अंगणवाडी सेविका बनणार आता ‘शिक्षिका’! नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणात मोठा बदल; चिमुकल्यांना मिळणार नव्या पद्धतीने शिक्षणाचा पहिला धडा! | Anganwadi Workers Turned Teachers!
Anganwadi Workers Turned Teachers!
अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाचा अपडेट, महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. अंगणवाडी सेविका आता केवळ देखरेख करणाऱ्या नाहीत, तर प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षिका बनणार आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP 2020) अंमलबजावणी सुरू होत आहे. याअंतर्गत अंगणवाड्या आणि इयत्ता पहिलीचे अभ्यासक्रम बदलले जाणार असून, प्राथमिक शिक्षणाची पायाभरणी अधिक मजबूत करण्यात येणार आहे. या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेऊया..
अंगणवाडी सेविकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन – शिक्षणाची व्यावसायिक ओळख!
सध्या राज्यात एकूण ५५३ एकात्मिक बालविकास प्रकल्पांअंतर्गत तब्बल १ लाख १० हजार ५५६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये सव्वा लाखांहून अधिक सेविका सेवा देत आहेत. त्यातील दहावी व बारावी उत्तीर्ण सेविकांना आता प्रशिक्षण देण्यात येत आहे. बारावी उत्तीर्ण सेविकांना ६ महिने, तर दहावी उत्तीर्ण सेविकांना १ वर्षाचा बालशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रशिक्षणातून घडणार नव्या शिक्षणदूत – ‘डायट’कडून आठ कार्यशाळांची मालिका!
सेविकांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मार्फत आठ कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील दोन कार्यशाळा पूर्ण झाल्या असून, उर्वरित कार्यशाळा लवकरच पार पडतील. या कार्यशाळांमधून सेविकांना चिमुकल्यांना अक्षरओळख, अंकओळख, शब्दांचे उच्चार, रंग-आकार यांसारख्या बाबी मनोरंजनाच्या पद्धतीने शिकवण्याचे मार्गदर्शन दिले जात आहे.
शिक्षणामध्ये आता पालकांचीही सक्रिय भागीदारी!
नव्या धोरणानुसार, पालकांचाही शिक्षण प्रक्रियेत समावेश करण्यावर भर दिला जात आहे. अंगणवाडीत दाखल होणाऱ्या ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक विकासासाठी पालकांशी संवाद साधण्याची जबाबदारी सेविकांवर येणार आहे. यामुळे घरात व शाळेत एकसंध विकासासाठी पूरक वातावरण तयार होणार आहे.
‘मनोरंजनातून शिक्षण’ – नव्या अध्यापन शैलीचा केंद्रबिंदू!
चिमुकल्यांमध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी, त्यांचे शिक्षण हे खेळ, कला, गाणी, गोष्टी या माध्यमातून व्हावे, यासाठी ‘मनोरंजनातून शिक्षण’ या तत्त्वाला प्राधान्य दिले जाणार आहे. सेविकांनी मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि संवाद कौशल्य वाढवण्यासाठी बालमैत्री पद्धतीने शिकवणी करावी, असा उद्देश आहे.
प्राथमिक शिक्षकांसाठीही प्रशिक्षण अनिवार्य!
फक्त अंगणवाडी सेविकाच नव्हे, तर इयत्ता पहिली शिकवणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनाही नव्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन पाठ्यक्रमाची रचना, मूल्यांकन प्रणाली आणि अध्यापन कौशल्ये याबाबत शिक्षकांना सज्ज केले जाईल.
झेडपी शाळांची पटसंख्या वाढण्याची शक्यता!
अंगणवाड्यांचे शिक्षणशास्त्रीय रूपांतर झाल्याने आणि अध्यापनाची गुणवत्ता वाढल्याने जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात सरकारी शिक्षण संस्थांवरील विश्वास अधिक मजबूत होणार असून, खाजगी शाळांमधून सरकारी शाळांकडे वळणारा ओघ वाढण्याची चिन्हं आहेत.
बालशिक्षणाची नवीन दिशा – सेविकांमधून घडतील उद्याच्या शिक्षिका!
हे परिवर्तन म्हणजे केवळ नावापुरते नव्हे, तर शिक्षणाच्या स्वरूपात खोलवर बदल करणारी पायाभरणी आहे. यामुळे अंगणवाडी सेविका हे केवळ ‘सेविका’ राहणार नाहीत, तर त्या संवेदनशील, सर्जनशील आणि बालकेंद्रित शिक्षिका म्हणून शिक्षणप्रक्रियेत आपले स्थान निर्माण करतील.