अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीला मंजुरी, नव्या प्रक्रियेनुसार निवड प्रक्रिया सुरु होणार!! – Approval for Professor Recruitment, Selection as per New Process!!
Approval for Professor Recruitment, Selection as per New Process!!
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीसाठी राज्य सरकारने अखेर मान्यता दिली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या भरती प्रक्रियेस मार्ग मोकळा झाला आहे. सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी नव्या गुणांकन पद्धतीनुसार निवड केली जाणार आहे.
नवीन प्रक्रियेनुसार, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनास ८० टक्के गुण, तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण दिले जाणार आहेत. तसेच, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवड समितीच्या बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या काही वर्षांत प्राध्यापक पदांसाठी पैसे मागितल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तसेच, गुणवत्ताधारक उमेदवारांऐवजी कमी पात्र उमेदवारांची निवड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नवीन कार्यपद्धतीमुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राहील, असे सरकारचे म्हणणे आहे.
निवड प्रक्रियेत उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे आणि संशोधन प्रावीण्याचे मूल्यमापन केले जाईल. त्याचबरोबर परिसंवाद, व्याख्यान प्रात्यक्षिक, तसेच अध्यापन व संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवर चर्चा होईल. १०० गुणांच्या एकत्रित मूल्यांकनात किमान ५० टक्के गुण मिळवणारे उमेदवारच अंतिम निवडीसाठी पात्र ठरणार आहेत.
यापुढे राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये याच कार्यपद्धतीनुसार भरती होणार आहे. निवड समितीच्या बैठकांचे चित्रीकरण करून त्यास सीलबंद ठेवले जाईल. तसेच, प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी निवड समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.