर पदांपैकी केवळ ८७ पदे भरण्यात आली असून तब्बल ९८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे साथरोग नियंत्रण कामकाजावर ताण पडत आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी दिली. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

District Malaria Department Vacant Posts

जिल्हा हिवताप विभागाकडे मंजूर पदांपैकी 50% हून अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे:-

मंजूर पदे:-

 • अधिकारी १
 • आरोग्य पर्यवेक्षक ४
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३९
 • आरोग्य सहायक ४०
 • आरोग्य कर्मचारी (पुरुष) ९४
 • क्षेत्र कर्मचारी ७ अशी एकूण १८५ पदे मंजूर आहेत.

District Malaria Department Bharti 2022

भरलेली पदे:-

 • आरोग्य पर्यवेक्षक ३
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४
 • आरोग्य सहायक २४
 • आरोग्य कर्मचारी ५४
 • क्षेत्र कर्मचारी २ अशी एकूण ८७ पदे भरण्यात आली आहेत.

रिक्त पदे:-

 • अद्यापही हिवताप विभागाकडे प्रमुख अधिकाऱ्यांसह ९८ पदे रिक्त आहेत.
 • यामध्ये अधिकारी १
 • आरोग्य पर्यवेक्षक १
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३५
 • आरोग्य सहायक १६
 • आरोग्य कर्मचारी ४०
 • क्षेत्र कर्मचाऱ्यांची ५ पदे रिक्त आहेत.

Arogya Vibhag Sindhudurg Recruitment 2022

जिल्हा हिवताप विभागामार्फत मलेरिया, डेंगी, माकडताप यासारख्या साथरोगांवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले जाते. त्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामीण भागातील सर्व्हे, औषध फवारणी, रुग्णांचे रक्त नमुने गोळा करणे, रुग्ण शोधणे आदी कामांसाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र जिल्हा हिवताप विभागातील मंजूर पदांपैकी ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. पावसाळा सुरू झाल्याने साथ रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. अशा वेळी साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता असते; मात्र हिवताप विभागात विविध पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यावर कामाचा ताण पड़त आहे.

जिल्हा हिवताप विभागाकडील प्रमुख अधिकाऱ्यांसह एकूण मंजूर पदांच्या ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांचा साथरोग नियंत्रण कामकाजावर परिणाम होत आहे. साथरोग सर्व्हेक्षण, औषध फवारणी, रुग्ण शोध मोहीम यासारखे उपक्रम राबविताना कार्यरत यंत्रणेवर ताण येत आहे. जिल्ह्यातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने हिवताप विभागाकडील रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कर्तस्कर यांनी दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Manjushri Sanjay Desale says

  Master of social job’s

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड