आरोग्य विभागातील १३,३७० जागा रिक्त; नवीन पदभरती बद्दल स्पर्धा परीक्षार्थीची नाराजी – Arogya Vibhag Bharti 2025
Arogya Vibhag Bharti 2025 -arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Contractual Bharti Update
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट ‘क’ आणि गट ‘ड’ प्रवर्गाच्या १३ हजार ३७० जागा . रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. रिक्त जागांना मंजुरी त मिळूनही ही पदे भरली जात नसल्याने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून ही पदे भरण्याची मागणी होत आहे. कोरोनानंतर आरोग्य विभागात ट मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. या विभागात अनेक पदे रिक्त असल्याने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्वरित पदे भरण्यासाठी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे. २०२१ मध्ये पेपरफुटी प्रकरणामुळे ११ हजार पदांची रद्द झालेली परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आली. ४५ हजार ४०९ पदे भरण्याची मंजुरी असताना, आतापर्यंत केवळ ३२ हजार ३९ पदे भरली आहे. गट ‘क’ व ‘ड’ संवर्गासाठी १३,३७० रिक्त पदे अद्यापही रिक्तच असून लवकरात लवकर स्पर्धा परीक्षेतर्गत भरण्याची मागणी केली जात आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गट ‘क’ व ‘ड’ प्रवर्गातील भरती कमी प्रमाणात होत असल्याने राज्यभरातील आरोग्य विभागाचे काम सुरळीत होत नसून रुग्णांनाही वेळेत आणि दर्जेदार सुविधा देण्यात अडचणी येत आहे. गरज असतानाही रिक्त असलेली पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचीही नाराजी वाढली आहे.
Arogya Vibhag Bharti 2024: आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विविध पदांसाठी भरती करताना १५ ते १७ हजार पगार देतो, असे सांगून कामावर घेतले. मात्र, प्रत्यक्षात १० ते १२ हजार रुपये मानधन मिळत आहे. ते देखील मागील चार ते पाच महिन्यांपासून दिले नाही. त्यामुळे संबंधित कंपनीने आमची फसवणूक केली असून, आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा ? असा प्रश्न कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आमचे वेतन वेळेवर व नियमानुसार द्यावे, अशी मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना निवेदनाद्वारे केली.
आरोग्य विभागात नव्याने स्थापन केलेल्या १२ प्राथमिक आरोग्य केंद्रात ९६ कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली आहे. या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देताना वेळेवर वेतन होईल, अशी हमी देण्यात आली होती. मात्र, कंपनीने वारंवार कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. नियुक्ती देतेवेळी दिलेल्या जाहिरातीप्रमाणे वेतन मिळत नाही. वेतनामध्ये खूप तफावत आढळत आहे. कंपनीकडून आजअखेर कधीही वेळेवर वेतन मिळाले नाही. जुलै ते आजअखेर पाच महिन्यांचे वेतन मिळालेले नाही.
काही कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये काही महिन्यांचे वेतन मिळाले नाही. कर्मचाऱ्यांना पीएफचे नंबरही व्यवस्थित देण्यात आले नाहीत, तर काही कर्मचाऱ्यांची पीएफ नंबर बंद केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून बोनसची रक्कम कपात केली असतानाही कर्मचाऱ्यांना ती व्यवस्थित दिली नाही कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे कंपनीने पगारपत्रक दिले नाही. कंपनीचे कोणतेही पदाधिकारी, प्रतिनिधी कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाहीत किंवा फोनही उचलत नाहीत. दरम्यान, याशनी नागराजन यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एमव्हीजी कंपनीवर कारवाई करा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, कनिष्ठ लिपिक, स्त्री परिचर, पुरुष परिचर या पदांची कंत्राटी भरती एमव्हीजी कंपनीकडून केली आहे. या कर्मचाऱ्यांची कंपनीने फसवणूक केली असून, कंपनी चार ते सहा हजार रुपये एका कर्मचाऱ्यामागे घेत आहे, तसेच वेळेवर पगारही मिळत नसून कंपनीने आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे या कंपनीवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Arogya Vibhag Mega Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024: माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या १३,३७० जागा रिक्त आहेत. या जागा मुख्यतः गट क आणि गट ड प्रवर्गात मोडणाऱ्या आहेत. या पदांसाठी आवश्यक मंजुरी मिळूनही आरोग्य विभागात रिक्त पदे भरली जात नसल्यामुळे अनेक उमेदवारांकडून या जागा लवकरात लवकर भरण्याची मागणी होत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आरोग्य क्षेत्रातील या रिक्त जागा भरल्यास, आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते, तसेच आरोग्य विभागात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी मिळू शकते. या संदर्भात आरोग्य विभागाकडून लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे.
आरोग्य विभागात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज असून, रिक्त पदांमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. गट क आणि ड प्रवर्गातील भरती कमी प्रमाणात होत असल्याने राज्यभरातील आरोग्य विभागाचे काम सुरळीतपणे सुरू करण्यात अडचणी येत आहेत.
२०२१ मध्ये पेपर फुटल्यामुळे रद्द झालेली परीक्षा २०२४ मध्ये जवळपास ११ हजार पदांसह पुन्हा घेण्यात आली. राज्यात ४५,४०९ पदे भरण्याची मंजुरी मिळालेली असताना, आतापर्यंत फक्त ३२,०३९ पदे भरलेली आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमधून या रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करावी, अशी मागणी वाढत आहे.
२०२१ मध्ये पेपरफुटीमुळे रद्द झालेली परीक्षा थेट २०२४ मध्ये घेण्यात आल्यामुळेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात इतक्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून या रिक्त पदांची भरती करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी अपेक्षा आहे. या भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी अधिकृत निर्णय घेतला जाईल, ज्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरीच्या संधी मिळू शकतील.
Maha Public Health Department Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ३०० नियुक्त्या स्थगित केल्याच्या अंतरिम आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत हस्तक्षेपकांसाठी अंतरिम स्थगिती दिली आहे. यापूर्वी नियुक्त्या मिळालेल्या याचिकाकर्त्यांच्या सेवा कायम राहतील, परंतु अंतिम निकाल अथवा पुढील आदेश यावर त्यांच्या सेवेसाठीचा निर्णय अवलंबून असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या प्रकरणात प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश देण्यात आला असून, हस्तक्षेपकांच्या याचिकांवर २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सुनावणी होणार आहे. गुरुवारी याचिकाकर्ते सचिन आगे, चंद्रकांत गायकवाड, ज्ञानेश्वर डोईफोडे व इतर २२ हस्तक्षेपकांनी अॅड. अमोल चाळक यांच्यामार्फत आणि इतर ७१ हस्तक्षेपकांनी अॅड. प्रज्ञा एस. तळेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या आहेत.
नियुक्त झालेल्या हस्तक्षेपकांनी न्यायाधिकरणास विनंती केली होती की, मूळ अर्जावर निर्णय देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घ्यावी. मात्र, न्यायाधिकरणाने १० ऑक्टोबरच्या आदेशावर सुनावणी न घेता थेट अंतरिम स्थगिती दिल्याचे हस्तक्षेपकांचे म्हणणे आहे.
४ जणांच्या विनंतीवरून २९० नियुक्त्यांना स्थगिती
अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना स्पष्ट केले की, मूळ अर्ज दाखल होण्यापूर्वीच अर्जदार आणि इतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपले पद स्वीकारले होते. मात्र, न्यायाधिकरणाच्या अंतरिम आदेशामुळे या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायाधिकरणाने मूळ अर्ज जनहित याचिका म्हणून स्वीकारला आणि फक्त ४ जणांच्या विनंतीवरून २९० नियुक्त्यांना स्थगिती दिली.
अॅड. तळेकर यांनी सांगितले की, यामध्ये नैसर्गिक न्यायतत्त्वांचे पालन न करता, या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी म्हणून न घेताच अथवा सरकारकडून प्रतिज्ञापत्राची मागणी न करता तातडीने स्थगिती आदेश दिला गेला, ज्यामुळे याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे.
Maha Public Health Department Bharti 2024
Arogya Vibhag Bharti 2024: मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात केलेल्या २९० नियुक्त्या आणि आगामी प्रस्तावित ३१० नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. या नियुक्त्यांमध्ये शासन मान्य नसलेल्या अभ्यासक्रमासह संस्थेचे प्रमाणपत्र जोडल्याचे सहाशे उमेदवारांकडून सादर करण्यात आले होते. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या स्थितीचे विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त्या करण्याचे आदेश दिले होते. मात्र, न्यायालयाने मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश कायद्याच्या मर्यादेत येत नाहीत आणि त्यांना नियुक्ती प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत, असे सांगत त्यावर आक्षेप नोंदवला. या निर्णयाविरोधात १८ उमेदवारांनी न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. आरोग्य पर्यवेक्षक, निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांसारख्या पदांसाठी जाहिरातीनुसार संबंधित प्रमाणपत्र असणे आवश्यक होते; परंतु तपासणीत हे प्रमाणपत्र शासन मान्य संस्थेचे नसल्याचे स्पष्ट झाले. सहा सदस्यांच्या समितीने हा मुद्दा पुढे आणला होता.
Arogya Vibhag Pension Update
सार्वजनिक आरोग्य विभाग खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू…या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू!
खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
खंड क्षमापन झालेल्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा “गट-अ” संवर्गातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अस्थायी सेवेत रुजू झालेले तसेच २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेव्दारे समावेशन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या निवड मंडळामार्फत नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अधिकाऱ्यांना विधि व न्याय विभागाच्या दि.२८.०२.२०१७ च्या शासन परिपत्रकातील समान प्रकरणी समान न्याय या तत्वास अनुसरुन शासन निर्णय, दि.०८.११.२०२३ नुसार खंड क्षमापन झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दि.०१ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल
Arogya Vibhag Bharti 2024 Update
राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने कुशल व अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार ९३ विविध आरोग्य संस्थांसाठी २६०३ पदे निर्माण करण्यात आली असून, ही पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेली विविध रुग्णालये व आरोग्य संस्था अद्ययावत करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नव्याने रुग्णालये व संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यामध्ये ९३ विविध आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाची आवश्यक आहे. ही बाब लक्षात वेता सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालये व आरोग्य संस्थांसाठी २,६०३ पदे बाह्यस्रोतांद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरती अधिकृत व्हाट्सअँप चॅनल या लिंक वरून लगेच जॉईन करा किंवा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आताच प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून गेल्या दोन वर्षात विविध उपकरणे, यंत्रसामग्री तसेच रुग्णालयांमध्ये खाटा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे काम अत्यंत वेगाने सुरु असतानाच ज्या डॉक्टरांच्या जीवावर ही आरोग्य यंत्रणा चालणार आहे, त्यांच्या भरतीबाबत मात्र सरकारची उदासीनता आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची मोठमोठी उपकरणे, यंत्रसामग्री तसेच महागडे फिरते दवाखाने यांची खरेदी होत असताना रुग्णांवर उपचार कोण करणार, असा सवाल आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
आपल्याला माहित असेल, एकीकडे राज्यात आजघडीला डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी आदी मिळून २० हजार पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. गंभीरबाब म्हणजे राज्याला पूर्णवेळ आरोग्य संचालक नाहीत. तसेच अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांची डझनावारी पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अतिदुर्गम आदिवासी भागात वर्षानुवर्षे कंत्राटी वेठबिगार म्हणून काम करणाऱ्या भरारी पथकाच्या २८१ डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात टाळाटाळ केली जात आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी य डॉक्टरांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांना सेवेत कायम केले जात तर नाहीच उलट त्यांना कित्येकदा महिनोमहिने वेतनही दिले जात नाही. मात्र त्याचवेळेस आरोग्य विभाग सक्षम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रुग्णालयांचे विस्तारीकरण तसेच नवीन रुग्णालये सुरु करण्याचे काम जोरात सुरु आहे.
तसेच, जून व जुलै या दोन महिन्यात जवळपास चाळीसहून अधिक ग्रामीण रुग्णालयांमधील खाटा वाढविण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५० ते १०० खाटा वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र खाटा वाढविताना तेथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. खरतर ग्रामीण रुग्णालये आजघडीला ४० टक्के क्षमतेनेच चालत असून एमडी मेडिसिन व अस्थिशल्यविशारद नसल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे भूलतज्ञ नाहीत तसेच अस्थिशल्यविशारद नसताना ग्रामीण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करून आरोग्यमंत्री व स्थानिक आमदार नेमके काय करू पाहात आहेत असा सवालही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
सरकार कोणतेही असो, कितीही पक्षांचे असो, आरोग्य विभागाला कोणीच वाली नाही हे वास्तव आहे. आजघडीला आरोग्य विभागात आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांसह २०,०९४ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोग्य संचालकांची तीन पदे रिक्त आहेत. केवळ एकच हंगामी आरोग्य संचालक सध्या कार्यरत असून या प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य विभागाचा गाडा हाकायचा कसा, असा सवाल विभागातील डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर एका मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी आरोग्य अर्थसंकल्प दुप्पट करण्याची घोषणा केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत दुप्पट तर सोडाच, पण आवश्यक असलेला निधीही आरोग्य विभागाला दिला जात नाही. गंभीर बाब म्हणजे अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या निधीपैकी पूर्ण रक्कम मिळत नसल्याने आरोग्य विभागाच्या अनेक योजना केवळ कागदावरच राहतात, असे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
तब्बल २०,०९४ पदे भरण्यात आलेली नाहीत. गेली अनेक वर्षे अधिवेशनात प्रत्येक आरोग्यमंत्री ही पदे भरण्याची घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात पदे भरलीच जात नाहीत. हे कमी म्हणून अत्यल्प पगारात तेही कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची पदे भरून आरोग्याचा कारभार हाकण्यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी वर्ग ‘अ’ ते वर्ग ‘ड’ पर्यंत ५८,०२४ मंजूर पदे असून त्यापैकी २०,०९४ पदे भरण्यात आलेली नाहीत. यात आरोग्य संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सकांपासून परिचारिका, वॉर्डबॉय आदी पदांचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्याचा कारभार ज्या आरोग्य संचालनालयातून चालतो तेथे संचालक हंगामी, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक साहाय्यक संचालकांची एकूण ४० मंजूर पदे असून त्यापैकी १९ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक व अधिकारी यांची तब्बल ३५० पदे रिक्त आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील ३८ रुग्णालयांमध्ये ८८८ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्याकीय शिक्षण विभागाने कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची भरती करण्याचा निर्णयानंतर आरोग्य विभागाने कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्यात आले आहेत. तर काही आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेसाठी आवश्यक कर्मचारी नसल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ३८ विविध आरोग्य संस्थांमध्ये नव्याने ८८८ कुशल व अकुशल मनुष्यबळाची निर्मिती केली आहे.
मात्र विकासकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तेथे पदनिर्मिती न करता संबंधित कामे कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या ३८ संस्थांमधील ८८८ पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे ही पदे नियमित वेतनश्रेणी पद्धतीने न भरता एकत्रित वेतनावर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
१३ उपजिल्हा रुग्णालयांसाठी ३४२ पदे कंत्राटी पद्धतीने तर १२ ग्रामीण रुग्णालयांसाठी १७ पदे आणि पाच स्त्री रुग्णालयासाठी २१० पदे, पाच ट्रॉमा केअर युनिट ३५ पदे, तसेच नाशिक येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ६४ पदे, जिल्हा शल्य चिकित्सक पालघर कार्यालय ७ पदे, जिल्हा रुग्णालय सोलापूर ५१ पदे, स्त्री रुग्णालये २१० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्यासाठी १९ कोटी ५३ लाख ७८ हजार ९९६ रुपये इतक्या वार्षिक खर्चास मान्यता दिली आहे. ही पदभरती २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षांसाठी असणार आहे.
Arogya Vibhag Bharti 2024: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer Group-A”. There are total of 1729 vacancies are available. The application is to be done online. Applications will start from 01st of February 2024. Also, the last date to apply is 18th of February 2024. For more details about Arogya Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
The recruitment process will be implemented at Arogya Vibhag. There are a total of 1729 vacancies available. Advertisements regarding Arogya Vibhag recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in online mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this Arogya Vibhag Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by online Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the Arogya Vibhag post, Arogya Vibhag post number, Arogya Vibhag educational qualification, salary application location and detailed information about Arogya Vibhag Bharti 2024, Arogya Vibhag recruitment 2024 is given below.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी गट-अ” पदांच्या एकूण 1729 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख
1518 फेब्रुवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट-अ
- पदसंख्या – 1729 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 फेब्रुवारी 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Arogya Vibhag Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | 1729 पदे |
Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस |
Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | रु. ५६१००-१७७५०० |
How To Apply For Arogya Vibhag Online Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा.
- अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासुन सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Arogya Vibhag Application 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/qGS12 |
???? ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासुन सुरु होतील) | https://shorturl.at/alRSW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://shorturl.at/dgkL5 |
The recruitment notification has been declared from the Arogya Vibhag for interested and eligible candidates. Online applications are invited for the Medical Officer Group-A posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Maharashtra. Applicants need to apply online mode for Arogya Vibhag Recruitment 2024. Arogya Vibhag Online Application is started from 15th of February 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Arogya Vibhag Bharti Registration Link. For more details about Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Details, Health Department Maharashtra State Bharti 2024, Arogya Vibhag Medical Officer Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | Arogya Vibhag |
???? Recruitment Details | Arogya Vibhag Recruitment 2024 |
???? Name of Posts | Medical Officer Group-A |
???? Job Location | Maharashtra |
✍????Application Mode | Online |
✅Official WebSite | https://arogya.maharashtra.gov.in/ |
Educational Qualification For Health Department Maharashtra State Bharti 2024 |
|
Medical Officer Group-A | M.B.B.S./B.A.M. S |
Age Criteria Arogya Vibhag Recruitment 2024 |
|
Medical Officer Group-A | — |
Salary Details For Public Health Department of Maharashtra State Job 2024 |
|
Medical Officer Group-A | Rs. 56100-177500 |
Application Fee For Arogya Vibhag Medical Officer Vacancy 2024 |
|
Medical Officer Group-A | No Application Fee required |
Maharashtra Health Department Vacancy Details |
|
Medical Officer Group-A | 1729 |
All Important Dates Public Health Department Group A Mega Recruitment 2024 |
|
⏰Last Date | 15th of February 2024 |
Arogya Vibhag Online Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
NHAI Online Application Link | Apply Online |
✅ Official Website | Official Website |
आरोग्य विभाग भरती अंर्तगत सर्व पदांचा निकाल जाहीर, PDF डाउनलोड करा – Aarogya Vibhag Bharti Result 2023
Arogya Vibhag Bharti 2024 Document Verification Date
Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in: This advance notification is being published for all the candidates to avoid unnecessary wastage of time of the candidates and the government. According to the terms and conditions mentioned in the advertisement as well as the prevailing government decision, the documents of all the candidates will be checked and the final decision will be taken in this regard.
Candidates who possess any of the following certificates viz. If the Domicile Certificate is not available, they should submit the said documents on stamp paper of Rs.100/- within 01 month from the date of appointment, otherwise the appointment order of the concerned candidate will be canceled and if any educational, reservation, experience documents submitted are found to be bogus / forged, the appointment order will be cancelled. . Affidavit documents to this effect are to be submitted by the candidate at the time of examination. Any educational, caste or experience certificate found to be false or forged at any level will result in immediate termination of service of the concerned appointee and permanent disqualification from government service and criminal offence.
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. आरोग्य विभाग भरती करीता आवश्यक्य कागदपत्रांची यादी डाउनलोड करा तसेच या भरतीच्या जिल्ह्यानिहाय जाहिराती खालील लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.
त्यानंतर कार्यालयनिहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिध्द करण्याची कार्यवाही येईल. गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळविणा-या सर्व संबंधित उमेदवारांना याव्दारे आगाऊ सूचित करण्यात येते की, त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मुळ प्रतीसह साक्षाकित प्रती तयार करुन ठेवाव्यात.
उमेदवारांची आवश्यकतेनुसार Bio-metric verification करण्यात येईल. हंगामी फवारणी कर्मचा-यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राहय धरण्यात येईल.
कागदपत्र तपासणी जिल्हा / विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल.
उमेदवारांचा व शासनाचा अनावश्यक कालापव्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. जाहिरातीमधील नमूद अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाव्दारे सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.
ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदा. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून ०१ महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक, आरक्षण, अनुभव कागदपत्रे बोगस / बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाचे आहे. कोणतेही शैक्षणिक, जात किंवा अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्ती धारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल व शासन सेवेसाठी कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल.
गट क व ड सरळसेवा भरती २०२३ कागदपत्र तपासणी
Arogya Vibhag Bharti 2024 -arogya.maharashtra.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे राज्यातील ग्रामीण भागात सार्वजिनक आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वच विभागातील सरळसेवा, पदोन्नतीची २३ हजार ११२ पदे रिक्त असल्याने रुग्णांना अपेक्षित असलेली आरोग्य सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. टेक्निशियन नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना महागड्या चाचण्या, तपासण्या खासगी रुग्णालयांतून कराव्या लागतात. अनेक रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणवतो. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून फार्मासिस्ट, टेक्निशियन, वेगवेगळ्या चाचण्यांच्या तपासणीसाठी आवश्यक असलेले लॅबचे कर्मचारी अपुरे आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत, ग्रामीण रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यास भाग पाडतात. केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्याला वाढत्या रुग्णसेवेचा ताण पडतो. आरोग्य विभाग भरती करीता आवश्यक्य कागदपत्रांची यादी डाउनलोड करा तसेच या भरतीच्या जिल्ह्यानिहाय जाहिराती खालील लिंक वर उपलब्ध आहे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सार्वजनिक आरोग्य विभागात ‘अ’ गटातील क्लासवनची सरळसेवेची २५४४ पदे तर पदोन्नतीची १११३ तर ‘ब’ गटाची सरळसेवेची ९११ आणि पदोन्नतीची १८५ पदे रिक्त आहेत. शिवाय वैद्यकीय अधिकारी व्यतिरिक्त असलेली ११ हजार ६७९ सर्वाधिक पदे रिक्त असल्याने आरोग्य विभाग ‘ऑक्सिजन’वर आहे. या व्यतिरिक्त आरोग्यसेवक, आशा सेविका या ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाचा ‘कणा’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांचीही संख्या अपुरी असल्याने गावपातळीवर त्याचा परिणाम दिसून येतो. सरकारी योजना खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर खरंच पोहचतात का? हा देखील संशोधनाचा भाग ठरतो. माता व अर्भक मृत्यू दर घटविण्याच्या दृष्टीने माता व बालक यांचे आरोग्य सुधारणे, पायाभूत सेवा व कर्मचारी दोन्ही दृष्टीने दुय्यम पातळीवर रुग्णालय सेवा सुधारणे, राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका व इतर निम्न वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौशल्ये व ज्ञान अद्ययावत करून त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज असते. मात्र रिक्त पदांमुळे या सेवा रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीत.
आरोग्य संस्थांच्या इमारतींची देखभाल व दुरूस्ती नसल्याने रुग्णालय, केंद्रांची दुरवस्था झालेली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे. उपकेंद्रांमध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयित क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मात्र वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोनवेळाच येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. पथक येणार असल्याची माहिती मिळताच मात्र अधिकारी न चुकता हजर राहतात. इतरवेळी मात्र कर्मचाऱ्यांवरच केंद्र सुरु असते.
अतिदक्षता विभाग, विशेष नवजात दक्षता विभाग, जळीत विभाग, सी. टी. स्कॅन, सोनोग्राफी सेवा अनेक रुग्णालयात बंद असते. अनेकदा मशीन नादुरुस्त असल्याने रुग्णांना आठ आठ दिवस वाट पाहावी लागते. मशिन आहे तर टेक्निशियन नाही अशीही स्थिती राज्यात जिल्हा आणि सामान्य रुग्णालयांत आहे. राज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये, ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. या ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ज्ञ यांच्या सारखे तज्ज्ञ रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पदभरतीत आरोग्यचीच पदे लटकली शासनाने सध्या जिल्हा परिषदांच्या क गटातील पदभरती सुरू केलेली आहे. यात अहमदनगर जिल्हा परिषदेचे ९३७ पदे भरायची असून यात ७२७ पदे केवळ आरोग्यचीच आहेत. यात इतर पदांसाठी परीक्षा झाली, मात्र अजून आरोग्याच्या पदांचे वेळापत्रकच जाहीर झालेले नाही. म्हणजे आरोग्य विभागाची साडेसाती येथेही संपलेली नाहीArogya Vibhag Nokar Bharti
- आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
- महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे अपलोड करायची?
-
Arogya Vibhag Previous Year Question Paper
-
Join Free Aarogya Vibhag Test Series
- आरोग्य विभाग भरती नवीन अपडेट – परीक्षा नोव्हेंबर मध्ये वेळापत्रक लवकरच जाहीर होईल । Arogya Vibhag Bharti 2023 Hall Ticket
www arogya maharashtra gov in 2024 – District Wise
-
पुणे आरोग्य विभाग भरती 2023
-
नागपूर आरोग्य विभाग भरती 2023
-
औरंगाबाद आरोग्य विभाग भरती 2023
-
मुंबई आरोग्य विभाग भरती 2023
-
भंडारा आरोग्य विभाग भरती 2023
-
चंद्रपूर आरोग्य विभाग भरती 2023
-
गोंदिया आरोग्य विभाग भरती 2023
-
वर्धा आरोग्य विभाग भरती 2023
-
अहमदनगर आरोग्य विभाग भरती 2023
-
धुळे आरोग्य विभाग भरती 2023
-
नाशिक आरोग्य विभाग भरती 2023
-
अमरावती आरोग्य विभाग भरती 2023
-
बुलढाणा आरोग्य विभाग भरती 2023
-
यवतमाळ आरोग्य विभाग भरती 2023
-
वाशीम आरोग्य विभाग भरती 2023
-
नंदुरबार आरोग्य विभाग भरती 2023
-
सांगली आरोग्य विभाग भरती 2023
-
सातारा आरोग्य विभाग भरती 2023
-
सिंधुदुर्ग आरोग्य विभाग भरती 2023
-
अकोला आरोग्य विभाग भरती 2023
-
कोल्हापूर आरोग्य विभाग भरती 2023
-
गडचिरोली आरोग्य विभाग भरती 2023
-
बीड आरोग्य विभाग भरती 2023
-
जालना आरोग्य विभाग भरती 2023
-
उस्मानाबाद आरोग्य विभाग भरती 2023
-
लातूर आरोग्य विभाग भरती 2023
-
नांदेड आरोग्य विभाग भरती 2023
-
हिंगोली आरोग्य विभाग भरती 2023
-
परभणी आरोग्य विभाग भरती 2023
-
रत्नागिरी आरोग्य विभाग भरती 2023
-
जळगाव आरोग्य विभाग भरती 2023
-
सोलापूर आरोग्य विभाग भरती 2023
-
ठाणे आरोग्य विभाग भरती 2023
-
पालघर आरोग्य विभाग भरती 2023
-
रायगड आरोग्य विभाग भरती 2023
Table of Contents
Arogya seva
Arogya Vibhag Update
Result Out
Pharmacist freshrs aslyas job
Maha Arogya Vibhag Group C Bharti and Maha Arogya Vibhag Group D Bharti 2023 Out