ARO Kolhapur Agniveer Bharti 2026
Kolhapur Agniveer Bharti 2026: सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापुरात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अग्निवीर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणारी ही भरती प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात भरती प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. भरतीशी संबंधित सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
१६ सप्टेंबरच्या रात्रीपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रिया । Kolhapur Agniveer Bharti Schedule
अग्निवीर भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू होणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र पाठविण्यात येणार आहे. या भरतीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने युवक कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून वाहतूक, पार्किंग आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे.
उमेदवारांसाठी पाणी, स्वच्छतागृह आणि वाहतुकीची व्यवस्था
मोठ्या संख्येने उमेदवार येणार असल्याने भरती केंद्रावर पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी चोख वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची सुविधा करण्यासोबतच गर्दी होणाऱ्या मार्गांवरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उमेदवारांच्या धावण्याचा मार्ग स्वच्छ ठेवणे, मैदानावरील गवत काढणे आणि पावसाचे पाणी मैदानावर साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महिला सेना पोलिस पदासाठीही भरती | Kolhapur Mahila Agniveer Bharti
या अग्निवीर भरती प्रक्रियेत महिला सेना पोलिस पदासाठीही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महिला सेना पोलिस पदासाठीची भरती प्रक्रिया २९ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आर्थिक आमिषाला बळी पडू नका; भरती पूर्णपणे गुणवत्तेवर
अग्निवीर भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार असल्याचे भरती प्रक्रियेचे संचालक कर्नल प्रशांतसिंग यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक आमिषाला, दलालांच्या आश्वासनांना किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराला थारा दिला जाणार नसून उमेदवारांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा.
प्रशासनातील विविध विभागांचा सहभाग
भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल, पोलिस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सैनिक कल्याण विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
भरतीची महत्त्वाची माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| भरती | अग्निवीर भरती |
| भरती कालावधी | १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ |
| प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू | १६ सप्टेंबर २०२६ च्या रात्रीपासून |
| भरती ठिकाण | शिवाजी विद्यापीठाचे क्रीडांगण, कोल्हापूर |
| संबंधित जिल्हे | सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग |
| महिला सेना पोलिस भरती | २९ सप्टेंबर २०२६ |
| प्रवेशपत्र | उमेदवारांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणार |
उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र, अधिकृत सूचना आणि भरतीसंबंधी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक आमिषाला बळी न पडता केवळ अधिकृत प्रक्रियेद्वारेच भरतीमध्ये सहभागी व्हावे.
पोलिस परेड ग्राऊंडवर येत्या १३ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत अग्निवीर भरतीचे आयोजन केले आहे. ही भरती सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील युवकांसाठी आहे. ही भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोमवारी दिल्या.
भरती प्रक्रिया नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. ही भरती प्रक्रिया निर्विघ्नरीत्या पार पाडण्यासाठी लवकरच संबंधित विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांच्या नावे जिल्हा प्रशासनातर्फे आदेश काढण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. भरतीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजनाच्या सोई सुविधांच्या दृष्टीने महिला बचत गटांचे खाद्याचे स्टॉल त्या ठिकाणी उभारण्यात यावेत, असे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी दिले.
अग्निवीर भरती कार्यालयाचे (एआरओ) संचालक कर्नल प्रशांतसिंग म्हणाले, या भरतीसाठी महसूल, रोजगार, पोलिस, शिक्षण, आरोग्य वाहतूक, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम त्याचबरोबर जिल्हा सैनिक कल्याण विभागामार्फत साहाय्य मिळावे. ही भरती केवळ गुणवत्तेवरच होणार असल्याने उमेदवारांनी आर्थिक आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या आढावा बैठकीसाठी सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, सीपीआरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Previous Posts:
ARO Kolhapur Agniveer Bharti 2025
Kolhapur Agniveer Rally Bharti 2025 : The Army Recruitment Office Kolhapur invites applications for the Kolhapur, Satara, Sangli, Ratnagiri, and Sindhudurg districts candidates For selection test For Agniveer intake for recruitment 2025 under Agnipath Yojana. Online Registration will be open from the 25th of Nov to the 6th of Dec 2025. Candidates who are permanent residents from 05 districts of Maharashtra can participate in this recruitment. Further details are as follows:-
कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसह गोवा राज्यातील युवकांसाठी भारतीय सैन्य दलात अग्निवीर सैन्य भरती होणार आहे. पुणे भरती कार्यालया अंतर्गत २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा मैदान, सातारा येथे ही भरती प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ऑनलॉईन पध्दतीने www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर किंवा संदर्भित जिल्हा भरती कार्यालयत प्रत्यक्ष चौकशी करावी असे आवाहनही डॉ. चवदार यांनी केले आहे.
भारतीय सैन्य दलातील अग्निपथ (अग्निवीर) भरती प्रक्रिया साठीची प्रक्रिया राबविण्यासाठी आर्मी रिक्रुटिंग कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या अशी राहील हे बघण्यासारखे आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रांच्या पुरेशा प्रती, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार वैध शपथपत्र आणि योग्यरीत्या भरलेले असणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
…
स्टेरॉईड इंजेक्शन, दलालांना बळी पडू नका
‘संपूर्ण भरती प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक असल्याने दलालांना तरुणांनी बळी पडू नये. तसेच शारिरीक चाचणीदरम्यान तात्पुरती ऊर्जा मिळविण्यासाठी काही उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचे यापूर्वीच्या भरती मेळाव्यात निदर्शनास आले आहे. असे प्रकार उमेदवारांनी करू नयेत’, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.
भारतीय सैन्य दलातर्फे अग्निपथ (अग्निवीर) भरती योजना/नियमित संवर्ग अंतर्गत ११ ते १८ डिसेंबर कालावधीत शिवाजी विद्यापीठातील अॅथलेटिक्स मैदानावर हा भरती मेळावा होणार आहे. आर्मी रिक्रुटिंग कार्यालयातर्फे भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गोव्यातील तरुणांना रोजगार निर्माण करणे, त्याद्वारे त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देण्याकरिता ही भरती होईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर, तांत्रिक/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, अग्निवीर ट्रेड्समनकरीता ही भरती होईल. दहावी, आठवी उत्तीर्ण आणि सैनिक तांत्रिक नर्सिंग असिस्टंट पदांसाठी भरती होईल. अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच गोव्यातील (उत्तर गोवा/दक्षिण गोवा) दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट उमेदवारांना लागू आहे.
संपूर्ण भरती प्रक्रिया न्याय आणि पारदर्शक असल्याने दलालांना तरुणांनी बळी पडू नका, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे
- पदाचे नाव – अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कोल्हापूर
- वयोमर्यादा – 171⁄2 ते 21 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
Kolhapur Agniveer Recruitment Rally 2025
या पदांकरिता होणार भरती – (Army Nagpur Agniveer Rally 2025)
- अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)
- अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)
- अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)
- अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)
Educational Qualification For ARO Kolhapur Agniveer Bharti 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| अग्निवीर जनरल ड्यूटी | Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following the grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate. |
| अग्निवीर टेक्निकल | 10+2/Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with min 50% marks in aggregate and 40% in each subject. |
| अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 10+2 / Intermediate Exam Pass in any stream (Arts, Commerce, Science) with 60% marks in aggregate and a minimum of 50% in each subject. Securing 50% in English and Maths/Accts/Book Keeping in Cl XII is mandatory. |
| अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) | (a) Class 10th simple pass (b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
| अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) | (a) Class 8th simple pass (b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
Pay, Allowances and Allied Benefits – Army Recruiting Office Kolhapur Bharti 2025
(a) Agniveer Package
(i) The pay & emoluments of Agniveers will be as given below :-
- Year 1. Customised package – Rs 30,000/- (plus applicable allowances)
- Year 2. Customised package – Rs 33,000/- (plus applicable allowances)
- Year 3. Customised package – Rs 36,500/- (plus applicable allowances)
- Year 4. Customised package – Rs 40,000/- (plus applicable allowances)
Kolhapur Agniveer Bharti 2025 – Who Can Apply
कोण करू शकतो अर्ज?
महाराष्ट्र राज्यातील, पुढील ०५ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेले उमेदवार:-
- Kolhapur
- Satara
- Sangli
- Ratnagiri
- Sindhudurg
Important Documents – Kolhapur Army Bharti 2025
- 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
- शिक्षण प्रमाणपत्र
- सैन्य संबंध प्रमाणपत्र
- अविवाहित प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- क्रीडा प्रमाणपत्र
- एनसीसी प्रमाणपत्र
- डीओबी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Important Links For ARO Kolhapur Agniveer Application 2025 | |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | joinindianarmy.nic.in |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















