Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

Applications for the 12th Exam

Applications for the 12th Exam : hsc exam 2021 maharashtra board extended date for application for 12th exams – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज भरताना विषययोजनेसंदर्भात आणि काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे मंडळाने कळवले आहे. आता HSC 2021 परीक्षेसाठी नियमित शुल्कासह २८ जानेवारीपर्यंत तर विलंब शुल्कासह ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह १९ ते २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना या कालावधीत अर्ज भरणे शक्य होणार नाही अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह २९ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान अर्ज भरण्याची संधी शिक्षण मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने दिलासा दिला आहे. अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या विषयांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ या वर्षासाठीच या विषयांची परीक्षा देण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदाच्या वर्षापुरती जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

सोर्स : म. टा.


Applications for the 12th Exam : Applications for the 12th exam can be filled from December 15 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२१ आयाेजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरल डेटाबेसवरून १५ डिसेंबर, २०२० पासून ४ जानेवारी, २०२१ पर्यंत भरायचे आहेत, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार, तसेच काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ५ ते १८ जानेवारी, २०२१ दरम्यान ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील.

विद्यार्थ्यांचे अर्ज भरल्यानंतर त्यांना महाविद्यालयीन लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिली जाईल. प्री-लिस्टवरील माहिती आणि जनरल रजिस्टरमधील माहिती विद्यार्थ्यांनी पडताळून पाहून खात्री करून अर्ज निश्चित करायचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच अर्ज भरावे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले.

फॉर्म नंबर १७ भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक

फॉर्म नंबर १७ द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची २०२१ मधील परीक्षेची आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्चित केला जाईल. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीत या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरू नयेत, असेही मंडळाने स्पष्ट केले.

अर्ज भरण्याच्या तारखा

  • नियमित विद्यार्थी – १५ डिसेंबर, २०२० ते ४ जानेवारी, २०२१
  •  व्यवसाय अभ्यासक्रमचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार विद्यार्थी – ५ ते १८ जानेवारी, २०२१

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड