अनुकंपावरील १० हजार पदे भरण्याचा निर्णय – सप्टेंबरपासून भरती – Anukampa Bharti 2025
Anukampa Bharti 2025
Anukampa Bharti 2025
गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या सुमारे १० हजार जणांचे नोकरीचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. राज्य सकार, निमसरकारी संस्थामधील अनुकंपाच्या सर्व रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नियुक्ती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. सर्व अनुकंपा जाहिराती.
शासकीय अथवा निमशासकीय संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तर त्याच्या वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याचे अनुकंपा तत्वावरील नोकरीचे धोरण राज्यात सन १९७६ पासून राबविले जात आहे. या धोरणानुसार गट क आणि ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी ही अनुकंपा तत्वावरील नोकरीची सवलत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे तब्बल ९ हजार ६५८ उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ५०६ उमेदवार नांदेड जिल्ह्यातील असून त्या खालोखाल पुणे ३४८, गडचिरोली ३२२, नागपूर ३२० उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. यामध्ये राज्य सरकारच्या सेवेतील ५ हजार २२८, महापालिका, नगरपालिकामध्ये ७२५ तर जिल्हा परिषदांमध्ये ३ हजार ७०५ उमेदवारांची नियुक्ती रखडलेली आहे. मात्र आता अनुकंपावरील प्रतिक्षायादी संपविण्यासाठी सर्व उमेदवारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत अनेक सुधारणा करुन मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या निर्णयानुसार १५ सप्टेंबर पासून ही नियुक्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सध्या अनुकंपा नोकरीसाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरीसाठी एक वर्षात अर्ज करण्याचे बंधन असून आता त्यात तीन वर्षां पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच सध्याच्या नियमानुसार अनुकंपासाठी ४५ वर्षे कमाल वयोमर्यादा असून त्यानंतर उमेदवाराचे प्रतिक्षा यादीतून नाव रद्द होत असे. आता एखाद्या उमेदवाराला ४५ वर्षांपर्यंत नोकरी मिळाली नाही तर त्या कुटुंबातील अन्य व्यक्तीला नोकरीचा हक्क देण्यात आला आहे.
पूर्वी प्रतिक्षा यादीतील उमेदवाराला नाव बदल करता येत नव्हते मात्र आता कटुंबातील उमेदवाराचे नांव बदला येईल. तसेच एखाद्या कुटुंबाला अनुकंपा नोकरी योजनेची माहिती नसल्याने तीन वर्षात अर्ज करता आला नाही तरी त्या कुटुंबाला दोन वर्षांपर्यंत विलंब क्षमापित करण्याचा मुख्य सचिवांच्या समितीला असलेला अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता क गटातील उमेदवाराला ड गटासाठीही अर्ज करण्याची मुभा देण्यात येणार असून ड गटात जागा रिक्त नसल्याने २४५६ उमेदवार गेल्या पाच वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. या सर्वांची एकाचवेळी नियुक्ती करण्याचाही निर्णय सरकारने घेतला असून त्याबाबचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनुकंपा नियुक्तीचे सुधारीत सर्वसमावेशक धोरण 17 जुलै 2025 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याचे वेळापत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून नेमून दिलेले आहे. यानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असणार्या शासकीय कार्यालयांमधील गट क व गट ड पदांच्या सर्व नियुक्ती प्राधिकार्यांची पूर्व तयारी बैठक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.
या बैठकीमध्ये प्रतिक्षासुची अद्यायावत करणे, गट बदलणे, अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदांची परिगणना करणे, गट ड मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पूनर्जिवीत करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाच पाठविण्याबाबत तयारी करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात येणार आहे. काही विभागांमध्ये गट -क व गट ड संवर्गातील पदांचे नियुक्तीचे अधिकार विभागीय स्तरावर असतात. जरी पद भरतीचे अधिकार विभागीय स्तरावर असले तरी सुध्दा कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या विभागाचे जिल्हास्तरावरील प्रतिनिधी म्हणून अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने जिल्हा कार्यक्षेत्राचे कामकाजासाठी उपस्थित रहावे, असे सर्व कार्यालयप्रमुखांना कळविण्यात आले आहे.
अनुकंपावर कर्मचारी भरतीचा घोटाळा झाला असून, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. बनावट ऑर्डर तयार करून वरिष्ठ अभियंत्यांच्या स्वाक्षन्यांनिशी मसुदा तयार करीत ज्येष्ठता यादीत कर्मचाऱ्यांची नावे खालीवर करून अनेकांना नियुक्ती देण्याचे हे प्रकरण आहे. कट-पेस्ट, मॉर्फिग करून बनावट ऑर्डर दिल्याची शक्यता असून, यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. बांधकाम विभागाची ६ सदस्यीय समिती या प्रकरणात चौकशी करीत आहे. उपअभियंता बिन्हारे हे समितीचे अध्यक्ष असून, उपअभियंता ठाकूर, के.एम.आय. सय्यद, लिपिक कोंडवार, वरिष्ठ लिपिक इधाटे, सदावर्ते हे समिती सदस्य आहेत, २०१३ पासून आजपर्यंत अनुकंपा भरतीअंतर्गत ज्येष्ठता डावलून आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. यात बनावट आदेश तयार करणे, सेवा ज्येष्ठता यादीत हेराफेरी, तसेच जवळच्या नातेवाइकांचे ऑइनिंग ऑर्डर काढल्या गेल्या. १५ लाख रुपयांमध्ये एक आदेश तयार करण्यात आल्याची चर्चा असून, समिती तपास करीत आहे. येथील आस्थापना विभागातून कट-पेस्ट, मॉर्फिग करून बनावट ऑर्डर दिल्याचा संशय असल्यामुळे विभागात मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठवाडाभर व्याप्तीच्या घोळाची शक्यता…
या प्रकरणाची मराठवाडाभर व्याप्ती असण्याची शक्यता आहे. आस्थापना लिपिक अंकुश हिवाळे आदींवर या प्रकरणात संशय आहे. विभागातील सर्व कार्यकारी अभियंत्यांना अनुकंपा भरती प्रकरणातील आदेश तपासण्यासाठी पत्र दिले आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत जे समोर येईल त्यानुसार कारवाई होईल. ५ ते ६ प्रकरणे सध्या समोर आली आहेत.
जिल्हा परिषदेत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची २०२४ अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे. यामध्ये उमेदवारांचे जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेर एकूण ३५ व त्यापूर्वीचे एकूण ३१, अशा एकूण ६६ उमेदवारांची नावे समाविष्ट असून, त्यापैकी १३ उमेदवारांचे प्रस्ताव निकालात काढले आहेत. सद्य:स्थितीत ५३ उमेदवारांचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे नियुक्तीसाठी प्रलंबित आहेत. ही यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर आज प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मनीषा देसाई यांनी दिली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
देसाई म्हणाल्या, ‘या यादीमध्ये पूर्ण अर्ज, अपूर्ण अर्ज व निकाली काढलेले अर्ज असे स्वतंत्रपणे दिले आहे. ज्या उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दिले आहेत. त्यांची नावे ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ट केली आहेत. या यादीवर काही हरकती, दुरुस्ती असल्यास तसेच ज्यांची कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशांनी तीन फेब्रुवारीपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे समक्ष उपस्थित राहून माहिती द्यावी. मुदतीनंतर आलेल्या हरकती, दुरुस्ती यांचा विचार केला जाणार नाही.’
Anukampa Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ४५ वर्षांच्या वयोमर्यादा ओलांडलेल्या वारसदाराच्या जागी दुसऱ्या पात्र वारसदाराचा नोकरीच्या यादीत समावेश करता येईल, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने दिला आहे.
ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील वनरक्षक अकबर खान मो. खान पठाण यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. १२ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या अपघातात अकबर खान यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलगा मो. जुबेर खान यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी यादीत समाविष्ट करण्यात आले. मात्र, वयोमर्यादा ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना नोकरी देण्यात आली नाही.
या परिस्थितीत, जुबेर खान यांनी आपली बहीण नोकरीसाठी पात्र ठरावी यासाठी १६ ऑक्टोबर २०२३ रोजी अर्ज केला होता. तथापि, २० मे २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेत हा अर्ज अमान्य करण्यात आला. त्यामुळे त्यांना नोकरीसाठी संधी मिळाली नाही.
या निर्णयाविरोधात मो. जुबेर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास करून कायद्यानुसार निर्णय घेण्याचे निर्देश वन विभागाला दिले. या निर्णयामुळे वनरक्षक अकबर खान यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
हा निर्णय अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या संदर्भात एक महत्त्वाचा निकाल ठरत असून, भविष्यात अशा प्रकरणांमध्ये त्याचा उपयोग होईल.
2024 संभाजी नगर अनुकंपा भरती कधी आहे
Anukampa Bharti बांधकाम विभाग गडचिरोली
Anukampa Bharti 2023 Latest Updates
आदिवासी विकास भरती केव्हा?