खुशखबर, साडेसात हजार उमेदवारांच्या नियुक्तीला मिळाली अखेर मंजुरी! – Approval for seven thousand appointments
Approval for seven thousand appointments
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या लिपिक, टंकलेखक आणि कर सहायक पदांच्या परीक्षांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीसंबंधी दाखल केलेल्या सर्व अर्ज महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव आणि प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर यांनी फेटाळले आहेत. त्यामुळे साडेसात हजार उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणी ३५० हून अधिक अर्ज न्यायाधिकरणासमोर आले होते. MPSC द्वारे कौशल्य चाचणीत तांत्रिक अडथळे आल्याने परीक्षा नव्याने घ्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. मात्र, आयोगाने ही मागणी फेटाळली. लेखी परीक्षेनंतर जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
नवीन टंकपटल (की-बोर्ड) आणि इतर साधनांमध्ये बदल झाल्याचा दावा अर्जदारांनी केला होता. मात्र, मॅटने हा दावा ग्राह्य धरला नाही आणि सर्व अर्ज नामंजूर केले. अर्जदारांच्या वतीने अॅड. अमोल चाळक, अॅड. प्रतीक भोसले आणि पी. एम. कांबळे यांनी बाजू मांडली, तर एमपीएससीतर्फे अॅड. बालाजी येणगे यांनी युक्तिवाद केला.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App