?Fake Recruitment Alert – आरोग्य विभागातील बोगस भरतीची तार विदर्भभरात

Arogya Vibhag Fake Recruitment Alert

Arogya Vibhag Fake Recruitment Alert  : आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया असल्याचे दाखवून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीची व्याप्ती यवतमाळ तसेच अमरावतीपर्यंत असल्याची माहिती आहे. अमरावती पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्यांपैकी काहींचे तार अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Arogya Vibhag Fake Recruitment Alert

एक महिन्यापूर्वी अमरावती जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागात बनावट नियुक्तिपत्र देऊन एकाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा दिली होती. तसेच यासंदर्भात काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहनसुद्धा केले होते. तसेच प्रकरण २५ जानेवारीला यवतमाळ पोलिस ठाण्यात दाखल झाले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातसुद्धा असाच प्रकार घडला होता. सुरुवातीला बनावट नियुक्तिपत्र देऊन लाखोंचा गंडा घालणाऱ्या या रॅकेटची व्याप्ती अमरावतीपुरती मर्यादित असल्याचे दिसून येत होते. मात्र, आता यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा ही टोळी सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या टोळीतील काही सदस्यांचे अमरावती कनेक्‍शन आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड