JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

‘ड्रग्ज ‘विरोधी कृतिदलासाठी ३४६ नवीन पदांची नवीन भरती लवकरच!- ANTF Maharashtra Recruitment

अँटीनार्कोटिक्स टास्कफोर्स (ANTF Bharti Recruitment) राज्यात स्थापन करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यात बंद कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण प्रक्रियेला गतीही देण्यात आली आहे. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. 

ANTF Bharti 2025 Apply Online

 

तसेच पुणे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ललित पाटील प्रकरणात ४ पोलिस बडतर्फ करण्यात आले आहे आहेत. ललित पाटीलला प्रथम अटक झाली, तेव्हा त्याची पोलिस कोठडीच घेतली नाही. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनी एप्रिल २०२१ मध्ये हायकोर्टात जाण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली, पण तत्कालिन राज्य सरकारने ती दिलीच नाही. ललित हा उबाठा गटाचा शिवसेनाप्रमुख होता. पण मी याला कधीच राजकीय रंग दिला नाही, कारण अशा प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई हे त्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

  • विशेष पोलीस महानिरीक्षक- एक,
  • पोलीस उपमहानिरीक्षक एक,
  • पोलीस अधीक्षक-तीन,
  • अपर पोलीस अधीक्षक-तीन,
  • पोलीस अधीक्षक- 10,
  • पोलीस निरीक्षक 15,
  • सहाय्यक पोलीस निरीक्षक – 15,
  • पोलीस उपनिरीक्षक – 20,
  • सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक – 35,
  • पोलीस हवालदार – 48,
  • पोलीस शिपाई – 83,
  • चालक पोलीस हवालदार -18,
  • चालक पोलीस शिपाई – 32,
  • कार्यालय अधीक्षक – एक,
  • प्रमुख लिपीक – दोन,
  • वरिष्ठ श्रेणी लिपीक -11,
  • कनिष्ठ श्रेणी लिपीक – सात,
  • उच्च श्रेणी लघुलेखक – दोन,
  • निम्न श्रेणी लघुलेखक – तीन.

बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने) 

  • वैज्ञानिक सहाय्यक-तीन,
  • विधी अधिकारी – तीन,
  • कार्यालयीन शिपाई -18,
  • सफाईगार – 12
  • एकूण – 36.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड