अनुकंपावरील नोकरीसाठी वारसाला दिलासा, पूर्ण माहिती बघा! – Anukampa Bharti 2024

Anukampa Bharti 2024

Anukampa Bharti 2024 Update

 

प्राप्त नवीन अपडेट नुसार, तालुका कृषी विभागात सहायक कृषी सहायक पदावर असताना १९९९ मध्ये मृत पावलेले सोपान शिदोरे यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या मुलाला तीन महिन्यांत नोकरी देण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाचे सदस्य न्या. व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत. याप्रकरणी अमोल सोपान शिदोरे यांनी अॅड. संदीप आंधळे यांच्यामार्फत खंडपीठातील मॅटमध्ये धाव घेतली होती.

सदर अर्ज अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या वर्षभरात न केल्याच्या मुद्यावरून अमोल शिदोरे यांचा अनुकंपावरील नोकरीसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता. अमोल यांचे वडील सोपान शिदोरे यांचे १९९९ साली शासकीय सेवेत असतानाच निधन झाले. त्यांच्या पत्नीने आपल्याऐवजी मुलांना शिक्षण आणि वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पतीच्या जागेवर नोकरीसाठी घ्यावे, असा विनंती अर्ज जानेवारी २००० मध्ये म्हणजे पतीच्या निधनानंतर महिनाभरात संबंधित कार्यालयास केला होता. २०१४ साली अमोल यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच पुण्यातील विभागीय कृषी संचालक कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केले होते. परंतु अमोल यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वर्षभरात अर्ज केला नाही, या कारणास्तव तो फेटाळण्यात आला होता, आदी बाबी युक्तिवादात निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतरही मॅटने वरील आदेश दिले.

 


 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Anukampa Bharti 2024: A Government servant has more than two children. Observing that his family was therefore ineligible for the benefit of compassionate appointment, the High Court dismissed the claim of a deceased policeman’s wife for compassionate appointment of her son. The decision was challenged in court after the Maharashtra Administrative Tribunal (MAT) disqualified him for compassionate appointment. take A. S. Chandurkar and Nya. The petition was heard before the bench of Rajesh Patil. Considering the claim made by the respondent and the decision of the MAT, the Bench opined that our interference in the matter is not required

सरकारी कर्मचाऱ्याला दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत. त्यामुळे त्याचे कुटुंब अनुकंपा नियुक्तीच्या लाभास अपात्र आहे, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका मृत पोलिसाच्या पत्नीने अनुकंपा तत्त्वानुसार मुलाच्या नियुक्तीसाठी केलेला दावा फेटाळला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्यास अपात्र ठरवल्यानंतर या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. ए. एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. प्रतिवादीने केलेला दावा आणि मॅटच्या निर्णयाचा विचार केला असता, या प्रकरणी आमच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

याचिकाकर्त्या विद्या अहिरे यांच्या पतीचा २०१३ मध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांनी पतीच्या जागेवर मुलाची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करावी, अशी मागणी केली. परंतु, सरकारने त्यांना लाभ देण्यास नकार दिला; कारण २००१च्या अधिसूचनेनुसार, दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र ठरविण्यात येते.

याचिकाकर्तीचा दावा

महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाची घोषणा) नियम लागू होण्यापूर्वी तिसऱ्या मुलाचा जन्म झाल्यामुळे ही सूचना लागू होत नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्तीच्या वकिलांनी खंडपीठापुढे केला. राज्य सरकारने न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालाचे समर्थन केले.

अधिसूचनेतील तरतूद…

३१ डिसेंबर २००१ नंतर कुटुंबात तिसरे अपत्य जन्माला आल्यास, अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिली जाऊ शकत नाही आणि असे कुटुंब कोणत्याही अनुकंपा नियुक्तीसाठी अपात्र असेल.

२००१ ची अधिसूचना कुठेही प्रकाशित करण्यात आली नाही आणि मृत व्यक्तीला या अधिसूचनेची माहिती नव्हती, असा दावा करत याचिकाकर्तीने या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


Anukampa Recruitment Update 2024

Anukampa Bharti 2024: अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या वारसाला वयाच्या ४५ वर्षापर्यंत नोकरी न मिळाल्यास त्याच्या स्थानावर दुसऱ्या पात्र वारसाला समावेश केला जाऊ शकतो. यामुळे अनुकंपा नोकरीचे धोरण प्रभावित होत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्ण न्यायपीठाने मंगळवारी दिला. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

प्रतीक्षा यादीमध्ये समावेश असलेल्या वारसाला वयाच्या ४५ वर्षापर्यंत नोकरी न मिळाल्यास त्याचे नाव यादीतून वगळले जाईल, अशी एक तरतूद आहे. दुसऱ्या तरतुदीनुसार प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराच्या स्थानावर केवळ त्याच्या मृत्यूनंतरच दुसऱ्या पात्र उमेदवाराचा समावेश केला जाऊ शकतो. या दोन्ही तरतुदींविरूद्ध अकरा याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांना उच्च न्यायालयाच्या इतर द्विसदस्यीय न्यायपीठांनी ‘ज्ञानेश्वर मुसाने’ सह इतर प्रकरणांत वारसांच्या अदलाबदलीसंदर्भात घेतलेली भूमिका अयोग्य वाटली. वारसाला ४५ वर्षापर्यंत नोकरी न मिळाल्यास त्याच्या स्थानावर दुसऱ्या पात्र वारसाचा समावेश केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे


Anukampa Bharti 2024Update

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असताना आई, वडील किंवा पतीचे अनुकंपा तत्त्वावर वारसाला नोकरी दिली जाते. त्यानुसार झेडपीतील एकूण रिक्त पदाच्या २० टक्के जागावर शुक्रवारी जिल्हा परिषदेतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील विविध पदावर निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली तर सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्त्वावरील रिक्त असलेल्या पदासाठीची भरती प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

या भरती प्रक्रियेसाठी पात्र असलेल्या जिल्हाभरातील एकूण ९९ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यानुसार अनुकंपावर नियुक्तीसाठी संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दस्तऐवजांचे पडताळणीनंतर पात्र असलेल्या ९९ उमेदवारांना जिल्हा परिषदेतील विविध विभागातील रिक्त असलेल्या पदावर समुपदेशन पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये स्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ सहायक लेखा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, वरिष्ठ सहायक लिपीक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, अंगणवाडी पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा, परिचर आदी पदावर सामावून घेण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी सहायक प्रशासन अधिकारी नीलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम, कनिष्ठ प्रशासन गजानन कोरडे, कनिष्ठ सहायक राहुल रायबोले, निशांत तायडे, सुजीत गावंडे, सतीश पवार, समक्ष चांदुरे, राजू गाडे आदींनी अनुकंपा भरतीसाठी सहकार्य केले. जिल्हा परिषदेत अनुकंपावर विविध पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश दिले जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.

अशा मिळाल्या अनुकंपावर नियुक्त्या
स्थापत्य अभियंता सहायक-०८,कनिष्ठ सहायक लेखा-०१,प्रयोग शाळा तंत्रज्ञ-१,आरोग्य सेवक पुरुष-१९,वरिष्ठ सहायक लिपिक-०२,विस्तार अधिकारी सांख्यिकी-०२,अंगणवाडी पर्यवेक्षक-०२,औषध निर्माण अधिकारी-०२,कंत्राटी ग्रामसेवक-१८,कनिष्ठ अभियंता बांधकाम-०१,कनिष्ठ अभियंता पाणीपुरवठा-०४ या प्रमाणे नियुक्त्या दिल्या आहेत.


 

Anukampa Bharti 2024 – The process of recruiting compassionate staff in the bmc has started and is expected to take place in the next two months. Several cases of compassionate recruitment are pending in Jalgaon Municipal Corporation. The scrutiny of the proposal has now begun. Contract recruitment is being done for 86 posts in the bmc. Candidates have been selected after inviting applications and conducting interviews. However, he has not yet been ordered to be appointed. It will be signed in the next two days and appointment orders will be issued to the selected candidates concerned.

 

महापालिकेतील अनुकंपा कर्मचारी भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून येत्या दोन महिन्यात ती होणार असल्याची माहिती आहे. जळगाव महापालिकेत अनुकंपा भरतीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावाची छाननी आता सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत ८६ पदासाठी कंत्राटी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज मागवून मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले नाहीत. येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षऱ्या होवून संबधित निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. 

 


कर्तव्यावर सेवा बजावताना मृत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे वारस गेल्या सहा वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत वारसदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाने अनुकंपावरील नियुक्तीला गती दिल्याचे दिसून येत असून, ३७ उमेदवारांची अनुकंपा सूची जाहीर केली आहे. आयुक्तालयाच्या या निर्णयामुळे अनुकंपावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या वारसदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत कर्तव्यावर असताना पोलिस कर्मचारी मृत झाले आहेत. या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाच्या तत्त्वान्वये पोलिस दलामध्ये नियुक्ती करावयाची आहे. 

 

२०२० ते २०२२ या तीन वर्षांतील अनुकंपावरील ३७ वारसदार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील पाच उमेदवारांची गेल्या जुलै महिन्यात ‘शासन आपल्या दारीच्या’च्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली आहे.

यात नीलेश निवृत्ती जाधव, पूजा दिलीप भदाणे, हर्षल अनिल जाधव, प्रवण भास्कर जगताप आणि प्रशांत सतीश देशमुख यांचा समावेश आहे.

उर्वरित अनुकंपावरील वारसदारांना अजूनही नियुक्तीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रतीक्षासूची नुकतीच जाहीर केली आहे.

यामुळे अनुकंपातील वारसदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पात्र वारसदारांना नियुक्तिपत्रे मिळणार असल्याने लवकरच ते पोलिससेवेत हजर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

Anukampa Bharti 2023: Eligible candidates for Compassionate Recruitment 2021-22 are often looking for jobs in Dist. W. Came to the office and followed up from time to time. However, there was disappointment regarding this recruitment process. Although sympathetic candidates are active regarding this recruitment process, the administration is indifferent

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपावरील प्रतीक्षेत असलेल्या जवळपास १८० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २१ डिसेंबर २०१२ रोजी केली. मात्र, यातील एकाही उमेदवाराला नोकरीचे नियुक्तिपत्र मिळाले नाही. परिणामी, जि. प. अंतर्गत १८० अनुकंपाधारक अद्यापही जि.प.च्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.. 

सन २०२१-२२ च्या अनुकंपा तत्त्वावरील पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी नोकरीच्या अपेक्षेने अनेकदा जि. प. कार्यालयात येऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, या भरती प्रक्रियेबाबत निराशाच हाती पडली. या भरती प्रक्रियेबाबत अनुकंपाधारक उमेदवार सक्रिय असले तरी प्रशासन उदासीन आहे


Anukampa Bharti 2024

Divisional Commissioner Vijay Laxmi Bidari today directed the department to conduct a special drive for compassionate recruitment and complete the compassionate recruitment process within a month. Bidri also said that the district collector and all heads of departments should expedite the recruitment process to meet the target of recruiting 500 candidates on compassionate grounds in the department. According to the government decision, 20 percent of the total posts of direct service in Group-C and Group-D are to be filled through compassionate means.

 

अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत.

पदभरती करतांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला प्राधान्य द्यावे. अनुकंपा प्रतिक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नसतील अशा विभागांनी जिल्ह्याच्या सामायिक यादीतून भरती करावी. तसेच गट-क संदर्भात जिल्ह्यात उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतून जेष्ठतेनुसार उमेदवारांची निवड करावी. विशेष तांत्रिक अर्हता आवश्यक असणारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर जिल्ह्यांकडे अनुकंपा उमेदवारांची मागणी करावी. गट-ड ची पदे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतूनच भरण्यात यावे. विहित कालावधीत नियुक्ती न स्विकारणाऱ्या उमेदवारांऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी. सर्व विभागांनी गट-क व गट-ड ची अनुकंपा पदभरती नागपूर विभागातील सामायिक प्रतिक्षा यादीतून करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या. महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध ७० विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला. डिसेंबर अखेर विभागात एकूण १ हजार ७६९ उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत ८२२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी दिली.

 


 

Anukampa Bharti 2024: The government has approved the inclusion of candidates from the police force in the list of joint sympathizers under the Collectorate. Recruitment Process for Compassionate Police Constabulary to be held from Wednesday; Opportunity for 10 posts as Talathi and Clerk in category ‘C’ candidates. Check below information regarding Anukampa Bharti 2023 at below:

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार ‘क’ संवर्गातील १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची दि.४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

२४ उमेदवारांच्या भवितव्याचा मार्ग मोकळा

जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीत यापूर्वी पोलीस पाल्यांना संधी दिली जात नव्हती. वास्तविकता तरतूद असतानाही राज्यभरात पोलीस दलातील पात्र उमेदवारांचा प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात येत नव्हता. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य केवळ पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या जागांवरच अवलंबून राहत होते. त्यामुळे काही जण वयोमर्यादेची अट ओलांडून बसत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आणि पोलीस दलातील अनुकंपाधारकांना जिल्हास्तरीय सामायिक यादीत स्थान देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गृह सचिवांकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनीही मंज़ुरी दिल्याने या २४ उमेदवारांच्या भवितव्याचा मार्ग मोकळा झाला.

७ जण होणार तलाठी

७ जण होणार तलाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात ७ तलाठी व पुरवठा विभागातील ३ लिपीकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘क’ संवर्गातील १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची सुरुवातीला पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना लागलीच रिक्तपदांवर नियुक्ती देऊन त्यांना शासन सेवेत दाखल करुन घेण्यात येणार आहे. यांना नोकरीची संधी ‘क’ संवर्गातील छाया चैत्राम झटके (किनगाव), दामिनी धर्मेंद्र महाजन (जळगाव), शीतल राजेश राजपूत (जळगाव), रितेश विजय पवार (चाळीसगाव), सोनाली रमेश कोळी (जळगाव), हर्षल ब्रिजलाल पाटील (भुसावळ), सोनल विकास विचवेकर (भुसावळ), सुजाता चारुदत्त चौधरी (जळगाव), रेणूका रमेश पाटील (जळगाव), मृणाल मधुकर मेहरुणकर (अकोला), सुजर रामगोपाल यादव (भुसावळ), कवीता चंपालाल धनगर (वर्डी, चोपडा), दुर्गेश सुधाकर भालेराव (जळगाव) व श्वेता राजेंद्र ससाणे (नाशिक) यांच्यापैकी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या १० जागांवर संधी दिली जाणार आहे.


Anukampa Bharti 2024 Selection List

Anukampa Bharti 2023 : A total of 78 candidates who are waiting for compassionate appointment in the Zilla Parishad have been absorbed into the government service under Anukampa Bharti 2023. This appointment completes the list of compassionate appointments till the end of 2020. Regarding this transparent process, a total of 78 selected candidates were appointed today through counseling method on compassionate basis by Chief Executive Officer of Zilla Parishad Soumya Sharma. Check Anukampa Bharti Selection List.

अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत. महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध ७० विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला. डिसेंबर अखेर विभागात एकूण १,७६९ उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत ८२२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली

 


जिल्हा परिषदेत अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकूण ७८ उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या नियुक्तीमुळे सन २०२० अखेरपर्यंतची अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीची यादी पूर्ण झाली आहे. या पारदर्शक प्रक्रियेबद्दल आज निवड झालेल्या एकूण ७८ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर समुपदेशन पद्धतीद्वारे नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते देण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात ही समुपदेशन प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजनंदिनी भागवत व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. नियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागांतर्गत विस्तार अधिकारी (सां) १, वरिष्ठ सहायक १, कनिष्ठ सहायक ४, परिचर १०, बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता (विद्युत) १, कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु) ६, पंचायत विभागांतर्गत ग्रामसेवक २४, आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक २२, औषध निर्माण अधिकारी १, महिला व बाल कल्याण विभागांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका ४, वित्त विभागांतर्गत वरिष्ठ सहायक (लेखा) २, कनिष्ठ सहायक (लेखा) १, पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन पर्यवेक्षक १ अशा एकूण ७८ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.


Anukampa Bharti 2024

Anukampa Bharti 2023: The latest update for Anukampa Recruitment 2023 Maharashtra. Adhyaksha Prakash Nikam’s meeting with Chief Minister Eknath Shinde resulted in the delayed recruitment process of the Palghar Zilla Parishad candidates due to compassion. As per the instructions received from the government, the path of compassionate recruitment has become easier. For more details about Maharashtra Anukampa Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

 

शासकीय सेवेत असताना कर्मचार्‍यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवते. अशावेळी त्या कुटुंबातील वारसदारांना अनुकंपावर नोकरीवर सामावून घेतले जाते. मात्र गेल्या चार-पाच वर्षापासून अनुकंपा धारकांची यादी लावूनही अजूनपर्यंत त्यांना नोकरीमध्ये सामावून घेण्यात आले नसल्याने गडचिरोली येथील जिल्हा परिषद प्रशासन हे अनुकंपाधारकांची थट्टाच करीत असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपावरील प्रतीक्षेत असलेल्या जवळपास 187 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 21 डिसेंबर 2022 रोजी केली. मात्र यातील एकाही उमेदवाराला नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाले नाही. परिणामी जिल्हा परिषदेअंतर्गत 187 अनुकंपाधारक अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. सन 2021-22 च्या अनुकंपा तत्वावरील पद भरतीसाठी पात्र उमेदवारांनी नोकरीच्या अपेक्षेने अनेकदा जिल्हा परिषद कार्यालयात येऊन वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र या भरती प्रक्रियेबाबत निराशाच हाती पडली. सदर भरती प्रक्रियेत अनुकंपा धारक उमेदवार सक्रिय असले तरी जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने नोकरीची खात्री किंवा शाश्वती मिळत नसल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केलेला आहे.

 

शासकीय सेवेमध्ये असताना एखाद्या कर्मचार्‍याचे जर निधन झाले तर त्याच्या वारसांना अनुकंपाच्या माध्यमातून सदर आस्थापनेमध्ये नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या पद्धतीने एकूण रिक्तपैकी 20 टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी तरतूद आहे. परंतु गडचिरोली जिल्हा परिषद पद भरतीबाबत उदासीन दिसून येत आहे. अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रतिवर्षी व्हावी याकरिता अनुकंपा नियुक्तीच्या कार्यपद्धतीबाबत असणारा संभ्रम दूर करून अनुकंपा नियुक्तीच्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यास सहाय्यभूत होण्यासाठी अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धती 26 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रकाशित केलेली आहे. मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, असा आरोप अनुकंपा धारकांनी केलेला आहे.

 

जिल्हा परिषद प्रशासनाने नियुक्ती संदर्भाने वर्ग 3 करिता 187 व वर्ग 4 करीता 3 असे एकूण 190 उमेदवारांची अंतिम यादी 29 नोव्हेंबर 2022 रोजी जिपच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेली होती. त्या अनुषंगाने 21 डिसेंबर 2022 रोजी दस्तऐवजांची पडताळणी करणेसुद्धा पार पडले. सदर भरती समुपदेशन प्रक्रिया बाकी असून सदर बाबीला चार महिन्यांचा कालावधी लोटलेला आहे. आर्थिक वर्षाचा विचार करता सन 2021-22 ची भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याने बराच विलंब झालेला आहे. जिपकडे सक्रिय पद्धतीने पाठपुरावा करूनही भरती समुपदेशन प्रक्रियेचा मूहूर्त निघत नसल्यामुळे अनुकंपा धारकांत असंतोष असून तत्काळ भरती व्हावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी केलेली आहे.

 

अनुकंपा धारकांनी नोकरीत सामावून घेण्यासाठी 18 एप्रिलपासून मुंबईच्या आजाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली व 21 एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. या प्रकरणावर त्वरित तोडगा काढावा व नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी अनुकंपाधारकांनी केली आहे.

 


 

अनेक तरुणांची नावे अनुकंपाधारकांच्या यादीत असून, १० ते १२ वर्षांपासून हे तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांचे तर वय झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले. अनुकंपाधारकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फेब्रुवारी २०२३ या महिन्यात सर्व विभागांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती देण्याचे आदेश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. जिल्हाधिकारी सामायिक यादीमधून नाशिकमध्ये १२७ अनुकंपाधारकांची नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतील अनुकंपा उमेदवार असून, मागील अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

पुणे, कोल्हापूर, नांदेड, परभणी, लातूर, नाशिक व इतर जिल्ह्यांत सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीतून पात्र उमेदवारांना नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातही सर्व विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाधारकांना शासकीय सेवेत घ्यावे, त्यांच्या वयाचा विचार करता एजबार होण्यापूर्वी सेवेत घ्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांनी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्याकडे करीत निवेदन सादर केले.


अध्यक्ष प्रकाश निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केल्याने २०१४ पासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा परिषदेच्या अनुकंपा उमेदवारांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून शासनाकडून मिळालेल्या निर्देशामुळे अनुकंपा भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम तसेच २०१४ पासूनचे जिल्हा परिषदेचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सध्याचे विद्यमान उपाध्यक्ष, सर्व समिती सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांच्या प्रयत्नाने अनुकंपा भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून काही दिवसांत अनुकंपा उमेदवारांची भरती करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे. भरती करण्याकरिता शासनाकडून जे मार्गदर्शन मागवले होते ते जिल्हा परिषद अध्यक्ष निकम यांनी प्राप्त करून शासनाकडे सादर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे भरतीबाबतची पुढील प्रक्रिया जिल्हा परिषदेतमार्फत सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

प्रकाश निमक यांनी आवाहन केल्याप्रमाणे कुठलाही गैरव्यवहार न होता पारदर्शकपणे ही भरती करण्यात येईल, असे सांगण्यात आले असले तरी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वाखाली भरती झाली होती, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनी गैरप्रकार केले होते, हा गैरप्रकार उघडकीस येऊन या सर्व अधिकाऱ्यांना न्यायालयाने कोठडीत ठेवले होते; मात्र कोरोनाच्या काळात कारागृहात कैद्यांची गर्दी झाल्याने या अधिकाऱ्यांना अटी-शर्तीवर सोडण्यात आले होते. त्यातील काही अधिकारी पुन्हा पालघर जिल्हा परिषदेमध्ये आता कार्यरत आहेत. अनुकंपामधील बऱ्याच उमेदवारांची वये उलटून गेली आहेत. त्यामुळे भरतीमध्ये पुन्हा गैरप्रकार होण्याची शक्यता अनुकंपामधील उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

 


 

देशाच्या sympathizers अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरळसेवा भरतीतंर्गत 75 हजार जागा भरण्याचा निर्णय शासनाने केला आहे. यात सरळसेवा कोट्यातील प्रति वर्ष रिक्त होणार्‍या 20 टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरावयाची संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नवीन यादी प्रकाशित करुन 2022 च्या अनुकंपा भरती प्रक्रिया सुरुवात करण्यात यावी हि मागणी सध्या जोर धरत आहे.

तसेच, गोंदिया जिल्हा परिषदेला जवळपास 180 अनुकंपाधारक नियुक्तीची वाट पहात आहेत. 2005 नंतर ज्या कर्मचार्‍यांची नियुक्ती झाली अशा कर्मचार्‍यांच्या निधनानंतर पेंशन सुद्धा लागू झाली नाही. त्यामुळे अशा कुटूंबांना आर्थिक प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश जिल्ह्यात अनुकंपाची नवीन यादी प्रकाशित झाली असून गोंदिया जिल्ह्यातील भरती प्रक्रिया मागे का, असा प्रश्न अनुकंपाधारकांसमोर आहे. या 180 अनुकंपाधारकांवर जवळपास 300 कुटूंबांची जबाबदारी आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेची नवीन यादी प्रकाशित करुन 2022 च्या भरती प्रक्रिया लवकरात लवकर घेण्यात यावी.


अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षा यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या पहिल्या वारसदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला संधी देण्याची अट बेकायदेशीर आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला.

 

सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू नये, या उद्देशाने अनुकंपा नोकरीचे धोरण लागू करण्यात आले आहे. संबंधित अटीमुळे या धोरणाची पायमल्ली होते. धोरणानुसार दिवंगत कर्मचाऱ्याचा कोणताही एक वारसदार अनुकंपा नोकरी मिळण्यासाठी पात्र आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीमध्ये प्रथम नाव टाकण्यात आलेल्या वारसदाराची संमती असल्यास त्याच्या जागेवर दुसऱ्या वारसदाराला संधी दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने नमूद केले.

Anukampa Recruitment 2022 Maharashtra 

Anukampa Bharti 2022


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Vishal magre says

    2024 संभाजी नगर अनुकंपा भरती कधी आहे

  2. Ganesh kawduji kulmethe says

    Anukampa Bharti बांधकाम विभाग गडचिरोली

  3. MahaBharti says

    Anukampa Bharti 2023 Latest Updates

  4. Atul says

    आदिवासी विकास भरती केव्हा?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड